Friday, May 9, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २५ जुलै रोजी येणारे दिनविशेष

25 July Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोध कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २५ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 25 July Today Historical Events in Marathi

25 July History Information in Marathi
25 July History Information in Marathi

२५ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 July Historical Event

  • इ.स. १६४८ साली आदिलशहाच्या आज्ञेवरुन मुस्तफाखान याने जिंजीनजीक शहाजीराजे यांना कैद केले.
  • इ.स. १६८९ साली फ्रांस देशाने इंग्लंड देशाविरुद्ध युद्धाची घोषणा केली.
  • इ.स. १८१३ साली भारतात सर्वप्रथम नौका दौड प्रतियोगिता सुरु करण्यात आली.
  • इ.स. १८३७ साली इलेक्ट्रिक टेलीग्राफच्या वापराचे प्रथम यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात आलं.
  • सन १९१७ साली कॅनडा देशांत आयकर लागू करण्यात आला.
  • सन १९७८ साली जगतील पाहिले आय.व्ही. एफ (टेस्ट ट्यूब) बाळ लुईस ब्राऊन यांचा जन्म झाला.
  • सन १९९२ साली एस. डी शर्मा हे भारताचे नव्या क्रमांकाचे राष्ट्रपती बनले.
  • सन १९९७ साली इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कार जवाहरलाल नेहरूपुरस्काराने गौरविण्यात आलं.
  • सन १९९७ साली भारताच्या राष्ट्रपती पदी विराजमान होणारे के. आर. नारायण हे भारतातील दहावे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती ठरले.
  • सन १९९९ साली अमेरिकन माजी व्यावसायिक रोड रेसिंग सायकलपटू लान्स लान्स आर्मस्ट्राँग यांनी आपली पहिली टूर डी फ्रांस सायकल शर्यत जिंकली.
  • सन २००७ साली भारताच्या तात्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची आपल्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

२५ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८७५ साली भारतातील आयरिश वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक जिम कार्बेट (Jim Corbett) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९४ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी आणि संस्कृत भाषेचे समिक्षक व शोधकर्मी परशुराम चतुर्वेदी यांचा जन्मदिन.
  • सन १९१९ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायक व संगीतकार तसचं, मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून लोकप्रिय असणारे सुधीर फडके यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी विश्वनाथ वामन बापट यांचा जन्मदिन.
  • सन १९२९ साली प्रख्यात भारतीय राजकारणी व माजी लोकसभा अध्यक्ष तसचं, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य सोमनाथ चटर्जी यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय वैज्ञानिक व उद्योगपती तसचं, औषध निर्माण कंपनी सिप्लाचे (CIPLA) अध्यक्ष युसुफ ख्वाजा हमीद यांचा जन्मदिन.
  • सन १९७५ साली माजी भारतीय केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रमोद महाजन यांचे पुत्र व दूरदर्शन कलाकार आणि माजी वैमानिक राहुल प्रमोद महाजन यांचा जन्मदिन.

२५ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 25 July Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८८० साली सार्वजनिक काका म्हणून प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रीयन समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व महाराष्ट्रातील स्वदेशी चळवळीचे जनक तसचं, पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक गणेश वासुदेव जोशी यांचे निधन.
  • सन २०१२ साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचे निधन.
  • सन १९७७ साली पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक व लष्करी शिक्षणाचे प्रसारक कॅप्टन शिवरामपंत दामले यांचे निधन.
  • सन १९९५ साली ब्रिटीश कल्पित बालकथा लेखक व पत्रकार जेनिस इलियट (Janice Elliott) यांचे निधन.
  • सन २००७ साली माजी जर्मन फुटबॉल खेळाडू बेर्न्ड जाकूबोव्हस्की (Bernd Jakubowski) यांचे निधन.
  • सन २०१५ साली अमेरिकन व्यावसायिक बास्केटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक रॉबर्ट कॉफमन यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved