जाणून घ्या २२ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

22 September Dinvishes

मित्रांनो, प्रत्येक दिवसापासून आपल्याला कुठल्याना कुठल्या प्रकारची माहिती ही मिळतच असते. जगात दररोज नवीन नवीन घटना या घडत असतात. आपल्या इतिहास काळात देखील खूप काही अश्या घटना घडल्या आहेत ज्या कालांतराने कालबाह्य झाल्या आहेत. आपणास त्या गोष्टींचा विसर पडला आहे. आम्ही या लेखाच्या माध्यमातून अश्याच प्रकारच्या काही ऐतिहासक व आधुनिक घटनांची माहिती आपणास सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत.

या लेखाच्या माध्यमातून आपण आजच्या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटनांव्यतिरिक्त आजच्या दिवशी जन्मदिन तसचं, निधन पावणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत. तसचं, मित्रांनो, आज जगातिक कार मुक्त दिवस. या दिवसाची सुरुवात सन २००० साली झाली. या दिवसानिमित्त नागरिक कामावर जाताना गाडीचा वापर न करता सायकल चा वापर करतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते.

जाणून घ्या २२ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 22 September Today Historical Events in Marathi

22 September History Information in Marathi
22 September History Information in Marathi

२२ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 September Historical Event

 • इ.स. १६६० साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरुन पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
 • इ.स. १७९२ साली फ्रेंच मध्ये प्रथम प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात करण्यात आली.
 • इ.स. १८८८ साली नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अधिकृत मासिक “द नॅशनल जिओग्राफिक” चा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला.
 • सन १९३१ साली इंग्लिश विनोदी कलाकार चार्ली चाप्लीन यांनी लंडन या देशांत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भेट घेतली.
 • सन १९३९ साली सोव्हियत संघाने आपली पहिली आण्विक चाचणी केली.
 • सन १९६५ साली भारत आणि पाकिस्तान देशतील युद्धाला पूर्ण विराम मिळाला होता.  

२२ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 22 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८६९ साली प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक व राजकारणी,  प्रशासक, शिक्षक, वक्ते आणि भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते तसचं, भारत सेवक समाजाचे संथापक व्ही. एस. श्रीनिवास शास्त्री यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८७ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक, शिक्षणतज्ञ व राजकारणी तसचं, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष आणि वक्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्मदिन.
 • सन १९०९ साली महाराष्ट्रीयन मराठी विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक दत्तात्रय तुकाराम उर्फ दत्तू बांदेकर उर्फ सख्याहरी यांचा जन्मदिन.
 • सन १९१४ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्मदिन.
 • सन १९५० साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व सिक्कीम राज्याचे माजी मुख्यमंत्री व सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट या राजनीतिक पक्षाचे अध्यक्ष पवन कुमार चामलिंग यांचा जन्मदिन.
 • इ.स. १७९१ साली ब्रिटीश भौतिक विज्ञानी व रसायनशास्त्रज्ञ मायकल फैराडे यांचा जन्मदिन.

२२ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 22 September Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १५३९ साली शीख धर्माचे संस्थापक व पहिले गुरु गुरु नानक यांचे निधन.
 • सन १९५६ साली नोबल पारितोषिक विजेता ब्रिटीश रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक सोड्डी(Frederick Soddy) यांचे निधन.
 • सन १९७० साली भारतीय बंगाली भाषिक लेखक व सुप्रसिद्ध साहित्यकार तसचं, चित्रपट निर्माता शरादिंदु बंदोपाध्याय यांचे निधन
 • सन १९९१ साली दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन.
 • सन २०११ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व कर्णधार मंसूर अली खान पटौदी यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top