Tuesday, September 19, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

5 September Dinvishes

मित्रांनो, आज आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती पदी विराजमान होणारे महान भारतीय स्वातंत्र्य सेनानी व राजनेता, शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन.  दर वर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशांत साजरा करण्यात येतो.

तसचं, संयुक्त राष्ट्र महासभेने 2012 मध्ये जाहीर केल्या नुसार ५ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दान दिवस (The International Day of Charity)  म्हणून साजरा करण्यात येतो.

जाणून घ्या ५ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 5 September Today Historical Events in Marathi

5 September History Information in Marathi
5 September History Information in Marathi

 

५ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 September Historical Event

  • सन १९६७ साली हा. वि. पाटसकर यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली.
  • सन १९७७ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने बाह्य सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी व्हॉएजर १ या उपग्रहाचे पृथ्वीवरून उड्डाण केले.
  •  सन १९८४ साली एसटीएस -४१-डी ही नासाच्या स्पेस शटल प्रोग्रामची १२ वी फ्लाइट आणि स्पेस शटल डिस्कवरीचे पहिले मिशन होते. हे डिस्कव्हरी यान आपली पहिली अंतराळ यात्रा पूर्ण करून कॅलिफोर्नियामधील एडवर्ड्स एअर फोर्स बेस येथे दाखल झाले.
  • सन २००५ साली इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ‘फ्लाईट ०९१’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.
  • सन २०१२ साली स्पेनमध्ये टेलिव्हिजनवर बंदी घालण्यात आलेल्या थेट बुलफाईटिंगच्या प्रसारणावर सहा वर्षाची बंदी उठवण्यात आली.

५ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 5 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८७२ साली  भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि तामिळनाडू राज्यातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेता व लोकमान्य टिळक यांचे शिष्य वी. ओ. चिदंबरम पिल्लै यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८८ साली प्रख्यात भारतीय तत्त्वज्ञ, शैक्षणिक आणि राजकारणी तसचं, स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९५ साली भारतीय इतिहासकार, लेखक आणि संशोधक अनंत काकबा अनंत प्रिओळकर यांचा जन्मदिन.
  • सन १९०५ साली प्रसिद्ध भारतीय उपन्यासकार, कथाकार व संपादक वाचस्पती पाठक यांचा जन्मदिन.
  • सन १९०७ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रतिभावंत भारतीय शिक्षणतज्ञ, महान मानवतावादी, स्वातंत्र्यसेनानी, विश्वकोश विचारवंत, आणि समाजवादी शिक्षणतज्ञ जयंत पांडुरंग नाईक यांचा जन्मदिन.
  • सन १९२८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय शास्त्रीय कथक नर्तक दमयंती जोशी यांचा जन्मदिन.
  • सन १९३३ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘रॅमन मॅग्सेसे पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी सेवानिवृत्त प्रमुख अधिकारी व लोकपाल लक्ष्मीनारायण रामदास यांचा जन्मदिन.
  • सन १९८६ साली भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा यांचा जन्मदिन.

५ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 5 September Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९१८ साली भारतीय टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति रतनजी जमशेदजी टाटा यांचे निधन.
  • सन १९८६ साली अशोक चक्र पुरस्कार सन्मानित भारतीय महान वैमानिक नीरजा भनोट यांचे निधन.
  • सन १९८६ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शिक्षणतज्ञ व हिंदी साहित्यिक अंबिका प्रसाद दिव्य यांचे निधन.
  • सन १९९१ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय  हिंदी कवी, लेखक, व्यंगचित्रकार आणि हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिका संवाद आणि पटकथा लेखक शरद जोशी यांचे निधन.
  • सन १९९५ साली प्रसिद्ध भारतीय गीतकार, संगीत दिग्दर्शक, गीतकार, लेखक आणि कवी सलील चौधरी यांचे निधन.
  • सन १९९७ साली शांततेचा नोबल पारितोषिक आणि भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध समाजसेविका, व कॅथोलिक चर्चच्या धर्मगुरू मदर टेरेसा यांचे निधन.

मित्रांनो, वरील लेखाच्या माध्यमातून आपण ५ सप्टेंबर या दिवसाचे संपूर्ण दिनविशेष माहिती करून घेवू शकता. स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने हा लेख उत्तम प्रकारचा असल्याने आपण सर्वांनी या लेखाचे आवश्य वाचन करून आपल्या मित्रांना देखील पाठवा. धन्यवाद.

Previous Post

भगवान कृष्णाने स्वतःच्याच मुलाला का दिला श्राप? हे होते कारण!

Next Post

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी संपूर्ण माहिती

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Dr Sarvepalli Radhakrishnan Information in Marathi

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी संपूर्ण माहिती

Teachers Day Speech in Marathi

शिक्षक दिनासाठी एक सुंदर भाषण

6 September History Information in Marathi

जाणून घ्या ६ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

Marathi Quotes for Instagram

खास Instagram वर  शेअर करण्यासाठी स्टेटस

Corona Goddess Temple in Solapur

कोरोना देवीची गोष्ट किती खरी आणि किती खोटी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved