Monday, May 5, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २९ मे रोजी येणारे दिनविशेष

29 May Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, काही महान व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी बाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सन १९५३ साली आजच्या दिवशी भारतीय नेपाळी गिर्यारोहक तेनजिंग नोर्गे व न्युझीलंड येथील गिर्यारोहक एडमंड हिलरी या दोन गीर्यरोहकानी जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्ट सर करून नवीन विश्व विक्रम आपल्या नावे केला.

शिवाय, आज आपल्या देशाचे पाचवे पंतप्रधान व शेतकरी संघटनेचे नेता, स्वातंत्र्य सेनानी चौधरी चरण सिंह यांची पुण्यतिथी. आश्याच प्रकराची काही महत्वपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

जाणून घ्या २९ मे रोजी येणारे दिनविशेष – 29 May Today Historical Events in Marathi

 

29 May History Information in Marathi
29 May History Information in Marathi

२९ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 May  Historical Event

  • इ.स. १८४८ साली विस्कॉन्सिन हे राज्य अमेरिकेचे ३० वे राज्य बनले.
  • सन १९१९ साली विश्वविख्यात जर्मन भौतिकशास्त्रज्ञ सर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सामान्य सापेक्ष सिद्धांताची चाचणी केली.
  • सन १९५३ साली न्युझीलंड देशांतील गिर्यारोहक एडमंड हिलेरी व नेपाळी-भारतीय गिर्यारोहक तेनजिंग नोर्गे माउंट एवरेस्टवर पोहचणारे पहिले व्यक्ती ठरले.
  • सन २००७ साली जपान देशाच्या महिला रियो मोरी यांनी विश्वसुंदरी चा किताब पटकाविला.
  • सन २००८ साली भारतीय जनता पक्षाचे नेता वी. एस. येदुरप्पा यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
  • सन २०१० साली भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी  हेनान प्रांतातील लुओयांग येथे पहिल्या शतकातील प्राचीन श्वेताश्वा व्हाईट हॉर्स मंदिर संकुलात भारतीय शैलीतील बौद्ध मंदिराचे उद्घाटन केले.

२९ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 29  May Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८६५ साली कलकत्ता शहरावर आधारित मासिक पुस्तिका मॉडर्न रिव्ह्यूचे संस्थापक व संपादक तसचं हिंदू महासभेचे नेता, स्वातंत्र्य सेनानी रामानंद चटर्जी यांचा जन्मदिन.
  • सन १९०५ साली भारतीय संगीताच्या क्षेत्रात आपल्या स्वतंत्र गायकीने स्वरमुद्रा उमटविनाऱ्या ‘गानहिरा’  हिराबाई बडोदेकर यांचा जन्मदिन.
  • सन १९०६ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार, लेखक आणि स्वातंत्र्यसैनिक कन्हैयालाल प्रभाकर मिश्रा यांचा जन्मदिन.
  • सन १९०६ साली प्रख्यात ब्रिटीश इंग्लिश लेखक व आर्थरियन कादंबऱ्यांचे रचनाकार टेरेंस हॅनबरी “टिम” व्हाईट यांचा जन्मदिन.
  • सन १९१४ साली विश्वविख्यात विश्वातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्ट ची सर करणारे नेपाळी-भारतीय गिर्यारोहक तेनझिंग नॉर्गे यांचा जन्मदिन.
  • सन १९१७ साली प्रसिद्ध अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन फिट्झरॅल्ड कॅनेडी यांचा जन्मदिन.
  • सन १९२९ साली नोबल पारितोषिक विजेते ब्रिटीश सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ पीटर वेअर हिग्ज यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली शोर्य चक्र पुरस्कार सन्मानित भारतीय वायुसेना दलाचे माजी वायुसेना दल प्रमुख एअर चीफ मार्शल फली होमी मेजर यांचा जन्मदिन.

२९ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 29  May Death / Punyatithi /Smrutidin

  • इ.स. १८१४ साली विश्वविख्यात फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्ट यांच्या पहिल्या पत्नी महाराणी जोसेफिन उर्फ जोसेफिन डी बुहार्नैस यांचे निधन.
  • इ.स. १८२९ साली विद्युत पृथक्करण प्रक्रीयेद्वारे सोडियम आणि पोटॅशियम मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ सर हंफ्रे डेव्ही यांचे निधन.
  • इ.स. १८९२ साली इराण देशातील बहाई पंथाचे संस्थापक बहाउल्ला यांचे निधन.
  • सन १९३३ साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, पत्रकार आणि संघटन कर्ता लोकराम नयनराम शर्मा यांचे निधन.
  • सन १९५४ साली व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार प्राप्त ब्रिटीश सैन्य दलाचे थोर सैनिक फ्रेडरिक विल्यम हेजेस यांचे निधन.
  • सन १९७१ साली प्रख्यात भारतीय चित्रपट अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे निधन.
  • सन १९७७ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय भाषातज्ञ, शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक सुनीती कुमार चॅटर्जी यांचे निधन.
  • सन १९८७ साली स्वातंत्र्य भारताचे पाचवे पंतप्रधान व भारतीय शेतकरी नेता चौधरी चरण सिंह यांचे निधन.
  • सन २००७ साली महाराष्ट्र राज्य लता मंगेशकर पुरस्कार विजेते प्रसिद्ध भारतीय हिंदी व मराठी चित्रपट संगीतकार स्नेहल भटकर यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved