जाणून घ्या ३ जून रोजी येणारे दिनविशेष

3 June Dinvishes

मित्रांनो, आजचा दिवस हा आपण सर्व भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेला हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिल्या गेलेला दिन आहे. सन १९४७ साली आजच्या दिवशी भारतातील शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर भारत आणि पाकिस्तान अश्या दोन देशाची निर्मिती झाली होती.

त्यांच्या या घोषणेपूर्वी भारतात खूप मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या होत्या. काही करून लोक ऐकायला तयार नव्हते. तसचं, तत्कालीन भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाची अवस्था देखील लयास गेली होती. परिणामी ब्रिटीश व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची घोषण केली. शिवाय, आज आपण या लेखाच्या माध्यमातून काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन, शोधकार्य आणि काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ३ जून रोजी येणारे दिनविशेष – 3 June Today Historical Events in Marathi

3 June History Information in Marathi
3 June History Information in Marathi

३ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 June Historical Event

 • सन १९१५ साली इंग्रज सरकारने रवींद्रनाथ टागोर यांना नाईटहुड ही पदवी बहाल केली.
 • सन १९१६ साली महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना मुंबई येथे केली.
 • सन १९४३ साली संयुक्त राष्ट्राने मदत व पुनर्वसन प्रशासनाची स्थापना केली.
 • सन १९४७ साली स्वातंत्र्यपूर्वकाळातील भारतातील शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताच्या फाळणीची घोषणा केली.
 • सन १९८४ साली भारतीय लष्करी दलाने ऑपरेशन ब्ल्यू स्टार या मोहिमे अंतर्गत अमृतसर येथील मंदिरात घुसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून देण्यासाठी सुवर्ण मंदिरावर हल्ला चढविला.
 • सन १९८५ साली भारत सरकारने पाच दिवसांच्या कार्यदिवस आठवड्याला सुरुवात केली.
 • सन १९९८ साली जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्ध नौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी घेतली.

३ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 3 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८४४ साली प्रसिद्ध भारतीय पत्रकार, कादंबरीकार, नाटककार आणि निबंधकार व साहित्यिक बाळकृष्ण भट्ट यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८६७ साली भारतात बालविवाह नियंत्रण कायदा लागू करणारे प्रख्यात भारतीय शैक्षणिक, न्यायाधीश, आणि राजकारणी बिलास सारडा यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९० साली नामवंत महाराष्ट्रीयन चित्रकार, शिल्पकार, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक बाबुराव कृष्णाजी मिस्त्री यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९२ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखिका व बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचा जन्मदिन.
 • सन १९२४ साली भारतीय लेखक आणि राजकारणी तसचं तामिळनाडू राज्याचे माजी मुख्यमंत्री मुथुवेल करुणानिधी यांचा जन्मदिन.
 • सन १९३० साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार व कामगार संघटना सदस्य आणि राजकारणी जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचा जन्मदिन.
 • सन १९४१ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाद्धीश न्यायमूर्ती रुमा पाल यांचा जन्मदिन.

३ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 3 June Death / Punyatithi /Smrutidin

 • इ.स. १६५७ साली मानवी शरीरातील रक्तभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे ब्रिटीश शरीरशास्त्रज्ञ विलियम हार्वे यांचे निधन.
 • सन १९३२ साली प्रसिद्ध भारतीय उद्योजक व व्यापारी दोराबजी टाटा यांचे निधन.
 • सन १९५६ साली थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी व स्वातंत्र्य हिंदुस्तानचे संपादक तसचं, महाराष्ट्रीयन मराठी पत्रकार आणि नाटककार वामन गोपाल जोशी यांचे निधन.
 • सन १९७७ साली नोबल पारितोषिक विजेते ब्रिटीश जीवरसायन शास्त्रज्ञ आर्चिबाल्ड विवियन हिल यांचे निधन.
 • सन १९९० साली इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक रॉबर्ट नोयिस यांचे निधन.
 • सन २०१४ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व महाराष्ट्रीयन लोकप्रिय नेता गोपीनाथ मुंडे यांचे निधन.
 • सन २०१६ साली जगप्रसिद्ध अमेरिकन बॉक्सर मुहम्मद अली यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here