जाणून घ्या २३ मार्च रोजी येणारे दिनविशेष

23 March Dinvishesh

पर्यावरणाच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच (23 March Today Historical Events in Marathi) महत्वाचा आहे, कारण आज २३ मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या पर्यावरणातील हवेमध्ये दैनदिन अनपेक्षित बदल होत आहेत, याकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी लोकांना जागरूक करणे हा यामागील मुख्य हेतू आहे.

सन १९५० साली जागतिक हवामानशास्त्र संघटनेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेत भारताने देखील सहभाग घेतला होता जवळपास ३१ देशांनी या संस्थेच्या स्थापनेत पुढाकर घेतला होता. या संस्थेने सर्वप्रथम जगाच्या प्रत्येक देशातील हवामानाच्या नोंदी घेण्यास प्रथम प्राधान्य दिले होते.

जाणून घ्या २३ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 23 March Today Historical Events in Marathi

23 March History Information in Marathi

२३ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 23 March Historical Event

इतिहासात घडलेल्या तसेच आधुनिक काळात घडलेल्या घटनांची माहिती आपण इथे पाहणार आहोत. इतिहासाच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच महत्वाचा आहे. आजच्या दिवशी थोर क्रांतीकारकांना फाशीवर लटकविण्यात आले होते.

वीर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आज शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अश्याच प्रकारे आणखी  काही ऐतिहासिक घटनांची माहिती आपण याठिकाणी पाहणार आहोत.

 • सन १८३९ साली इंग्लंड देशातील बोस्टन मोर्निंग पोस्ट या वृत्तपत्रामध्ये ओ. के. हा शब्द प्रथम छापण्यात आला होता.
 • इ.स.१८५७ साली न्युयॉर्क शहरात पहिली लिफ्ट सुरु करण्यात आली.
 • सन १८६८ साली अमेरिकेतील ओकलंड शहरामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
 • इ.स. १९३१ साली महान भारतीय क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
 • सन १९४० साली लाहोर येथील मुस्लीम लीगच्या सभेत स्वतंत्र्य पाकिस्तानचा ठराव पारित करण्यात आला होता.
 • इ.स. १९५६ साली पाकिस्तान हे जगातील पहिले इस्लामिक प्रजासत्ताक राष्ट्र बनले.
 • सन १९६५ साली अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाने आपले पहिले अंतरीक्ष यान ‘जैमिनी ३’ च्या साह्याने दोन व्यक्तींना अंतराळात पाठविले होते.
 • इ.स. १९८० साली भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन हे ऑल “इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा” जिंकणारे पहिले भारतीय बॅडमिंटन खेळाडू ठरले.
 • सन १९८६ साली भारतीय राखीव पोलीस दलातील महिलांच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षित करण्यात आले.
 • इ.स. १९९८ साली पाकिस्तान देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘निशान-ए-इम्तियाज’ पुरस्कार प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता दिलीपकुमार यांना बहाल करण्यात आला.
 • सन १९९९ साली हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याचे शास्त्रीय संगीतकार पंडित भीमसेन जोशी व गानसम्राज्ञी प्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • इ.स. १९९९ साली महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
 • सन २००१ साली रशियन अंतराळ स्थानक मीर पृथ्वीवर कोसळले.
 • इ.स. २०१२ साली भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक पूर्ण करणारे पहिले खेळाडू बनले.
 • सन २०१४ साली युरोपीय संघ आणि अमेरिकेने रुस राष्ट्रावर प्रतिबंध लावला.

२३ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 23 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १६१४ साली मुघल बादशाहा शहाजहा आणि मुमताज महल यांची सर्वात थोरली मुलगी जहाँआरा यांचा जन्मदिन.
 • सन १८८० साली भारतीय क्रांतिकारक चित्तरंजन दास यांच्या पत्नी स्वातंत्र्यता क्रांतिकारी बसंती देवी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८९ साली प्रख्यात भारतीय संस्कृत अभ्यासक, कवी, तत्ववेत्ता, व्याकरणकार, बहुपक्षी आणि राजस्थानमधील जयपूरच्या तंत्रज्ञांचे तज्ज्ञ, भट्ट मथुरानाथ शास्त्री यांचा जन्मदिन.
 • सन १८९३ साली भारतीय आविष्कारक आणि अभियंता तसेच, ‘एडिसन ऑफ इंडिया’ म्हणून प्रसिद्ध जी.डी. नायडू यांचा जन्मदिन. भारतातील पहिली इलेक्ट्रिक मोटार त्यांनी तयार केली होती.
 • इ.स. १८९८ साली आसामी भाषिक कवयित्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचा जन्मदिन.
 • सन १९१० साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे क्रांतिकारक व समाजवादी नेता राम मनोहर लोहिया यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९१६ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचा जन्मदिन.
 • सन १९१९ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या, राजकारणी तसेच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या खासदार सुभद्रा जोशी यांचा जन्मदिन
 • इ.स. १९२३ साली भारतीय क्रांतिकारक व स्वातंत्र्य सेनानी हेमू कालाणी यांचा जन्मदिन.
 • सन १९२६ साली मराठी लेखक रवींद्र पिंगे यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९५३ साली भारतीय व्यावसायी महिला मजूमदार-शॉ  यांचा जन्मदिन.
 • सन १९६८ साली माजी भारतीय क्रिकेटपटू अतुल सतीश वासन यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९७६ साली भारतीय दूरदर्शन अभिनेत्री व भारतीय जनता पक्षातील प्रतिष्ठित महिला स्मृती ईराणी यांचा जन्मदिन.
 • सम १९८७ साली हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत यांचा जन्मदिन.

२३ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 23 March Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १९३१ साली भारतातील महान क्रांतिकारक भगतसिंग यांना फाशी देण्यात आली होती.
 • सन १९३१ साली भारतातील महान क्रांतिकारक सुखदेव थापर यांना फाशी देण्यात आली होती.
 • इ.स. १९३१ साली भारतातील महान क्रांतिकारक शिवराम हरि राजगुरू यांना फाशी देण्यात आली.
 • सन १९६५ साली भारतीय स्वातंत्र्यता कार्यकर्ता सुहासिनी गांगुली यांचे निधन.
 • इ.स. १९८८ साली पंजाबी भाषिक कवी पाश यांचे निधन.
 • सन २००८ साली मराठी चित्रपट आणि नाटकातील उल्लेखनीय अभिनेते गणपत पाटील यांचे निधन.
 • इ.स. २०१० साली भारतीय नक्षलवादी चळवळीचे जनक कानू सान्याल यांचे निधन.

आजच्या दिनाचे महत्व जाणून पर्यावरण राखण्यास आपले सहकार्य द्या तसेच इतरांनाही त्याचे महत्व पटवून द्या. पर्यावरन आपल्या सर्वांकरिता महत्वाचे आहे त्यांची निगा राखणे हे देखील आपल्याच हाती आहे. म्हणून शक्य होईल तितके प्रयत्न करून आपले पर्यावरन प्रदूषण मुक्त करा. शुद्ध हवा देई सुखाचा वारा.

धन्यवाद..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here