जाणून घ्या २९ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

29 August Dinvishes

मित्रांनो, आज आपल्या देशाचे महान हॉकीपटू,  हॉकीचे जादुगार म्हणून प्रख्यात असलेले मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस आपल्या देशांत राष्ट्रीय खेळ दिवसाच्या रूपाने साजरा करतात. दरवर्षी हा २९ ऑगस्ट हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.

तसचं, मित्रांनो आज आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन देखील आहे. सन १६ जुलै १९४५ सालापासून अण्वस्त्रांची चाचणी सुरू झाल्यापासून जगाच्या विविध भागात जवळपास २,००० च्या वर खूप भीषण घटना घडल्या.  या आण्विक अण्वस्त्रांची चाचणी रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रासमोर खूप मोठी समस्या निर्माण झाली होती.  सन २ डिसेंबर २००९ साली झालेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या ६४ व्या अधिवेशनात अण्वस्त्रांची चाचणी घेण्यास बंदी घालणारे विधायक मांडण्यात आले होते.  या विधायकाला ६४/३५ च्या फरकाने मंजुरी मिळाली. त्यामुळे दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

जाणून घ्या २९ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 29 August Today Historical Events in Marathi

29 August History Information in Marathi
29 August History Information in Marathi

२९ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 August Historical Event

 • इ.स. १८३१ साली ब्रिटीश संशोधक मायकेल फॅराडे(Michael Faraday) यांनी विद्युत चुंबकीय यंत्राचा शोध लावला
 • इ.स. १८९८ साली अमेरिकन बहुराष्ट्रीय टायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी “गुडियर टायर अँड रबर कंपनी” ची स्थापना करण्यात आली.
 • सन १९४७ साली भारतीय संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना करण्यात आली.

२९ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 29 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८८० साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय शिक्षणतज्ञ, स्वातंत्र्यसेनानी,  आधुनिक संस्कृत कवी आणि राजकारणी डॉ माधव श्रीहरी अणे याचा जन्मदिन.
 • इ.स. १८८७ साली ब्रिटीश कालीन भारतातील प्रख्यात चिकित्सक व देशसेवक तसचं, गुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री सेवक जीवराज मेहता यांचा जन्मदिन.
 • सन १९०५ साली हॉकीचे जादुगार म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय सुवर्णपदक विजेता हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन.
 • सन १९४९ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय अवकाश वैज्ञानिक व भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो चे प्रमुख व माजी अध्यक्ष, तसचं अवकाश आयोगाचे माजी अध्यक्ष, के. राधाकृष्णन यांचा जन्मदिन.
 • सन १९५८ साली जगप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, आणि अभिनेता मायकल जॅक्सन यांचा जन्मदिन.

२९ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 29 August Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९०६ साली महाराष्ट्रीयन मराठी ख्रिस्ती धर्मप्रचारक व ख्रिस्ती साहित्याचे जनक व लेखक बाबा पदमनजी मुळे यांचे निधन.
 • सन १९६९ साली महाराष्ट्रातील एक मुस्लीम धर्मीय नामवंत शाहीर मेहबूब हुसेन पटेल यांचे निधन.
 • सन १९७६ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी, लेखक व संगीतकार काझी नझरूल इस्लाम यांचे निधन.
 • सन १९८६ साली महाराष्ट्रीयन मराठी शिक्षणतज्ञ व पुणे येथील महाराष्ट्र विद्यालयाचे संस्थापक तसचं, पुणे विद्यार्थी गृहाचे संस्थापक सदस्य गजानन श्रीपत खैर यांचे निधन.
 • सन २००७ साली ब्रिटीश राजवटील प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र सेनानी, भारतीय राजकारणी व हरियाणा राज्याचे माजी चौथे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचे निधन.
 • सन २००८ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन.

मित्रांनो आपण या लेखाच्या मध्यमातून आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची तसचं, जन्मदिन व निधन पावणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तींची संपूर्ण माहिती जाणून घेवूया तसचं, आपल्या मित्रांना देखील पाठवूया. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top