Tuesday, June 24, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २७ मार्च रोजी येणारे दिनविशेष

 

27 March Dinvishesh

आजच्या दिवसाचे विशेष महत्व सांगायचे म्हणजे आज जागतिक रंगमंच दिन, याची सुरुवात सर्वप्रथम १९६२ साली करण्यात आली. आपल्या देशातील कलाप्रेमीचे महत्व वाढविण्यासाठी तसचं, त्यांची जाणीव सरकार, राजकारणी व विविध संस्थाना व्हावी याकरिता तसेच, कलाकारांना आपली कलेचे प्रदर्शन करता यावे याकरिता त्यांना एक मार्ग म्हणून सन १९६२ सालापासून दरवर्षी २७ मार्च हा दिवस जागतिक रंगमंच दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो.

याच प्रकारे आणखी काही ऐतिहासिक घटना, शोध, जन्मदिन, मृत्युदिन विशेष घटनांची माहिती (27 March Today Historical Events in Marathi) आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत..

जाणून घ्या २७ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 27 March Today Historical Events in Marathi

27 March History Information in Marathi

२७ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 March Historical Event

  • इ.स. १६६७ साली शिवाजी महाराजांना सोडून मोघलाईत जाणारे सेनापती नेताजी पालकर यांचे मोघलाईत गेल्यानंतर मुघल बादशाहा औरंगजेब याने त्यांचे धर्मांतर केले व त्यांचे नाव महमंद कुली खान ठेवले.
  • सन १६६८ साली इंग्लंड देशाचे शासक चार्ल्स द्वितीय यांनी मुंबई प्रांताला ब्रिटीश शासकांच्या इस्ट इंडिया कंपनीच्या हवाली केलं
  • इ.स. १७९४ साली अमिरीकेतील नौदल सेनेची स्थापना करण्यात आली.
  • सन १८४१ साली वाफेवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनची यशस्वी चाचणी सर्वप्रथम न्यूयार्क देशांत घेण्यात आली.
  • इ.स. १८५५ साली कॅनेडियन फिजिशियन(वैद्य) अब्राहम गेस्नर यांनी केरोसीन (रॉकेल) चे नमुने शोधले.
  • सन १८७१ साली पहिला आंतरराष्ट्रीय रग्बी सामना स्कॉटलंड आणि इंग्लंड या दोन राष्ट्रांच्या संघादरम्यान खेळण्यात आला.
  • सन १९६१ साली पहिला जागतिक रंगमंच दिन साजरा करण्यात आला.
  • इ.स. १९६६ साली २० मार्च रविवार या दिनी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या एक कुत्र्याला सापडला, यानंतर सन १९८३ साली हा चषक पुन्हा चोरीला गेला तो आजतागायत सापडलेला नाही.
  • सन १९९२ साली शहनाई वादक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकार तर्फे देण्यात येणारा तानसेन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • इ.स. २००० साली भारतीय चित्रपट निर्माते व दिग्दर्शिक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.

२७ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 27 March Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १७८५ साली फ्रांस देशाचे राजा लुई(सतरावा) यांचा जन्मदिन.
  • सन १८४५ साली जर्मन देशातील भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार विजेता व यांत्रिक अभियंता विल्हेल्म कॉनराड रेंटगेन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८६३ साली  कार आणि विमानांच्या इंजिनच्या डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेले इंग्रज अभियंता सर फ्रेडरिक हेनरी रॉयस यांचा जन्मदिन.
  • सन १९०१ साली अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक आणि चित्रकार तसचं, डोनाल्ड डक कथांचे लेखक आणि कलाकार व स्क्रूज मॅकडकचे निर्माता कार्ल बार्क्स यांचा जन्मदिन. डक मॅन आणि द गुड डक आर्टिस्ट म्हणून त्यांना ओळखल जाते.
  • इ.स. १९१५ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, गांधीवादी आणि उत्तर-पूर्व भारतीय आसाम राज्याच्या आमदार पुष्पलता दास यांचा जन्मदिन.
  • सन १९१७ साली भारतीय कवी कामाखी प्रसाद चट्टोपाध्याय यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९२३ साली प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी विद्वान लीला दुबे यांचा जन्मदिन.
  • सन १९३९ साली भारतीय राजनेता बनवारी लाल जोशी यांचा जन्मदिन.
  • इ.स. १९५४ साली मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचे प्रोफेसर हेमंत जोशी यांचा जन्मदिन.
  • सन १९९० साली भारतीय फिल्ड हॉकी खेळाडू हरबीरसिंग संधू यांचा जन्मदिन.

२७ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 27 March Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८९८ साली महात्मा गांधी यांचे अनुयायी तसचं, पाकिस्तानी गांधी म्हणून ख्याती मिळविणारे ब्रिटीश भारताचे तत्वज्ञ सर सय्यद अहमद खान यांचे निधन. ब्रिटीश कालीन भारतात त्यांनी एंग्लो-ओरिएन्टल महाविद्यालय आणि अलिगढ येथे मुस्लीम विद्यापीठाची स्थापना केली होती.
  • सन १९५२ साली जपानी मोटार कंपनी टोयोटाचे संस्थापक किचीरो टोयोटा यांचे निधन.
  • इ.स. १९६७ साली नोबल पारितोषिक विजेते झेक राष्ट्रीय रसायनशास्त्रज्ञ व शोधक, तसेच, पोलरोग्राफिक पद्धतीचे शोधकर्ता इलेक्ट्रोअनॅलिटिकल पद्धतीचे जनक जारोस्लाव्ह हेरोवस्क यांचे निधन.
  • सन १९६८ साली पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले रशियन अंतराळवीर युरी गागरीन यांचे निधन.
  • इ.स. १९९२ साली महाराष्ट्रीय साहित्यिक तसचं, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचे निधन.
  • सन १९९७ साली संगीत नाटकामध्ये काम करणारे मराठी गायक व अभिनेते भार्गवराम आचरेकर उर्फ मामा आचरेकर यांचे निधन.
  • इ.स. १९१५ साली महान भारतीय क्रांतिकारक पंडित कांशीराम यांचे निधन.
  • सन २००० साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रिया राजवंश यांचे निधन.

वरील लेखाच्या माध्यमातून आपणास २७ मार्च ला घडलेल्या संपूर्ण घटनांची माहिती मिळालीच असेल, आज जागतिक रंगमंच दिन आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तींच्या अंगी कुठला ना कुठला कलाकार हा दडलेला असतो, गरज आहे ती फक्त स्वत:ला ओळखण्याची.

आपण सुद्धा आपल्यात दडलेली कला जागृत करून लोकांसमोर सादर करा, आज कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी रंगमंच हे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तरी, आपण सर्वांना रंगमंच दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद..

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved