Friday, May 2, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ५ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष

5 October Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहासात घडून गेलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महत्वपूर्ण व्यक्ती आणि याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

मित्रांनो, आज जागतिक शिक्षकदिन. या दिवशी शिक्षकांच्या विशेष योगदानाबद्दल सर्वसाधारण आणि विशिष्ट कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान केला जातो. सन १९९६ साली संयुक्त राष्ट्राद्वारे आयोजित युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची संयुक्त बैठक स्मरणात राहावी म्हणून हा दिन साजरा करण्यात येतो. या बैठकीमध्ये शिक्षकांच्या स्थितीबद्दल चर्चा करण्यात आली होती.

जाणून घ्या ५ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 5 October Today Historical Events in Marathi

5 October History Information in Marathi
5 October History Information in Marathi

5 ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 5 October Historical Event

  • सन १९४४ साली फ्रांस देशातील महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.
  • सन १९४६ साली फ्रांस देशातील कान्स या शहरात आयोजित पहिल्या कान्स चित्रपट महोत्सवाची सांगता झाली.
  • सन १९६२ साली अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक टेरेंस यंग दिग्दर्शित पहिला जेम्सबॉन्ड चित्रपट प्रकाशित करण्यात आला.
  • सन १९९८ साली डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारत सरकारतर्फे ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मकता पुरस्कार‘ जाहीर करण्यात आला.

५ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 5 October Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १५२४ साली भारताच्या इतिहासातील प्रसिद्ध गोंडवाना राज्याच्या राजकर्त्या राणी दुर्गावती यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९० साली  भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते, चरित्रकार, निबंधकार आणि अनुवादक तसचं, महात्मा गांधी यांचे सहकारी किशोरीलाल घनश्याम मशरूवाला यांचा जन्मदिन.
  • सन १९०२ साली जगातील सर्वात यशस्वी फूड ऑपरेशनमध्ये मॅकडोनाल्डचे रूपांतर करणारे महान अमेरिकन फास्ट-फूड टायकून रेमंड अल्बर्ट क्रोक(Ray Kroc) यांचा जन्मदिन.
  • सन १९०२ साली पद्मश्री पुरस्कार तसचं, संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीतकार आणि हिंदुस्थानी गायन संगीतातील सर्वात प्राचीन शैलींपैकी एक असलेल्या ध्रुपद परंपरेच्या दरभंगा घराण्याच्या बाह्य जगाचे उद्दीष्टक व संस्थापक राम चतुर मलिक यांचा जन्मदिन.
  • सन १९२२ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी पत्रकार, संपादक, चरित्रकार, समाजसेवक आणि समाजवादी नेते यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्मदिन.
  • सन १९२३ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व गुजरात राज्याचे माजी राज्यपाल कैलाशपती मिश्रा यांचा जन्मदिन.
  • सन १९३२ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष माधवराव लक्ष्मणराव आपटे यांचा जन्मदिन.

५ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 5 October Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८०५ साली ब्रिटीश कालीन भारतातील ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचे प्रशासकीय अधिकारी व दुसरे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिस (Lord Cornwallis) यांचे निधन.
  • सन १९८१ साली पद्मभूषण पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकीकाकार, पटकथाकार, नाटककार व लेखक भगवती चरण वर्मा यांचे निधन.
  • सन १९९१ साली भारतीय वृत्तपत्र प्रकाशक व ‘इंडियन एक्स्प्रेस‘ वृत्तपत्राचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीचे नेता रामनाथ गोयंका यांचे निधन.
  • सन १९९२ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय मुत्सद्दी, राजपुत्र, गांधीवादी, लेखक आणि स्वातंत्र्यसेनानी बॅं. परशुराम भवानराव उर्फ अप्पासाहेब पंत यांचे निधन.
  • सन १९९७ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकचे नेते चित्त बसू यांचे निधन.
  • सन २००३ साली  भारतातील इंग्लिश बिलियर्ड्सचे व्यावसायिक खेळाडू विल्सन जोन्स(Wilson Jones) यांचे निधन.
  • सन २०११ साली अमेरिकन बिझिनेस मॅग्नेट, इंडस्ट्रियल डिझायनर, गुंतवणूकदार आणि मीडिया प्रोप्रायटर तसचं, एपल कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व सहसंस्थापक स्टीव जॉब्स यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved