प्रमोद महाजन यांच्याविषयी माहिती

Pramod Mahajan chi Mahiti

भारतीय जनता पक्षातील दुसऱ्या पिढीतील महत्वाचे नेते म्हणुन स्व. प्रमोद व्यंकटेश महाजन यांची ओळख आहे. उत्कृष्ट वक्र्तृत्व असल्याने प्रचारसभांमधे त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विशेष गर्दी होत असे.

आपल्यातील व्यक्तिगत आणि सामाजिक गुणांमुळे ते लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी या भाजपातील वरिष्ठ नेत्यांचे लाडके होते.

प्रमोद महाजन यांच्याविषयी माहिती – Pramod Mahajan Biography in Marathi

Pramod Mahajan

स्व. प्रमोद महाजन यांचा अल्पपरिचय – Pramod Mahajan Information

नाव:प्रमोद व्यंकटेश महाजन
जन्म: ३ ऑक्टोबर १९४९
जन्मस्थान: मेहबुबनगर आंध्रप्रदेश
वडिल:व्यंकटेश देवीदास महाजन
आई: प्रभादेवी व्यंकटेश महाजन
पत्नी: रेखा प्रमोद महाजन (हमीने)
अपत्ये:पुनम आणि राहुल
बहिण भाऊ:प्रकाश, प्रविण, प्रतिभा, प्रज्ञा
मृत्यु: ३ मे २००६ मुंबई

प्रमोद महाजन यांचे व्यक्तिगत जीवन – Pramod Mahajan Family History in Marathi

भारतीय जनता पक्षातील राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे हे प्रमोद महाजनांचे मेहुणे. प्रमोद महाजनांचा जन्म आंध्रप्रदेशातील मेहबुबनगर येथे झाला. बालपण आंबेजोगाई येथे गेले. भौतिकशास्त्रात आणि पत्रकारीतेत त्यांनी पदवी मिळवली व राज्यशास्त्र या विषयात ते उच्चपदव्युत्तर झाले.

१९७१ ते १९७४ या दरम्यान महाविद्यालयात त्यांनी इंग्रजी अध्यापनाचे कार्य केले. पुढे आणिबाणीच्या काळात महाजन सक्रिय राजकारणात कार्यकर्ते झाले. त्यांच्यातल्या उत्तम वक्तृत्व गुणामुळे सगळयाच पक्षातील नेतेमंडळींशी आणि मोठया उद्योगपतींशी त्यांचे निकटचे संबंध होते.

पत्रकार, शिक्षक आणि राष्ट्रीय राजकारण अश्या एक एक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.  त्यांच्या दुरदृष्टीमुळेच महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच १९९५ साली कॉंग्रेसला अपयश आले आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले.

प्रमोद महाजन राजकीय करियर – Pramod Mahajan Political Career

बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांची चांगली मैत्री असल्याने शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची युती झाली आणि युतीचे सरकार स्थापन झाले. प्रमोद महाजनांच्या अनेक अंगभुत गुणांपैकीच एक म्हणजे ते पक्के व्यावसायिक राजकारणी होते.

भारतीय जनता पक्षाला देशातील प्रमुख विरोधी पक्ष समजले जात असतांना प्रमोद महाजन हे भाजपाच्या पहिल्या फळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. १९९६ साली वाजपेयी सरकारच्या अवघ्या १३ दिवसांच्या सरकारमधे प्रमोद महाजन यांनी संरक्षण मंत्री म्हणुन शपथ घेतली होती. 

पुढे जेव्हां भारतीय जनता पक्षाचे पाच वर्षांचे पुर्ण सरकार आले त्या काळात प्रमोद महाजन यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. शायनिंग इंडिया ही मोहिम प्रमोद महाजनांचीच कल्पना! दुर्देवाने ही मोहीम अयशस्वी झाली आणि त्यावेळी निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे भारतीय जनता पक्षाला सत्तेपासुन दुर जावे लागले.

प्रमोद महाजन यांच्याकडे उत्तम नेर्तृत्वक्षमता असल्याने भावी पंतप्रधान म्हणुन देखील त्यांच्याकडे पाहिले जायचे. अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर कोण? या पक्षाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणुन लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांच्याकडे पाहिले जायचे.

पण कदाचित नियतीलाच हे मान्य नव्हते…. प्रमोद महाजन घरगुती कलहाच्या अतिरेकाचे बळी ठरले आणि २००६ साली भावानेच त्यांची गोळया घालुन हत्या केली.

या घटनेने अवघा देश हादरला होता. ही घटना त्यावेळी सर्वांनाच अनपेक्षित धक्का देणारी ठरली…. आणि देश एका उत्तम नेत्याला मुकला…

तर आज आपण पाहिली देशातील एका महान व्यक्तीच्या जीवनाविषयी काही महत्वपूर्ण माहिती.

अश्याच प्रकारच्या लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

धन्यवाद!

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here