जाणून घ्या ३० मार्च रोजी येणारे दिनविशेष

30 March Dinvishesh

३० मार्च हा दिवस ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी संपूर्ण विश्वात ‘जागतिक डॉक्टर दिन’  म्हणून साजरा करण्यात येतो. तसचं, आजच्या दिवशी सण १९९२ साली भारतीय चित्रपट क्षेत्रांतील उत्कृष्ट चित्रपट निर्माते, पटकथा लेखक, संगीतकार, ग्राफिक कलाकार, गीतकार आणि लेखक सत्यजित रे यांना त्यांच्या महान कलाकत्मेकरिता चित्रपट क्षेत्रांत देण्यात येणारा सर्वोच्च ‘ऑस्कर’  पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याचप्रकारे इतिहासात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना, शोध, विशेष व्यक्ती जन्मदिन आदी बाबत आपण विस्तृतपणे माहिती (30 March Today Historical Events in Marathi) जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ३० मार्च रोजी येणारे दिनविशेष – 30 March Today Historical Events in Marathi

30 March History Information in Marathi

३० मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 March Historical Event

  • इ.स. १६९९ साली शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांनी पंजाब मधील आनंदपूर या ठिकाणी खालसा पंथाची स्थापना केली.
  • सन १७२९ साली थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतपूर येथे महमंदशहा बंगश यांचा पराभव केला.
  • इ.स. १८४२ साली अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करतांना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या द्रव्याचा वापर केला.
  • सन १८८५ साली पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत करण्यात आली. या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य वामन शिवराम आपटे हे होत.
  • इ.स. १९१९ साली इंग्रज सरकारने भारतात लागू केलेल्या नवीन रोलेट कायद्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली.
  • सन १९२९ साली भारत व इंग्लंड देशादरम्यान हवाई टपालसेवा सुरु करण्यात आली.
  • इ.स. १९३६ साली
  • सन १९४९ साली राजस्थान राज्याची स्थापना करून,  जयपूर शहराला राजस्थान राज्याच्या राजधानीचा दर्जा देण्यात आला.
  • इ.स. १९५४ साली राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी ‘भारतरत्न’ पुरस्काराची स्थापना केली.
  • सन १९९२ साली भारतीय चित्रपट निर्माते, पटकथा लेखक, संगीतकार, ग्राफिक कलाकार, गीतकार आणि लेखक सत्यजित रे यांना चित्रपट उद्योगातील कलात्मक आणि तांत्रिक गुणवत्तेसाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आलं.

३० मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 30 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७६१ साली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत दुबश म्हणून कार्यरत असलेले एम. आर. आर. आनंद रंगा पिल्लई यांचा जन्मदिन. रंग पिल्लाई विशेष करून ओळखले जातात ते १७३६ ते १७६१ साली त्यांनी संग्रहित केलेल्या डायरीच्या संचासाठी त्या डायऱ्यांमध्ये त्यांनी १८ व्या शतकातील भारतीय जीवनमानाचे वर्णन केलं आहे.
  • सन १८६१ साली रामकृष्ण मठाधिपती व शिष्य तसचं, रामकृष्ण मिशनचे पहिले उपाध्यक्ष स्वामी योगानंद यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९९ साली भारत व पाकिस्तान या दोन देशांची विभागणी करणारे ब्रिटीश वकील व न्यायाधीश सिरिल रेडक्लिफ यांचा जन्मदिन.
  • सन १९०६ साली भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या उर्फ के. एस. थिमय्या यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९०८ साली भारतीय चित्रपट अभिनेत्री देविका राणी चौधरी उर्फ देविका राणी यांचा जन्मदिन.
  • सन १९०८ साली बंगाली भाषिक लेखक शरदींदू बंड्योपाध्याय यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९०९ साली भारतीय मल्याळम भाषेच्या साहित्यिक, लेखक व समाजसुधारक तसचं, महात्मा गांधी यांच्या सुधारणावादी चळवळीच्या सदस्या लालीथाम्बिका अंतर्जनाम यांचा जन्मदिन.
  • सन १९१३ साली भारतीय नौदलाचे, तसचं, १९६२ ते १९६६ च्या काळातील ४ थ्या क्रमांकाचे भारतीय नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल भास्कर सदाशिव सोमण यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२५ साली भारतीय तमिळ भाषिक लेखक व तामिळनाडू राज्याचे टीकाकार थी का. शिवसंकरन उर्फ टी. जी. शिवसंकरन यांचा जन्मदिन.
  • सन १९३३ साली भारतीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ व उर्दू कवी राजकुमार पथारिया यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९४२ साली महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील टीकाकार वसंत आबाजी डहाके यांचा जन्मदिन.
  • सन १९६० साली  भारतीय पर्यावरण अर्थशास्त्रज्ञ पवन सुखदेव यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९७२ साली १२ व्या शतकातील शिलाहार घराण्याचे भारतीय शासक मल्लिकार्जुन यांचा जन्मदिन.

३० मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 30 March Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १६६४ साली शिखांचे आठवे गुरु ‘गुरु हर किशन सिंह’  यांचे आपल्या वयाच्या केवल आठव्या वर्षीच निधन झालं. शिख धर्मांच्या दहा गुरुंपैकी ते सर्वात युवा गुरु होते.
  • सन १६६५ साली पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार वीर मुरारबाजी मुघल सम्राट औरंगजेब यांचे सेनापती दिलेरखान पठाण यांच्यासोबत युद्ध करतांना धारातीर्थी पडले.
  • इ.स. १९६९ साली ‘शिशुगीते’  हा कवितेचा प्रकार मराठीत रुजविणारे महाराष्ट्रीयन मराठी  कवी कविवर्य वासुदेव गोविंद मायदेव यांचे निधन.
  • सन १९७६ साली भारतीय मराठी चित्रकार, रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर यांचे निधन.
  • इ.स. १९९३ साली भारतीय स्वातंत्र्यपूर्व तसचं स्वातंत्र्यप्राप्त काळातील प्रसिद्ध चित्रकार स. म. पंडित यांचा जन्मदिन.
  • सन २००२ साली प्रसिद्ध भारतीय कवी व गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन.
  • इ.स. २००५ साली भारतीय भारतीय लेखक आणि व्यंगचित्रकार तसचं, मल्याळम भाषेचे साहित्यकार ओट्टपुलकल वेलुकुट्टी विजयन यांचे निधन.
  • सन २००६ साली भारतीय हिंदी भाषिक लेखक, पत्रकार आणि पटकथा लेखक मनोहर श्याम जोशी यांचे निधन.

वरील माहिती आपणा करिता सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. तसेच या लेखाच्या माध्यमातून आपणास ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा लेख खूप महत्वाचा आहे.

धन्यवाद..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top