जाणून घ्या २८ मे रोजी येणारे दिनविशेष

28 May Dinvishes

मित्रांनो, आज देशातील थोर हिंदुवादी समाजसुधारक व महान स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिन. ब्रिटीश कालीन भारतातील महाराष्ट्र राज्यातील ते एक महान क्रांतिकारक होते. त्यांनी आपल्या लेखनातून भारतातील जनतेला ब्रिटीश सरकार विरुद्ध जागृत केलं. विनायक दामोदर सावरकर हे एक मराठी लेखक व कवी होते.  त्यांनी अनेक भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पुढाकार घेतला होता. तसचं, भारतात ब्रिटीश सरकार विरुद्ध त्यांनी आपल्या अभिनव भारत संघटनेची स्थापना केली होती. शिवाय, ते एक महान हिदू तत्वज्ञानी व्यक्ती असल्याने त्यांनी अखिल भारतीय हिंदू महासभेची स्थापना देखील केली होती. अश्या या महान क्रांतिकारकाचा आज जन्मदिन.माझी मराठीच्या संपूर्ण टीमकडून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना शतशः नमन .

या व्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यामतून काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य या बद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २८ मे रोजी येणारे दिनविशेष – 28 May Today Historical Events in Marathi

28 May History Information in Marathi
28 May History Information in Marathi

२८ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 May  Historical Event

 • सन १९५२ साली ग्रीस देशांत महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार देण्यात आला.
 • सन १९५९ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दोन अमेरिकन माकडांना अंतराळ यात्रा घडवून आणली.
 • सन १९६४ साली “पॅलेस्टाईन मुक्ती” या उद्देशाने पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन संस्थेची स्थापना इज्राइल देशाची राजधानी जेरुसलेम या ठिकाणी करण्यात आली.
 • सन १९७० साली ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस पक्षाचे औपचारिकपणे विभाजन करण्यात आले.
 • सन १९९६ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
 • सन १९९८ साली पाकिस्तान देशाने पहिली आण्विक चाचणी केली.
 • सन १९९९ साली विश्व प्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दा विंची यांचे ‘द लास्ट सपर’ हे चित्र इटली या देशांत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.
 • सन २००८ साली नेपाल मध्ये पुरातन काळापासून चालत आलेली राजशाही परंपरेचा अंत करण्यात आला.

२८ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 28  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १६६० साली इंग्लंडचे पहिले राजा जॉर्ज प्रथम यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८३ साली महान भारतीय स्वातंत्र्यकर्ता व राजकारणी तसचं, हिंदुवादी तत्वज्ञानी आणि हिंदू महासभेचे आग्रणी सदस्य विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिन.
 • सन १९०३ साली किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे पुत्र व भारतीय उद्योगपती शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्मदिन.
 • सन १९०७ साली प्रख्यात स्वातंत्र्य सेनानी, रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्मदिन.
 • सन १९०८ साली सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक, पत्रकार आणि नौदल बुद्धिमत्ता अधिकारी तसचं,विश्व प्रसिद्ध जेम्स बाँड या गुप्तचर मालिकेचे निर्माता इयान लँकेस्टर फ्लेमिंग यांचा जन्मदिन.
 •  सन १९२३ साली भारतीय अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, चित्रपट संपादक आणि राजकारणी, तसचं, आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री नंदामुरी तारका रामराव उर्फ एन. टी. रामराव यांचा जन्मदिन.
 • सन १९४८ साली प्रख्यात भारतीय मल्याळम आणि इंग्रजी भाषिक कवी आणि समीक्षक तसचं, मल्याळ भाषेतील आधुनिक काव्याचे प्रणेते, द्वैभाषिक साहित्य समीक्षक, नाटककार, संपादक, स्तंभलेखक आणि अनुवादक,  भारतीय साहित्य जर्नलचे माजी संपादक आणि साहित्य अकादमीचे माजी सचिव के. सच्चिदानंदन यांचा जन्मदिन.

२८ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 28  May Death / Punyatithi /Smrutidin

 • सन १९६१ साली महाराष्ट्रीयन प्राच्यविद्या संशोधक परशुराम गोडे यांचे निधन.
 • सन १९७९ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चिकित्सक (डॉक्टर), शिक्षणतज्ज्ञ, बँकर आणि समाजसेवक डॉ.  टोन्से माधव अनंत पाई यांचे निधन.
 • सन १९९४ साली हिंदू महासभेचे नेते व पुण्याचे माजी महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top