Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

हिंदी साहित्यातील समराध्नी… महादेवी वर्मा

Mahadevi Verma

महादेवी वर्मा या हिंदी साहित्यातील एक महान कवियत्री होऊन गेल्यात. त्यांना हिंदी साहित्यातील छायावाद युगाच्या चार प्रमुख स्तंभापैकी एक मानले जाते. हिंदी साहित्य जगतात उत्कृष्ट गद्य लेखनात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलीये.

महादेवी वर्मा या विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या. हिंदी साहित्यातील महान कवी सूर्यकांत त्रिपाठी उर्फ निराला यांनी त्यांना ”सरस्वती ” ची उपमा दिली होती. या व्यतिरिक्त त्यांना आधुनिक युगातील ”मीरा” सुद्धा संबोधले गेले. कारण त्यांनी आपल्या कवितांमधून प्रियकरापासून दूर होण्याच्या वेदना, विरह, दुःख, या भावना अत्यंत भावनात्मक रीतीने मांडल्या आहेत. त्या एक महान कवियत्री तर होत्याच त्याशिवाय त्या एक थोर समाजसेविका देखील होत्या.

महिलांच्या सशक्तीकरणावर आणि महिलांच्या शिक्षणावर त्यांनी विशेष भर दिला. इतकेच नव्हे तर महिलांना समाजात त्यांचे अधिकार मिळावेत व योग्य सन्मानाची वागणूक मिळावी याकरता त्यांनी अनेक क्रांतिकारी पाऊल उचलली.

याव्यतिरिक्त महादेवी वर्मा यांनी अश्या अनेक रचना लिहिल्या ज्यात त्यांनी स्त्रियांविषयी समाजाच्या असलेल्या तुच्छ आणि हीन वागणुकीचे वर्णन केले आहे.

शिवाय महिलांच्या दयनीय अवस्थेवर आणि महिलांवर होत असलेले अत्याचार, त्यांचे शोषण, आणि दुःखाला त्यांनी फार मार्मिकतेने आपल्या काव्यामधून व्यक्त केले.

महादेवी वर्मा यांनी आपल्या रचना ”शृंखला की कडियां” यात भारतीय महिलांच्या दुर्दशाचें भावपूर्ण आणि हृदयाला पिळवटून टाकणारे वर्णन केलेले आपल्याला दिसते. भारतीय साहित्यातील या महान कवियत्री बद्दल या लेखातून आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हिंदी साहित्यातील समराध्नी… महादेवी वर्मा – Mahadevi Verma

Mahadevi Verma in Marathi
Mahadevi Verma in Marathi

महादेवी वर्मा यांचा जीवन परिचय – Mahadevi Verma Biography In Marathi

पूर्ण नाव (Name):महादेवी वर्मा
जन्म (Birthday):२६ मार्च, १९०७, फरुखाबाद, उत्तर प्रदेश
मृत्यू (Death):११ सप्टेंबर, १९८७, प्रयाग, उत्तर प्रदेश (८० वर्ष)
वडील (Father Name):श्री. गोविंद प्रसाद वर्मा
आई (Mother Name):हेमरानी देवी
पती (Husband Name):डॉ. रुपनारायण वर्मा
शिक्षण (Education):एम. ए. (संस्कृत)
प्रसिद्ध रचना (Books):
  • स्मृती कि रेखाए,
  • पथ के साथी,
  • अतीत के चलचित्र,
  • दीपशिखा,
  • मेरा परिवार,
  • निहार,
  • शृंखला कि कडियां,
  • निरजा,

महादेवी वर्मा यांचा जन्म आणि सुरुवातीचा काळ – Mahadevi Verma Story

हिंदी साहित्यातील महान कवियत्री महादेवी वर्मा यांचा जन्म २६ मार्च, १९०७ ला उत्तरप्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यात एका अश्या कुटुंबात झाला जेथे गेल्या कित्येक वर्षांमध्ये मुलीचा जन्म झाला नव्हता. त्यामुळे त्यांचे बालपणात फार लाड झालेत आणि चांगल्या पद्धतीने पालन पोषण सुद्धा करण्यात आले.

आपल्या बहीण भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या होत्या. त्यांचे वडील गोविंद प्रसाद वर्मा हे सुपरिचित शिक्षक होते आणि त्यांनी वकीली देखील केली होती. त्यांची आई ही आध्यात्मिक व सतत ईश्वरभक्तीत तल्लीन राहणारी होती. धार्मिक ग्रंथ पुराणांमध्ये त्यांना फार आवड होती.

महादेवी वर्मा यांचे शिक्षण – Mahadevi Verma Education

महादेवी वर्मा यांच्या आई वडिलांना शिक्षणाचे महत्व चांगल्या रीतीने  माहिती असल्याने त्यांनी घरीच त्यांना इंग्रजी, संगीत, आणि संस्कृत विषयाचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. १९१२ साली इंदोरच्या मिशन स्कूल मधून त्यांच्या प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली.

पुढे अलाहाबाद येथील क्रास्थवेट महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. बालपणापासूनच त्यांना लिखाणाची आवड होती. वयाच्या अवघ्या ७ व्या वर्षांपासून त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली.

१९२५ च्या दरम्यान ज्यावेळी महादेवी वर्मा यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली तोवर त्यांच्या कवितांची ख्याती संपूर्ण देशभर व्हायला लागली होती आणि प्रसिद्ध पत्र-पत्रिकांमधून त्या छापून येऊ लागल्या होत्या. त्यामुळे महादेवींची लोकप्रियता प्रसिद्ध कवियित्रीच्या रूपात सर्वदूर पसरू लागली.

१९३२ साली महादेवी वर्मा यांनी उच्च शिक्षण प्राप्त करण्याच्या हेतूने इलाहाबाद युनिव्हर्सिटीतून एम.ए.संस्कृत मध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली. तोपर्यंत त्यांच्या रश्मी आणि निहार या दोन प्रसिद्ध कलाकृती प्रकाशित झाल्या होत्या आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळाली होती.

प्रख्यात लेखिका महादेवी वर्मा यांचे वैवाहिक जीवन – Mahadevi Verma Marriage

भारतीय समाजातील बालविवाहाच्या प्रथेमुळे विद्यार्थी दशेतच वयाच्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह १९१६ ला डॉ. स्वरूप नारायण वर्मा यांच्याशी करून देण्यात आला.

तरीही महादेवी वर्मा यांनी विवाहपश्चात देखील आपले शिक्षण सुरु ठेवले. प्रयागराज (इलाहाबाद) येथील वसतिगृहात राहून त्यांनी त्यांचे शिक्षण सुरु ठेवले.

त्यादरम्यान त्यांचे पती स्वरूप नारायण हे लखनौ मेडिकल कॉलेज च्या वसतिगृहात राहात होते.

महादेवी या अन्य महिलांच्या तुलनेत थोड्या वेगळ्या होत्या. त्यांचे केवळ साहित्यावर प्रेम होते. प्रेम संबंधांमध्ये आणि विवाह बंधनात त्यांना विशेष आवड नव्हती.

तरीही त्यांचे आणि त्यांच्या पतीचे संबंध चांगले होते.

असेही म्हंटल्या जाते कि महादेवींनी आपल्या पतीला दुसरा विवाह करण्याकरता आग्रह देखील केला परंतु त्यांच्या पतीने दुसरा विवाह केला नाही.

पतीच्या मृत्यूपश्चात त्या प्रयागराज येथेच राहिल्या आणि संपूर्ण जीवन तेथेच व्यतीत केले.

सुविख्यात लेखिका महादेवी वर्मा यांचे साहित्यातील योगदान – Mahadevi Verma Books

महादेवी वर्मा यांनी अनेक अद्भुत रचनांनी हिंदी साहित्यात आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

हिंदी साहित्यात आपल्या अद्भुत रचनांनी महादेवी वर्मा यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांना हिंदी साहित्यात त्यांच्या उत्कृष्ट रचना, उत्तम निबंध , तसच सुरेख रेखाचित्रांकरिता ओळखले जाते. त्यांच्या उत्कृष्ट आणि प्रमुख रचना अश्या आहेत.

महान लेखिका महादेवी वर्मा यांच्या प्रमुख रचना – Mahadevi Verma Kavita

महादेवी वर्मा यांचे गद्य साहित्य:

महादेवी वर्मानी गद्य साहित्यात सुद्धा आपली वेगळी छाप सोडलीये. त्यांनी रचलेल्या काही प्रसिद्ध कृती अश्या आहेत

  • संस्मरण (१९७२), पथ के साथी (१९५६)
  •  निबंध – संकल्पिता (१९६९), शृंखला की कडियां (१९४२).
  • रेखाचित्र – अतीत के चलचित्र (१९४१) आणि स्मृति की रेखायें (१९४३).
  • ललित निबंध – क्षणदा (१९५६)
  • प्रसिद्ध कहानियाँ – गिल्लू
  • संस्मरण, रेखाचित्र आणि निबंधाचा संग्रह – हिमालय (१९६३)

महान कवियत्री महादेवी वर्मा यांचा कविता संग्रह – Mahadevi Verma Poems

महादेवी वर्मा यांनी लिहिलेल्या हिंदी पद्यात काही प्रसिद्ध कविता अश्या आहेत

  • दीपशिखा (१९४२)
  • निहार (१९३०)
  • प्रथम आयाम (१९७४)
  • अग्निरेखा (१९९०)
  • नीरजा (१९३४)
  • रश्मि (१९३१)
  • सांध्यगीत (१९३६)                                                                                                                                            *
  • सप्तपर्णा (अनुदित -१९५९)

महादेवी वर्मा यांचे बालसाहित्यातील योगदान – Story By Mahadevi Verma

बालसाहित्यातील आपल्या रचनांमधून त्यांनी बालपणाला अक्षरशः जिवंत केलय. बालसाहित्यात त्यांच्या  द्वारे लिहिलेल्या प्रसिद्ध रचना अश्या आहेत.

  • आज खऱीदेंगे हम ज्वाला
  • ठाकुरजी भोलें है

याव्यतिरिक्त देखील त्यांनी अनेक लिखाण करून हिंदी साहित्यात आपले अमूल्य योगदान दिले व आपल्या प्रभावशाली आणि उत्कृष्ट रचनांच्या माध्यमातून हिंदी साहित्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली. साहित्यातील त्यांचे अमूल्य योगदान पाहता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

महादेवी वर्मा यांची सोपी आणि सुगम भाषा शैली:

महादेवी यांच्या रचना आपल्याला अत्यंत सोप्या आणि सुलभ भाषांमध्ये लिहिलेल्या पहायला मिळतात. त्यामुळे वाचकांना सुद्धा त्या सहजतेने उमगायच्या. आपल्या रचनांमध्ये त्यांनी हिंदी समवेत संस्कृत, इंग्रजी, उर्दू, आणि बांगला भाषेतील शब्दांचा सुरेख पद्धतीने उपयोग केला आहे. आणि हेच त्यांच्या रचनांचे वैशिष्ट्य देखील समजले जाते.

याव्यतिरिक्त महादेवींनी आपल्या रचनांमध्ये अलंकार, लोकपंक्ती, म्हणी, यांचा वापर केलाय. अशापद्धतीने महादेवीनी आपल्या रचनांमध्ये आलंकारीक,  विवेचनात्मक, भावनात्मक, व्यंगात्मक, आणि वर्णनात्मक शैली वापरत अन्य अनेक भाषांचा उपयोग करीत आपल्या रचनांना हिंदी साहित्यात वेगळे स्थान मिळवून दिले.

कधी शिक्षिका होऊन शिकविले तर कधी समाजसुधारणेकरता पुढाकार घेतला – Mahadevi Verma Works

महादेवी वर्मा या एक उत्तम शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या,  प्रयाग महिला विद्यापीठात त्यांनी ज्ञानदानाचे पुण्यकर्म केले होते. शिवाय याच विद्यापीठात त्या कुलपती पदावर देखील राहिल्या होत्या. याव्यतिरिक्त त्या एक महान समाज सुधारक सुद्धा होत्या. भारतीय समाजात महिलांची दयनीय अवस्था सुधारण्याकरिता व समाजात त्यांना योग्य दर्जा मिळावा यासाठी महत्वपूर्ण कार्य केलं.

आपल्या रचनांमधून त्यांनी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडली. यासोबतच त्यांनी पहिले महिला कवी संमेलन देखील सुरु केले होते. भारतात प्रथम महिला कवी संमेलन महिला विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते. बौद्ध धर्मातील उपदेशाने त्यांना फार प्रभावित केले होते.

या धर्माप्रती त्यांची विशेष निष्ठा होती, एवढेच नव्हे तर महादेवी वर्मा यांनी देशाच्या स्वातंत्र्याकरिता सुरु असलेल्या आंदोलनात देखील आपले महत्वपूर्ण योगदान दिले होते.

महादेवी वर्मा यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार  – Mahadevi Verma Awards

महान लेखिका महादेवी वर्मा याना त्यांच्या साहित्यातील योगदानामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार असे आहेत –

  • साहित्यातील अपूर्व योगदानाकरता १९८८ साली त्यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने गौरविले
  • १९८२ ला महादेवी वर्मा यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
  • १९५६ साली त्यांना पद्म भूषण पुरस्कार देण्यात आला
  • १९७९ ला महादेवी वर्माना साहित्य अकादमी फेलोशिप ने गौरविण्यात आले,
  • १९४२ साली व्दिवेदी पदक,
  • १९४३ भारत भारती पुरस्कार,
  • १९४३ लाच मंगला प्रसाद पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाले आहेत.

महान लेखिका महादेवी वर्मा यांचे निधन – Mahadevi Verma Death

हिंदी साहित्याच्या युग प्रवर्तक मानल्या जाणाऱ्या महान लेखिका महादेवी वर्मा यांनी आपले संपूर्ण आयुष्य इलाहाबाद येथे व्यतीत करीत आजीवन साहित्याची साधना केली. आपल्या रचनांमधून त्यांनी केवळ भारतीय स्त्रियांची दुर्दशाच मांडली असे नव्हे तर समाजातील दलित, गरीब, गरजवंतांच्या अनेक मुद्द्यांना वाचा फोडण्याचे कार्य केले. ११ सप्टेंबर १९८७ ला त्यांचे निधन झाले.

महादेवी वर्मा यांनी आपल्या दूरदृष्टीकोन, महान विचारांनी, व सृजनात्मक लेखन शैलीच्या जोरावर हिंदी साहित्यात आपले अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या लेखन प्रतिभेला पाहून हिंदी साहित्याचे महान कवी सूर्यकांत त्रिपाठी उर्फ निराला महादेवींचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी महादेवींना ”साहित्यातील सरस्वतीची ” उपमा दिली.

यांच्या व्यतिरिक्त देखील महादेवींच्या अद्भुत व्यक्तित्व आणि विलक्षण प्रतिभेला पाहता अनेक महान रचनाकारांनी त्यांच्या साहित्याने प्रभावित होऊन त्यांना ‘साहित्य सम्राज्ञी’ सह अनेक संज्ञा वापरत त्यांचे कौतुक केले. महादेवी वर्मा याना साहित्यातील आणि  विकासातील योगदानाकरिता कायम स्मरणात  ठेवले जाईल.

Read More:

  • रामधारी सिंह दिनकर यांचे जीवन चरित्र

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी महादेवी वर्मा बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved