Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ३ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

3 August Dinvishes

मित्रांनो, दरवर्षी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान जगातील एकूण 120 पेक्षा जास्त देशांमध्ये जागतिक स्तनपान सप्ताह हा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. लहान बाळाला आईचे दुध हेच  सर्वात जास्त पोष्टिक असते. याची जाणीव करून देण्यासाठी हा सप्ताह पाळला जातो.

तसचं, मित्रांनो, आपणास माहिती असेल की, इटालियन खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस हे भारताच्या शोधात निघाले होते परंतु ते भारत म्हणून अमेरिकेच्या खंडावर पोहचले, हे आपण सर्वांना  माहिती आहे.  कोलंबस यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात सन १ ऑगस्ट १४९२ साली स्पेनवरून केली होती. ख्रिस्तोफर कोलंबस हे आपल्या तीन जहाजांसह भारताच्या शोधात निघाले होते.

जाणून घ्या ३ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 3 August Today Historical Events in Marathi

3 August History Information in Marathi
3 August History Information in Marathi

३ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 August Historical Event

  • इ.स. १४९२ साली इटालियन खलाशी ख्रिस्तोफर कोलंबस(Christopher Columbus) हे आपल्या तीन जहाजांसह स्पेनहून भारताच्या शोधात निघाले.
  • सन १९०० साली अमेरिकन टायर कंपनी ‘द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना करण्यात आली.
  • सन १९६० साली नायजेरिया देशाला फ्रांस देशाकडून स्वातंत्र्य मिळालं.
  • सन १९८५ साली प्रसिद्ध भारतीय समाजसेवक व सक्रीय कार्यकर्ते बाबा आमटे यांना सार्वजनिक सेवेसाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • सन १९९४ साली प्रसिद्ध भारतीय संगीतकार अनिल विश्वास यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • सन २००० साली मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करूण यांना फ्रेंच सरकारने नाईट ऑफ आर्ट्स अँन्ड लेटर्स पुरस्काराने सन्मानित केलं.
  • सन २००४ साली महाराष्ट्र राज्याच्या सोलापुर  जिल्ह्यातील “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ” ची स्थापना तत्कालीन राज्यपाल महमंद फझल यांनी केली.
  • सन २००४ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपला मैसेंजर हा उपग्रह बुध ग्रहाकडे प्रक्षेपित केला.

३ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 3 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८८६ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी मैथिली शरण गुप्त यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९८ साली सुप्रसिद्ध भारतीय आधुनिक हिंदी नाटककार, कवी, कादंबरीकार व लेखक उदयशंकर भट्ट यांचा जन्मदिन.
  • सन १९०० साली भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, महाराष्ट्रातील ‘पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन.
  • सन १९१६ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील उर्दू कवी व गीतकार शकील बदायुनी यांचा जन्मदिन.
  • सन १९२४ साली ऐतिहासिक कल्पित साहित्याचे अमेरिकन लेखक लिओन युरिस(Leon Uris) यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या घराण्यातील शास्त्रीय ठुमरी गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांचा जन्मदिन.
  • सन १९५६ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू बलविंदर संधू यांचा जन्मदिन.
  • सन १९६० साली माजी भारतीय क्रिकेटपटू गोपाल शर्मा यांचा जन्मदिन.
  • सन १९८४ साली पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय व्यावसायिक फुटबॉलपटू व कर्णधार सुनील छेत्री यांचा जन्मदिन.
  • सन १९३७ साली फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेता स्पॅनिश टेनिसपटू आंद्रेस गिमेनो टोलागिरा(Andrés Gimeno Tolaguera) यांचा जन्मदिन.

३ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 3 August Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १७९२ साली औद्योगिक क्रांतीच्या काळातील अग्रणी इंग्रज शोधक व उद्योजक रिचर्ड आर्कराईट(Richard Arkwright) यांचे निधन.
  • सन १९०८ साली पटना येथील खुदाबक्श ग्रंथालयाचे संस्थापक मौलवी खुदाबक़्श खान यांचे निधन.
  • सन १९२९ साली फोनोग्राफ चा शोध लावणारे जर्मन संशोधक एमिल बर्लिनर(Emile Berliner) यांचे निधन.
  • सन १९५७ साली महात्मा गांधी यांचे पुत्र व प्रसिद्ध पत्रकार देवदास गांधी यांचे निधन.
  • सन १९९३ साली उत्तरप्रदेश मधील हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रीय सदस्य व क्रांतिकारक  राम प्रसाद बिस्मिल यांचे निकटवर्तीय प्रेम किशन खन्ना यांचे निधन.
  • सन १९९३ साली भारतीय हिंदू अध्यात्म नेते आणि अद्वैत वेदांत, भगवद्गीता, उपनिषद प्रसारक स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved