Saturday, June 3, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

चार्ली चॅप्लीन यांचे अखेरचे भाषण

Charlie Chaplin’s Speech in Marathi

आज आम्ही तुमच्यासाठी सुप्रसिध्द चार्ली चाप्लीन यांचे “द ग्रेट डिक्टेटर” हे त्यांचे अंतिम भाषण आणले आहे.

जे सर्वांसाठी फार प्रेरणादायी आहे.

चार्ली चॅप्लीन यांचे अखेरचे भाषण – Charlie Chaplin Speech in Marathi 

Charlie Chaplin Speech

मला माफ करा मी सम्राट बनायचा प्रयत्न करीत नाही, हा माझा व्यवसायही नाही मी कोणावर राजही करणार नाही, ना मला कोणाला हरवायचे आहे. माझी मनिषा आहे की मी सर्वांची मदत करू मग ते युवा असो, म्हातारे असो, किंवा गोरे तसेच काळे असो. सर्वांची मदत मला करायची आहे. आपण सर्वांना एकमेकांना आपली मदत करायची आहे.

मानवाची वागण्याची पध्दत ही हीच असायला पाहीजे.

आपण सर्वांना एकत्र राहुन आपले दुःख व आनंद साजरे करावे लागतील ही दुनिया एक विशाल स्टेज आहे जेथे काही लोक समृध्द तर काही दयाशील आहेत त्यामुळे एकमेकांचे लक्ष ठेवणे आपली जवाबदारी असावी परंतु आपण आज एकमेकांपासुन भटकलो आहोत.

लोभाने मानवास आतुन बदलून टाकले आहे. एकमेकांच्या इर्शेमूळे जगात जी असमानता आली आहे त्यामुळे लोक एकमेकांचा राग करत आहेत त्यांचा अहम् जागा झाला आहे जो दुनियेसाठी फार घातक आहे.

आज सदाचाराचा नाश होऊ  पाहत आहे.

यावेळी मी बोलत असतांना कित्येक तरूण, वृध्द, माता बालक समाजाच्या या दुरावस्थेचे बळी पडत आहेत.

निरपराधी लोकांना सतावले जात असुन त्यांना तुरूंगात कोंडले जात आहे.

ज्यांच्या पर्यंत माझा आवाज पोहोचत आहे त्यांना मी म्हणेल की निराश होऊ नका तुमच्या सर्व आशांना पल्लवीत करा. एकजुटीने आपणांस ही लढाई जिंकायची आहे.

यासाठी मानवतेने आपले शस्त्र उचला. आपल्या चांगल्या मनाने आपल्याला त्यांचे मन जिंकायचे आहे.

त्यासोबतच आपली समाजात एक प्रतिष्ठाही निर्माण करायची आहे.

पोलिसवाल्यांनो आपल्या चैनीसाठी आपली लाज विकु नका.

समाजातील कंटकांच्या हाती आपला ईमान विकु नका, ज्या समस्या आपल्यावर थोपवल्या गेल्या आहेत त्यास दुर करून आपल्या सुखाच्या सुर्याचा उदय करायचा आहे.

आपल्या जिवनाचे निर्णय तुम्ही स्वतःच घ्या.

Charlie Chaplin Bhashan

तुम्हाला ठरवायचे आहे की आता नेमके काय करावे तुम्हाला विचार करायचा आहे की आता तुमच्या समोर कोणत्या आशा आहेत.

तुम्ही मानव आहात अन् तुमच्यात माणुसकी जगवा.

भांडणे करू नका आपल्या सारख्या लोकांचा राग न करता त्यांना एकत्र घेऊन आपले संघटन तयार करा.

गुलाम बनु नका.

संत ल्युक यांच्या १७ व्या अध्यायात म्हंटले गेले आहे की ईश्वराचे साम्राज्य मानवाच्या मनातुनच जाते त्यामुळे तुम्ही तुमचे मन खुले करा ते सर्वांसाठी उघडल्यावरच ईश्वर त्यात वास करतो.

आपल्या आनंदास थोडे का होईना साजरे करा त्यामुळे क्लिष्ट आणि असहय जीवनातुन थोडा श्वास घ्यायला जागा मिळेल.

या लोकतंत्रात सर्वांना समान हक्काचे जिवन जगण्याचा अधिकार आहे.

त्यामुळे आपल्या सर्व अधिकारांचा वापर करा.

मग तुम्ही सैनिक आहात की कामगार कोणतेही काम करत असाल, एकजुट व्हा. आणि आपल्या बंधुभगिनींच्या समस्या सोडविण्यास सहकार्य करा.

चार्ली चॅप्लीन एक सुप्रसिध्द विनोदविर आहेत त्यांच्या सिनेमांनी सामान्य माणसाच्या विविध समस्यांवर फार मार्मिक चित्र प्रस्तुत केले आहे.

त्यांच्या मते हसावे आणि इतरांनाही हसवण्याचा प्रयत्नं करावा. त्यांच्या मते हास्याशिवाय जीवन अपुर्ण आहे.

आशा करतो कि आपल्याला आजचा लेख आवडला असेल, आवडल्यास आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझीमराठी सोबत.

धन्यवाद!

Previous Post

मौर्य शासक बिंबीसार यांचाविषयीची माहिती 

Next Post

जाणून घ्या १५ मार्च रोजी येणारे दिनविशेष

Editorial team

Editorial team

Related Posts

सावित्रीबाई फुले जयंती भाषण
bhashan

सावित्रीबाई फुले जयंती भाषण

Savitribai Phule Speech in Marathi सावित्रीबाई फुले जयंती भाषण - Savitribai Phule Speech in Marathi दरवर्षी दिनाकं ३ जानेवारी ला...

by Editorial team
March 1, 2022
Rajmata Jijau Speech in Marathi
bhashan

स्वराज्य संप्रेरिका माँ साहेब राजमाता जिजाऊ यांच्या विषयी तडफदार भाषण

Rajmata Jijau Speech in Marathi Rajmata Jijau Speech in Marathi स्वराज्य संप्रेरिका माँ साहेब राजमाता जिजाऊ यांच्या विषयी तडफदार भाषण...

by Editorial team
April 27, 2021
Next Post
15 March History Information in Marathi

जाणून घ्या १५ मार्च रोजी येणारे दिनविशेष

Chocolate Balls Recipe

चॉकलेट फ्रुट बॉल बनवायची विधी

Chaitanya Mahaprabhu in Marathi

श्री चैतन्य महाप्रभू यांच्या जीवनपरिचय

Pandit Jawaharlal Nehru Speech in Marathi

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भाषण

Chicken Egg Rolls Recipe

चिकन एंड एग स्प्रिंग रोल बनवण्याची रेसिपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved