जाणून घ्या ४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

4 September Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांची संपूर्ण माहिती तसचं, आजच्या जन्मदिन असणाऱ्या महान व्यक्ती तसचं, निधन वार्ता आणि त्यांचे कार्य या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ४ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 4 September Today Historical Events in Marathi

4 September History Information in Marathi
4 September History Information in Marathi

४ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 September Historical Event

 • सन १९९८ साली स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज(Larry Page) व सर्गेइ ब्रिन (Sergey Brin) या दोन विद्यार्थ्यांनी गुगल’ची स्थापना केली.
 • सन २०१२ साली लंडनमध्ये मध्ये झालेल्या पॅरालंपिक स्पर्धेत भारतीय पॅरालंपिक खेळाडू गिरीशने उंच उडी क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून दिले.
 • सन २०१३ साली रघुरामन राजन यांनी रिजर्व बँकेचे २३ वे गव्हर्नर म्हणून पदभार सांभाळला.
 • सन २०१८ साली युवा भारतीय बॅडमिंटनपटू अनुष्का पारीख आणि सौरभ शर्मा यांनी युक्रेनच्या खारकिव्ह येथे  खारकिव्ह आंतरराष्ट्रीय चॅलेंजच्या मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 4 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८२५ साली ब्रिटिशा कालीन भारतातील प्रसिद्ध पारशी स्वातंत्र्यसेनानी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, तसचं ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय नागरिक पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८८० साली भारतीय स्वातंत्र संग्रामातील प्रसिद्ध क्रांतिकारक तसचं, प्रख्यात समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ भूपेंद्रनाथ दत्त यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९५ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक व राष्ट्रकवि मैथिलीशरण गुप्त यांचे छोटे भाऊ सियाराम शरण गुप्त यांचा जन्मदिन.
 • सन १९१३ साली ब्रिटीश कालीन भारतातील  भारतीय नोकरशहा आणि मुत्सद्दी तसचं, पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव परमेश्वर नारायण हक्सर यांचा जन्मदिन.
 • सन १९४१ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व भारतीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसचं, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा जन्मदिन.
 • सन १९५२ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्मदिन.
 • सन १९६२ साली भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षक तसचं, बीसीसीआय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण शंकर मोरे यांचा जन्मदिन.

सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4 September Death / Punyatithi / Smrutidin

 • सन १९१२ साली भारतेंदु कालीन अग्रगण्य साहित्यिकांपैकी एक सुप्रसिद्ध साहित्यकार मोहनलाल विष्णू पंड्या यांचे निधन.
 • सन १९९७ साली पद्मश्री व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी, लेखक, नाटककार आणि थोर सामाजिक विचारवंत तसचं, धर्मयुग या लोकप्रिय हिंदी साप्ताहिक मासिकाचे माजी मुख्य संपादक धर्मवीर भारती यांचे निधन.
 • सन २००० साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट विनोदी कलाकार व अभिनेता मुकरी यांचे निधन.
 • सन २०१२ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचे निधन.
 • सन २०१५ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी, सर्जन व गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डी डिसूजा यांचे निधन.

मित्रांनो, वरील लेखाचे लिखाण आम्ही स्प्रधात्मक परीक्षेच्या उद्देशाने केलं आहे. या लेखाच्या मध्यमातून आपण ४ सप्टेंबर या दिनी घडलेल्या घटनांची माहिती जाणून घेवू शकता, तसचं, आपल्या मित्रांना देखील पाठवू शकता. धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top