जाणून घ्या २६ मे रोजी येणारे दिनविशेष

26 May Dinvishes

मित्रांनो, आजच दिवस हा आपण सर्व देशवासीयांसाठी मोठ्या अभिमानाचा दिवस आहे. अंतरीक्ष क्षेत्रात केवळ अमेरिका, जर्मनी, रशिया यासारख्या प्रगत देशांचाच दबदबा होता. कालांतराने आपला भारत देश देखील या क्षेत्रात प्रगती करू लागला. सन १९९९ साली भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने जर्मनी आणि दक्षिण कोरिया या देशांच्या उपग्रहा बरोबर आपल्या देशाच्या  उपग्रहाचे अंतरिक्षात यशस्वीपणे प्रक्षेपण केले. या घटनेमुळे आपला देश देखील अंतरीक्ष क्षेत्रातील प्रगत देशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

याव्यतिरिक्त, आपण या लेखाच्या माध्यमातून काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन, त्यांचे शोधकार्य तसचं, काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २६ मे रोजी येणारे दिनविशेष – 26 May Today Historical Events in Marathi

26 May History Information in Marathi
26 May History Information in Marathi

२६ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 May  Historical Event

  • सन १९५० साली ब्रिटन देशाने पेट्रोलच्या खरेदीसाठी राशन कार्डच्या सक्तीचा कायदा रद्द केला.
  • सन १९७३ साली बहारीन देशाने संविधान स्वीकारले.
  • सन १९८६ साली युरोपीय देशांनी युरोपीय संघाचा झेंडा स्वीकारला.
  • सन १९८९ साली मुंबई जवळील न्हावा शेवा बंदराचे उद्घाटन करण्यात आले.
  • सन १९९९ साली श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविडने 318 धावांचा विश्वविक्रम केला.
  • सन २००७ साली भारत आणि जर्मनी देशांतर्गत सुरक्षा संबंधी करार करण्यात आले.
  • सन २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे सदस्य नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली.

२६ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९३७ साली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री करिता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ भारतीय अभिनेत्री, पार्श्वगायक आणि विनोदकार गोपीशांता यांचा जन्मदिन.
  • सन १९४५ साली भारतीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसचं, माजी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्मदिन.
  • सन १९४६ साली प्रख्यात भारतीय राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या तसचं, मजदूर किसान शक्ती संघटनेच्या संस्थापिका अरुणा रॉय यांचा जन्मदिन.
  • सन १९६१ साली सर्वोत्कृष्ट संगीत व्हिडिओकरिता ग्रॅमी पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट, संगीत व्हिडीओ आणि जाहिरात दिग्दर्शक व व्यावसायिक तरसेम सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९६८ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेते, तसचं, दूरदर्शन विनोदी मालिका तारक मेह्ता का उलटा चश्मा या विनोदी मालिकेतील प्रख्यात कलाकार दिलीप जोशी यांचा जन्मदिन.
  • सन १९८३ साली अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेल रत्न, पद्मश्री, सीएनएन-आयबीएन इंडियन ऑफ दी इयर स्पोर्ट्स तसचं, सन २००८ साली झालेल्या उन्हाळी ऑलिंपिकमधील कुस्ती – पुरुष फ्रीस्टाईल लाइटवेट पदक विजेता सुप्रसिद्ध भारतीय फ्री स्टाईल कुस्तीपटू सुशील कुमार सोलंकी यांचा जन्मदिन.

२६ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26  May Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९०८ साली भारतीय धार्मिक नेते आणि इस्लामधर्मीय अहमदिया चळवळीचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचे निधन.
  • सन १९७२ साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री राजलक्ष्मी यांचे निधन.
  • सन २०१४ साली भारतीय राज्य केरळमधील पठाणमथिट्टा जिल्ह्यातील मालंकारा ऑर्थोडॉक्स सिरियन चर्च चे धर्मगुरू कॅथोलिक बेसीलिओस मार थोमा डिडिमॉस पहिले यांचे निधन.
  • सन २०१७ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पोलीस सेवा अधिकारी आणि पंजाब राज्याचे माजी पोलीस महासंचालक कंवर पाल सिंह गिल यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top