• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Tuesday, May 17, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Marathi Biography

राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचे जीवनचरित्र

रामधारीसिंह  दिनकर / Ramdhari Singh Dinkar हे एक हिंदी कवी,निबंधकार,देशभक्त आणि उत्तम विद्वान व्यक्ती होते. त्यांना भारतातील श्रेष्ठ आधुनिक कविमधून एक मानले जाते. भारतीय स्वातंत्र्य युद्धावेळी त्यांनी आपल्या कवितांनी इंग्रजांविरोधात युद्ध पुकारले होते. देशभक्तीवर कविता लिहून ते लोकांना राष्ट्रभावनेने भरून टाकत.

त्यांच्या कविता लोकांच्या मनात खोलवर उतरत. देशभक्तीने भरलेल्या कवितांच्या लेखनाबद्दल त्यांना ‘राष्ट्रकवी’ अशा संबोधनाचा दर्जा मिळाला. हिंदी कवी संमेलनाचे ते दैनिक कवी होते जो त्या वेळी प्रसिद्ध संमेलनात भाग घ्यायचे. प्रसिद्ध कवी तेथे लोकांना आपल्या राष्ट्रभक्तीवर कविता ऐकवत.

Ramdhari Singh Dinkar

राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांचे जीवनचरित्र / Ramdhari Singh Dinkar Biography in Marathi

भारताचे वर्तमान प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी रश्मीरथीचे इंग्लिश अनुवाद केल्याबद्दल लीलागुजधर स्वरूप यांना प्रशंसेचा संदेश पाठविला होता. त्यांना सन्मान देण्याच्या उद्दिष्टाने २००८ साली भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रामधारी सिह दिनकर यांच्या कवितां भारतीय संसद हॉलमध्ये लावल्या होत्या.

२३ ऑक्टोबर २०१२ साली भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २१ प्रसिद्ध लेखकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात “राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर-साहित्य रत्न पुरस्कार“ देवून सन्मानित केले होते. त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रकवी रामधारीसिंह “ दिनकर “ यांच्या स्वातंत्र्यलढयावेळीच्या योगदाना विषयी सर्वांसमोर मत मांडले होते.

भारताचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी नेहमीच ‘दिनकर‘ यांचा उच्च सन्मान केला. याशिवाय असे अनेक गणमान्यनीय पुढारी आहेत ज्यांनी आपल्या भाषणांमध्ये, दिनकरांच्या कवितांविषयी प्रशंसा केली. त्यामध्ये शिवराज पाटील, लालकृष्ण आडवाणी, सोमनाथ चटर्जी, सुलबू खंडेलवाल, भवानीप्रसाद मिश्र आणि सेठ गोविंददास यांचा समावेश आहे.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये ‘दिनकर‘ यांनी क्रांतिकारी अभियानांमध्ये मदत केल्यानंतर ते गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संघर्षात सामील झाले. बरेचदा ते स्वतःला एक खराब गांधीवादी मानत. कारण ते युवांमध्ये आपल्या देशाच्या अपमानांचा बदल घेण्यास प्रेरित करीत जागृती करत.

’कुरुक्षेत्रामध्ये‘ त्यांनी बरेचदा ते मान्य केले की, स्वातंत्र्यासाठी हे करणे अत्यंत जरुरी होते. शक्तीनेच त्यांचा प्रतिकार करणे जरुरी होते.

तीनवेळा ‘दिनकर’ राज्यसभेसाठी निवडून आले. ३ एप्रिल १९५२ ते २६ जानेवारी १९६४ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य राहिले.त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना १९५९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित केले गेले. यासोबतच १९६० मध्ये सुरुवातीच्या काळात भागलपूर विद्यापीठ (बिहार) कुलगुरू सुद्धा राहिले.

आपातकालीन वेळेस जयप्रकाश नारायण यांनी रामलीला मैदानात एक लाख लोकांना जमा करण्यासाठी ‘दिनकर‘ यांच्या कविता सादर केल्या होत्या.
त्यापैकी,” सिंघासन खाली करो के जनता आती है“ ही कविता राष्ट्रभक्तीने ओतप्रोत होती.

जीवनचरित्र:

‘दिनकर‘ यांचा जन्म २३ सप्टेंबर १९०८ साली बिहार येथील मुंगेर जिल्ह्यातील सिमरिया या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाबुरवीसिंह आणि आईचे नाव मनरूपदेवी होते. शाळा आणि महाविद्यालयात हिंदी, संस्कृत, मैथिली, बंगाली, उर्दू आणि इंग्रजी साहित्य वाचून त्याचा अभ्यास केला.

‘दिनकर‘ मुख्यतः इकबाल, रविंद्रनाथ टागोर, किट्स आणि मिल्टन यांच्या साहित्यिक कार्यांनी फारच प्रभावित झाले होते. एका विद्यार्थ्याच्या रुपात ‘दिनकर‘ अनेक समस्यांशी संघर्ष करीत. त्यांच्या परिवाराची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती. जेव्हा ते मोकामा उच्च माध्यमिक विद्यालयास बंद होईपर्यंत शाळेत राहु शकत नव्हते.त्यांना त्यांच्या गावाहून गंगेत 11 कि.मी. चा प्रवास नावेने करावा लागत होता. त्यामुळे नाव पकडण्यासाठी मधातच शाळा सोडून जावे लागे.

होस्टल मध्ये राहणे त्यांच्यासाठी समर्थनीय नव्हते. ते आपल्या मित्रांसोबत कवितांचे पठन करत, लोकांना प्रेरित करत. अशा संघर्षमय वातावरणात ‘दिनकर‘ मोठे झाले आणि राष्ट्रकवी बनले. ’दिनकर‘ यांनी १९२० मध्ये पहिल्यांदा गांधीजींना पहिले होते.

कार्य :

त्यांचे मन विररसाने भरलेल्या कवितांना लिहिण्यातच गुंग राहायचे. ” उर्वशी ” हे त्याला अपवाद आहे. त्यांनी “रश्मीरथी, परशुराम की प्रतीक्षा“ सारख्या रचना लिहिल्या. कवी भूषण यांच्या काळापासूनच त्यांना सर्वात प्रसिध्द आणि बुद्धिमान कवी मानले जाते.

आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी यांनी लिहिले आहे की ‘दिनकर‘ त्या लोकांमध्ये जास्त प्रसिध्द होते, ज्यांची मातृभाषा हिंदी नाही. आपल्या मातृभाषावाल्यांसाठी ते प्रेमाचे प्रतिक होते.

हरिवंशराय बच्चन यांच्या मते ते भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराचे खरे हकदार होते. रामब्रिक्ष बेनिपुरी यांनी लिहिले आहे की ‘दिनकर‘ यांच्या कविता स्वातंत्र्ययुद्धावेळी युवकांनी फार पसंत केल्या. नामवर सिंह यांनी लिहिले होते की, ते आपल्या काळातील सूर्य होते. राजनाथ सिंह यांनी दिनकरांना स्फुर्तीचा झरा म्हटले आहे.

हिंदी लेखक राजेंद्र यादव यांचा ग्रंथ ‘सारा आकाश‘ मध्ये त्यांनी दिनकरांच्या एका लोकप्रिय कवितेच्या काही ओव्या घेतल्या आहेत,ज्या लोकांना नेहमी प्रेरित करीत आल्या आहेत.

कवितांसोबतच ‘दिनकर‘ सामाजिक आणि राजनीतिक मुद्द्यांवरही आपल्या कविता लिहित. त्यामध्ये त्यांनी मुख्यतः सामाजिक-आर्थिक भेदभावावर सर्वांचे लक्ष केंद्रित केले.

त्यांच्याद्वारा रचित ‘कुरुक्षेत्र‘ हा कवितासंग्रह महाभारताच्या शांतीपर्वावर आधारित होता. ह्या कविता तेव्हा लिहिल्या गेल्या जेव्हा जगात दुसऱ्या महायुद्धाचे सावट सर्वांना प्रभावित करीत होते.

‘कुरुक्षेत्र‘ मध्ये त्यांनी ‘कृष्णा की चेतावणी’ही कविता पण लिहिली. यास स्थानिक लोकांची फारच साथ व प्रशंसा मिळाली. त्यांच्याद्वारा रचित ‘रश्मीरथी‘ हे हिंदू महाकाव्य, महाभारतचा सर्वोत्कृष्ट अनुवाद मानले जाते.

पुरस्कार आणि सन्मान:

त्यांना काशी नगरी प्रचारिणी सभा,उत्तरप्रदेश सरकार आणि भारत सरकार यांच्या कडून महाकाव्य ‘ कुरुक्षेत्र ‘ साठी अनेक पुरस्कार मिळाले.’ संस्कृति के चार अध्याय ‘ साठी त्यांना १९५९ मध्ये साहित्य अकादमी अवार्ड मिळाला. भारत सरकारने त्यांना १९५९ मध्य ‘ पद्मभूषण ‘ पुरस्कार देवून सन्मानित केले. भागलपूर विद्यापीठाने त्यांना L.L.D. ची पदवी देवून सन्मानित केले.

राजस्थान विद्यापीठ, उदयपुर यांच्या तर्फे ८ नोव्हेंबर १९६८ मध्ये ‘साहित्य-चौदमनी‘ सन्मान दिला गेला. ’उर्वशी‘ कविता संग्रहासाठी त्यांना साल १९७२ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार देवून सन्मानित केले गेले. १९५२ मध्ये ते राज्यसभेचे सदस्य बनले. ’दिनकरांच्या‘ चाहत्यांनी त्यांना ‘राष्ट्रकवी‘ ही पदवी बहाल केली आहे.

प्रमुख कविता :-

  • विजय संदेश (१९२८)
  • प्राणभंग (१९२९)
  • रेणुका (१९३५)
  • हुंकार (१९३८)
  • रसवंती (१९३९)
  • द्वंद्वगीत (१९४०)
  • कुरुक्षेत्र (१९४६)
  • धूप छांह (१९४६)
  • सामधेनी (१९४७)
  • बापू (१९४७)
  • इतिहास के आंसू (१९५१)
  • धूप और धुआ (१९५१)
  • मिर्च का मजा (१९५१)
  • रश्मीरथी (१९५२)
  • दिल्ली (१९५४)
  • नीम के पत्ते (१९५४)
  • चक्रवाल (१९५६)
  • कविश्री (१९५७)
  • सीपे और शंख (१९५७)
  • नये सुभाषित (१९५७)
  • रामधारी सिंह दिनकर
  • उर्वशी (१९६१)
  • परशुराम की प्रतिक्षा (१९६३)
  • कोयला और कवित्व (१९६४)
  • मृत्तितिलक (१९६४)
  • आत्मा की आंखे (१९६४)
  • हारे को हरिनाम (१९७०)
  • भगवान के डाकिये (१९७०)

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी रामधारी सिंह दिनकर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा रामधारी सिंह दिनकर यांचे जीवन चरित्र  / Ramdhari Singh Dinkar Biography in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे facebook page लाइक करायला सुधा.

नोट : Ramdhari Singh Dinkar Biography – रामधारी सिंह दिनकर यांचे जीवन चरित्र या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

बहिणाबाई चौधरी माहिती

Bahinabai Chaudhari Biography in Marathi अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर,आधी हाताले चटके तवा मियते भाकर. बहिणाबाई चौधरी यांच्या या...

by Editorial team
May 16, 2022
पी.टी.उषा माहिती
Marathi Biography

पी.टी.उषा माहिती

PT Usha Mahiti तिच्या धावण्याच्या वेगाने अनेकांना आश्चर्यचकित केले. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदके, पुरस्कार तिने प्राप्त केले. अनेक विक्रम केले,...

by Editorial team
May 16, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved