Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २८ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

28 April Dinvishesh

मित्रानो, या लेखात आपण इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. जगातील सर्वात भीषण दुर्घटना युक्रेनच्या चेरनोबिलमध्ये झाली होती. या दुर्घटनेत हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. चेरनोबिल येथे झालेल्या परमाणु स्फोटातून जे अनु किरणे बाहेर पडले होते ते दुसऱ्या महायुद्धा दरम्यात अमेरिकेने नागासकी येथे केलेल्या स्फोटातून उत्पन्न झालेल्या अनु किरणांच्या तुलनेने दहा पट जास्त होते. त्यामुळे लाखो लोकांना दुसऱ्या ठिकाणी विस्थापित करण्यात आलं. याची कबुली सन १९८६ साली आजच्या दिवशी सोव्हिएत युनियनने युक्रेनच्या चेरनोबिलमध्ये अणुकिरणोत्सव झाल्याचे कबूल केले होते.

शिवाय, आज इतिहासातील प्रसिद्ध वीर मराठा सम्राट प्रथम थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या दुसऱ्या पत्नी मस्तानी यांचे निधन झाले होते. याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यामतून काही महत्वपूर्ण त्याक्तींचे जन्मदिन, निधन, शोध आदि घटनांची संपूर्ण माहिती (28 April Today Historical Events in Marathi) जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २८ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष –  28 April Today Historical Events in Marathi

28 April History Information in Marathi
28 April History Information in Marathi

२८ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 April Historical Event

  • सन १९१६ साली आयरिश भारतीय क्रांतिकारक डॉ. एनी बेसेन्ट यांनी ब्रिटीशकालीन भारतात होमरूल चळवळीची स्थापना केली.
  • इ.स. १९२० साली स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतात डॉ. एनी बेसेन्ट, लोकमान्य टिळक व जोसेफ बॅप्टिस्थ यांच्या नेतृत्त्वाखाली भारतात स्थापन करण्यात आलेल्या होमरूल लीगच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • सन १९३५ साली रुसची राजधानी मास्को येथे भूमिगत रेल्वे ‘मेट्रो’ सुरू करण्यात आली.
  • इ.स. २००१ साली अमेरिकन अभियंता व उद्योजक डेनिस अँथनी टिटो हे अवकाशात प्रवास करण्यासाठी वित्तपुरवठा करणारे पहिले अवकाश यात्री ठरले.
  • सन २००२ साली राष्ट्रकुल(कॉमनवेल्थ) किंवा आयरिश नागरिकांद्वारे लिखित इंग्रजी भाषिक लिखित कादंबरी आणि युनाइटेड किंगडममध्ये प्रकाशित होणाऱ्या सर्वोत्कृष्ट मूळ कादंबरीसाठी दरवर्षी देण्यात येणारा ‘मैन बुकर पुरस्कार’ (साहित्यिक पुरस्कार) चे नाव बदलून “मैन प्राइज फॉर फिक्शन” असे करण्यात आले.
  • इ.स. २००८ साली भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने ‘पीएसएलव्ही-सी ९’ या उपग्रहाचे प्रक्षेपण करून नवीन इतिहास रचला.

२८ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –  28 April Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७५८ साली अमेरिकेतील राजकारणी, वकील, मुत्सद्दी व संस्थापक पिता तसचं, अमेरिकेचे माजी (५ वे) राष्ट्राध्यक्ष जेम्स मुनरो यांचा जन्मदिन.
  • सन १७९१ साली शीख साम्राज्य शासक महाराजा रणजितसिंग यांच्या खालसा सेनेचे सेनापती हरीसिंह नलवा यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८५६ साली वासुकाका जोशी या नावाने प्रसिद्ध असलेले भारतीय स्वातंत्र्य सेनानी, तसचं, लोकमान्य टिळक यांचे निकटवर्तीय व चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश जोशी यांचे निधन.
  • सन १९२९ साली भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध वेशभूषाकार भानू अथैया यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९३१ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारताच्या महाराष्ट्र राज्यातील मराठी साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्मदिन.
  • सन १९३७ साली ईराक देशातील हुकुमशहा व इराकचे पाचवे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९६८ साली ब्रिटिश-झिम्बाब्वे क्रिकेट प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लॉवर यांचा जन्मदिन.
  • सन १९७१ साली एम्मे एंटरटेनमेंट या मोशन पिक्चर प्रॉडक्शन कंपनीचे सह-संस्थापक व सेव्ह द टाईगर या संस्थेचे सल्लागार निकील अडवाणी यांचा जन्मदिन.

२८ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 28 April  Death/ Punyatithi/ Smrutidin

  • इ.स. १७२६ साली ब्रिटीश इंग्रज व्यापारी व चेन्नई प्रांताचे गव्हर्नर थॉमस पिट यांचे निधन.
  • सन १७४० साली मराठा साम्राज्याचे शासक व पेशवे घराण्यातील वीर योद्धा थोरले बाजीराव पेशवे उर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदा नदीच्यातिरी रावेरखेड या ठिकाणी निधन झालं.
  • इ.स. १७४० साली महाराजा छत्रसाल यांची कन्या आणि मराठा शासक पेशवा बाजीराव प्रथम यांची दुसऱ्या पत्नी मस्तानी यांचे निधन.
  • सन १९०३ साली  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जोशिया विलार्ड गिब्स यांचे निधन.
  • इ.स.१९९२ साली ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ सन्मानित भारतीय कन्नड भाषेचे प्रमुख साहित्यकार डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचे निधन.
  • सन १९९८ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाज, तसचं, राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष रमाकांत देसाई यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved