जाणून घ्या ८ मे रोजी येणारे दिनविशेष

8 May Dinvishes

मित्रांनो , आजचा दिवस हा स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशांत घडलेल्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. प्लेगला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेले ब्रिटीश अधिकारी विल्यम चार्ल्स रॅन्ड हे लोकांचा छळ करीत असत. विनाकारण लोकांना त्रास देत असत, घरात जाऊन देवाची  विटंबना करीत, स्त्रियांवर नाहक अत्याचार करत, तसचं, घरातील प्रमुख माणसाला नामर्दपणाची वागणूक देत असत. त्यांचा हा उच्छाद असाच चालू राहिला त्यांच्या या अमानवी कृत्यांमुळे समाजातील सर्वच थरांमध्ये संतापाची लाट उसळू लागली.

ब्रिटीश अधिकारांचा लोकांवर होत असलेला अत्याचार पाहून पुण्यातील चापेकर बंधू यांच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली. परिणामी त्यांनी २२ जून १८९७ साली ब्रिटीश अधिकारी रॅन्ड यांच्यावर गोळी झाडली. परिणामी ब्रिटीश सरकारने त्यांना व त्यांच्या बंधूना पकडून सन १८९९ साली फाशीची शिक्षा दिली. अश्या या महान क्रांतीकारकांची आज पुण्यतिथी.

तसचं, शांततेचे प्रथम नोबल पुरस्कार विजेते स्विस मानवतावादी हेनरी डूनांट यांचा जन्मदिन त्यानिमित्ताने आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हेनरी डूनांट यांनी इ.स. १८६३ साली या मानवतावादी चळवळीची स्थापना केली होती. या चळवळीचे मुख्य उद्देश रोगी, घायळ तसेच युद्धकाळात पुकारण्यात येणाऱ्या बंदीची देखरेख करणे हा होय. या चळवळीचे मुख्यालय स्विझर्लंड मधील जिनेव्हा येथे आहे. सन १९२० साली भारतीय रेड क्रॉस सोसायटीचे गठन करण्यात आलं.

सन १९१५ आणि सन १९३९ साली झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धा दरम्यान या चळवळीने प्रमुख भूमिका निभावली होती. युद्धात घायळ झालेल्या सैनिकांना तसचं, नागरिकांनाची या संस्थेने मदत केली होती. वर्तमानात ही संस्था जगभरातील जवळपास १८६ देशांत आपली सेवा देत आहे. म्हणून ८ मे हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. याव्यतिरिक्त, आपण आज या लेखाच्या माध्यमातून काही विशिष्ट लोकांचे जन्मदिन, निधन आही त्यांची कार्य आदी घटनान बाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ८ मे रोजी येणारे दिनविशेष – 8 May Today Historical Events in Marathi

8 May History Information in Marathi

८ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 8 May  Historical Event

 • इ.स. १८६३ साली आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळ म्हणजेच आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस चळवळीची स्थापना करण्यात आली.
 • सन १८८६ साली अमेरिकन फार्मासिस्ट जॉन स्टिथ पेम्बेर्टन यांनी बनवलेलं कोका कोला हे शीतपेय बाजारात विक्रीस उपलब्द झालं.
 • इ.स. १८९८ साली इटालियन फुटबॉल लीगचा पहिला सामना खेळण्यात आला.
 • सन १८९९ साली थोर भारतीय क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी देण्यात आली.
 • इ.स १९१२ साली अमेरिकन फिल्म स्टुडीओ पॅरामाउंट पिक्चर्स कॉर्पोरेशनची स्थापना करण्यात आली होती.
 • सन १९३३ साली महात्मा गांधी यांनी अस्पृशता विरुद्ध २१ दिवसाचे उपोषण करण्यास बसले.
 • इ.स १९५४ साली केंद्र सरकारने चंद्रनगरला पश्चिम बंगाल प्रांतात समाविष्ट केले.
 • सन २००१ साली अमेरिकेने आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य नियंत्रण बोर्डातून माघार घेतली.
 • इ.स २००४ साली प्रसिद्ध श्रीलंकन क्रिकेटपटू गोलंदाज मुथैया मुरलीधरन यांनी ५२१ खेळाडू बाद करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला.

८ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 8  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

 • इ.स. १८२८ साली मानवी सेवांच्या महत्वपूर्ण कार्यात आपले महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल नोबल पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले स्विस मानवतावादी, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते तसचं, रेड क्रॉस या संस्थेचे जनक हेनरी डूनांट  यांचा जन्मदिन.
 • सन १८८४ साली अमेरिकन राष्ट्राचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष  हॅरी एस. ट्रूमॅन यांचा जन्मदिन.
 • इ.स. १८९५ साली ब्रिटीश कालीन भारतातील उडीसा येथील महान क्रांतिकारक व गांधीवादी कार्यकर्ता गोपबंधू चौधरी यांचा जन्मदिन
 • सन १९०६ साली भारतीय लष्करी दलाचे चौथे सेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९१६ साली भारतीय छायाचित्रकार रामानंद सेनगुप्ता यांचा जन्मदिन.
 • सन १९२६ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार तपन राय चौधरी यांचा जन्मदिन.
 • इ.स. १९२९ साली भारतीय पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तसचं हिंदुस्थानी संगीत क्षेत्रांत दिला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित बनारस घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका गिरीजा देवी यांचा जन्मदिन. त्यांनी गायिलेला ठुमरी हा शास्त्रीय संगीत प्रकारासाठी त्या विशेष ओळखल्या जातात.
 • सन १९८९ साली भारतीय बेसबॉलपटू दिनेश कुमार पटेल यांचा जन्मदिन. रिंकू सिंग यांच्या सोबत अमेरिकेतील प्रमुख बेसबॉल संघासोबत करार करणारे ते पहिले भारतीय नागरिक होत.

८ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 8 May Death / Punyatithi / Smrutidin

 • इ.स. १७७७ साली बंगालचे नवाब मीर कासीम यांचे दिल्ली जवळील कोतलाव या ठिकाणी अति दारिद्र्य आणि अस्पष्ट्पणामुळे त्यांचे निधन झाले.
 • सन १८९९ साली महान भारतीय क्रांतिकारक चापेकर बंधूंपैकी एक वासुदेव चापेकर यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
 • इ.स. १९१५ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यसेनानी व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे राजकीय नेता अमीरचंद बोंबवाल यांचे निधन.
 • सन १९२० साली भारतीय प्राचीन कालीन भाषा पाली व बौध्द साहित्याचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन
 • इ.स१९७२ साली भारतीय सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न सन्मानित प्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ आणि संस्कृत अभ्यासक पांडुरंग वामन काणे यांचे निधन.
 • सन १९८२ साली भारतातील महाराष्ट्र राज्यातील विदर्भीय मराठी भाषिक कवी व साहित्यकार आत्माराम रावजी देशपांडे यांचे निधन.
 • इ.स १९९३ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय इतिहासकार व मार्क्सवादी तत्त्ववेत्ता देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांचे निधन.
 • सन २०१३ साली उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात प्राचीन स्वरूप असणाऱ्या ध्रुपद या परंपरेचे भारतीय शास्त्रीय गायक झिया फरीउद्दीन डागर यांचे निधन.
 • इ.स २०१४ साली ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमचे(जी.पी.एस) मुख्य शोधकर्ता आणि डिझाइनर रॉजर ली ईस्टन यांचे निधन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top