Tuesday, July 1, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

करीना कपूर यांचे जीवनचरित्र

Kareena Kapoor Biography in Marathi

करीना कपूर हया एक नामवंत चित्रपट नायीका आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीच्या कपुर परिवाराची ती नात आहे. कपूर परिवाराची चैथ्या पिढीची यशस्वी सिने कलाकार आहे. तिने आपल्या स्वतःच्या बळावर हिन्दी चित्रपट सृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुंदर शरीरयष्टी व नृत्यात पारंगत असलेल्या करिनाने सर्व प्रकारच्या भुमिका चोखपणे निभावल्या आहेत.करिना कपुर राज कपुर यांची नात असून चित्रपटनायक रणधीर कपूर व नायिका बबिता यांची कन्या आहे. करिनाच्या परिवारातील सर्वच चित्रपटसुष्टीशी जुळलेले आहेत. करिना कपुरने 6 फिल्मफेयर अवार्ड जिंकले आहेत तर बॉलीवुड इंडस्ट्रीत सर्वाधीक मानधन घेणारी नायिका सुध्दा आहे.
Kareena Kapoor Biography

करीना कपूर यांचे जीवनचरित्र – Kareena Kapoor Biography in Marathi

करिना कपूर यांचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबई येथे सुप्रसिध्द कपूर परिवारात झाला. तिचे उपनाव बेबो आहे. वडील प्रसिध्द अभिनेता रणधीर कपूर व आई प्रसिध्द नायिका बबिता यांची ती व्दितीय कन्या. करीनास एक थोरली बहीण करिष्मा आहे जी एक सफल नायिका आहे.करिनाचे आजोबा नामवंत चित्रपट निर्माता व नायक राज कपूर आहेत तर तिचे आजोळचे आजोबा प्रसिध्द चित्रपट निर्माता हरी शिवदासानी आहेत करीना कपूर चे काका जसे ऋषी कपूर हे एक प्रसिध्द नायक आहेत, करिनाच्या परिवारातील जवळपास सर्वच चित्रपट सृष्टीतले नावाजलेले नायक व नायिका आहेत.करीनाचे वडील हे पंजाबी आहेत तर आई एक ब्रिटिश सिंधी परिवाराशी संबंधीत आहेत. करिनाचे नाव तिच्या आईने गर्भस्त असतांना कॅरोलीना नावाचे पुस्तक वाचले होते त्यावरून करीना हे नाव ठेवण्यात आले. लहानपणापासुन करिना फार खोडकर व हसतमुख मुलगी होती.लहानपणापासुन चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांशी भेटायची व ब-यापैकी संपर्कात होती. नामवंत अभिनेत्री नर्गिस व मिना कुमारींना ती आपला आदर्श मानते.करीनाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जमनाबाई नरसी स्कुल व उच्चमाध्यमिक शिक्षण डेहराडून येथील वेल्हम गल्र्स स्कुल येथुन झाले आहे. करिनास शाळेच्या अभ्यासात कधीच रूची नव्हती. त्यांनी मुंबईच्या मिठीबाई काॅलेज मधून 2 वर्षे वाणिज्य विषयांचा अभ्यास केला.त्यानंतर अमेरिकेत हॉवर्ड युनिव्हर्सिटी तुन मायक्रो कंप्युटर कोर्सही केला होता. भारतात परतल्यावरच त्यांना नायिका बनण्याची ईच्छा झाली आणि त्यांनी अॅक्टींग इंस्टीटयुट मध्ये अभिनयाचे धडे घेण्यास सुरूवात केली.

करिना कपूर च फिल्मी करियर – Kareena Kapoor Career

2000 मध्ये युध्दावर आधारित चित्रपट “रिफ्युजी” मधून करिनाने चित्रपटामध्ये प्रवेश केला. चित्रपट हिट ठरला त्यानंतर शाहरूख खान यांचा “अशोका” हया चित्रपटात करिनाने सशक्त भुमिका बजावली. 2001 मध्ये आलेला “कभी खुशी कभी गम” हा चित्रपट फार यशस्वी ठरला. करीना यशाच्या शिखरावर पोहोचली होती, करिनास एक सारखेच रोल करायला मिळत होते त्यामुळे तिच्या वाटयाला मोजक्याच भुमिका येवू लागल्या होत्या.2004 मध्ये करिनाने एका काॅलगर्ल ची भुमिका असलेला “चमेली” हा चित्रपट केला. हया चित्रपटाने करिनाचा अभिनय अधिकच निखरून आला. तिच्या अभिनयाची चर्चा होवू लागली, यानंतर करिनाचे ओमकारा (2006) जब वी मेट (2007) बाॅक्स आॅफिसवर हिट ठरले.2010 मध्ये आलेला वी आर फॅमिली चित्रपटाकरता त्यांना फिल्म फेयर चा बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस चा अवार्डही मिळाला. “जब वी मेट” साठी बेस्ट अॅक्ट्रेस चा अवार्डही मिळाला आहे. भारतातील 4 सर्वोत्तम चित्रपटांपैकी “3 इडियट्स्” (2011), रोमॅण्टीक ड्रामा “बाॅडीगार्ड” (2011) , सायन्स फिक्शन “रा वन” (2011) व सोशल ड्रामा “बजरंगी भाईजान” (2015) मध्ये करिनाने मुख्य भूमिका साकारली आहे त्यासोबतच तिचे “कूर्बान” (2009) व ड्रामा फिल्म “हिरोईन” (2012) चित्रपट तिच्या अभिनयासाठी ओळखले जातात.

करिना कपूर च व्यक्तीगत आयुष्य – Kareena Kapoor Personal Life

करिना कपूर यांचे व्यक्तीगत जीवन सर्वांनाच अवगत आहे. शाहीद कपूर सोबत सूत जुळल्याचे तिने कबूल केले होते त्यानंतर सैफअली खान या अभिनेत्या सोबत तिचे 2 ते 3 वर्ष प्रेमाचे संबंध होते.2012 मध्ये त्यांनी रितसर विवाह केला. विवाहानंतरही करिना चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिने नुकत्याच एका मुलाला जन्म दिला आहे. करिनाने मागील दशकात झिरो फिगरचे फॅशन टेड चालू केले होते. करिनाने 3 पुस्तकही लिहीली आहेत. यातील स्वतःच्या जीवनावर आधारीत एका पुस्तकाचा समावेश आहे. रिटेल चैन ग्लोब्स सोबत मिळून तिने स्वतःच्या कपडयांची एक आउटलाईन ही सुरू केली आहे.

करिना कपूर यांना मिळालेले अवार्डस् – Kareena Kapoor Award

  • करिनास फिल्मफेयर चे 10 नामाकंनं मिळाले व त्यापैकी 6 फिल्मफेयर अवार्ड तिने पटकावले आहेत.
  • सर्वप्रथम 2000 मध्ये रिफ्युजी साठी बेस्ट फिमेल डेब्यु अवार्ड मिळाला होता. 2005 मध्ये चमेली साठी विशेष सन्मान मिळाला होता.
  • 2007 मध्ये चित्रपट जब वी मेट साठी बेस्ट अॅक्ट्रेस अवार्ड
  • 2010 मध्ये वि आर फॅमिली साठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस अवार्ड
  • चित्रपट ओमकारा साठी बेस्ट क्रिटिक्स अवार्ड (2004)
  • चित्रपट देवसाठी बेस्ट क्रिटिक्स अवार्ड (2006)

करिनाबद्दल रोचक गोष्टी – Kareena Kapoor Facts

  • करिना कपूरने एकापाठोपाठ 7 यशस्वी चित्रपट करण्यात यश मिळवले आहे.
  • तीनही खान सुपरस्टार्स सोबत सुपर हीट चित्रपट देणारी ती एकमेव नायिका आहे.
  • वर्तमानात करीनाकडे किमान 16 देशी व विदेशी कंपन्यांची ब्रांड अॅंबेसिडर पदे आहेत.
  • करिना बाॅलीवुडची हायेस्ट पेड अॅक्ट्रेस मध्ये गणल्या जाते.
  • करिना कपूर यांना विदेश यात्रा करायचा फार छंद आहे. त्यांची सर्वात प्रीय जागा लंडन आहे.
  • 27 आॅक्टोबर 2011 मध्ये करिना कपुरचा मेणाचा पुतळा इंग्लंड मध्ये ठेवण्यात आला आहे.
  • करिना नेहमी आपले कपडे स्वतःच्या डिझायनर कडून तयार करून घेते.
लक्ष्य दया
: तुमच्या जवळ आणखी करिना कपूर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved