• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Saturday, May 21, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home History Forts

अजिंक्यतारा किल्ला माहिती आणि ऐतिहासिक महत्व 

Ajinkyatara Fort Information in Marathi

महाराष्ट्र म्हटलं कि आपल्या समोर उभा राहतो भला मोठा सह्याद्री पर्वत. या सह्याद्रीच्या कुशीत असणारा निसर्ग आणि गडकोट. महाराष्ट्रातील भक्कम अशा किल्ल्यांतील एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि तितकाच महत्वाचा किल्ला म्हणजे साताऱ्याचा ‘अजिंक्यतारा’.

अजिंक्यतारा किल्ला माहिती आणि ऐतिहासिक महत्व – Ajinkyatara Fort Information in Marathi

नाव (Name)अजिंक्यतारा (Ajinkyatara)
ठिकाण (Location)सातारा जिल्हा, महाराष्ट्र 
बांधकाम(Construction)राजा भोज (दुसरा), ११९०
उंची (Height)३३०० फुट (3300 ft.)
डोंगर रांग (Mountain Ranges)सह्याद्री

 अजिंक्यतारा गडाचा इतिहास – Ajinkyatara Fort History in Marathi

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील डोंगर रांगेत अजिंक्यतारा तोऱ्याने उभा राहिलेला आपल्याला दिसतो. जमिनीपासून साधारणतः ३३०० फुट उंचीवर असलेला हा किल्ला संपूर्ण सातारा शहरातून कुठूनही दिसतो. याला ‘सातारचा किल्ला’ म्हणून देखील ओळखल्या जाते.

अजिंक्यतारा गडाचे ऐतिहासिक महत्व : Historical Importance of Ajinkyatara Killa

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेला अजिंक्यतारा, हा मराठ्यांच्या हाती १६७३ मध्ये आला. त्या अगोदर गडावर अनेक राज्यकर्त्यांनी आपले आधिपत्य गाजवले होते. शिवाजी महाराज हे या गडावर जवळपास ६० दिवस वास्तव्यास होते. परंतु कालांतराने आक्रमण होऊन कधी मुघल तर कधी इंग्रज असे अनेक सत्तापालट या गडाने पहिल्यात.

मध्यंतरी गडाचे नामकरण आझामतारा असे करण्यात आले. परंतु ताराराणीच्या सैन्याने किल्ला जिंकून अजिंक्यताऱ्याला पुन्हा आपले गत वैभव प्राप्त करून दिले. इतके सर्व बदल होऊनही न खचता, न डगमगता आजही अजिंक्यतारा आपल्या नावाप्रमाणे एखाद्या ताऱ्यासारखा चमकत डौलाने उभा आहे.

Ajinkyatara Fort Map
Source: Ajinkyatara Fort Map

अजिंक्यतारा किल्ल्यांवरची पाहण्या सारखी ठिकाणे : Places to see on Ajinkyatara Fort

सातारा जिल्ह्याचे नाव हे तिथे असणाऱ्या सात किल्ल्यांवरून पडल्याचे समजते. यांपैकी एक महत्वाचा किल्ला म्हणजे अजिंक्यतारा. या किल्ल्यावर आणि आजूबाजूला अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. गडाचा भला मोठा दरवाजा हा शिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणावा लागेल. या दरवाज्याला दोन्ही बाजूंनी असणारे बुरुज आजमितीला देखील अगदी सुव्यवस्थित आहेत. गडाला उत्तरेला दोन दरवाजे आहेत. शिवाय गडकोट आणि भिंती भक्कमपणे उभे आहेत.

हनुमानाचे मंदिर, महादेवाचे मंदिर, ताराबाईंचा ढासाळलेल्या स्थितीत असलेला राजवाडा, मंगळादेवीचे मंदिर आणि मंगळाईचा बुरुज इ. पाहण्यासारखे आहे. किल्ल्यावरून समोरच नंदगिरी, चंदन-वंदन किल्ले, सज्जनगड, कल्याणगड, जरंडा या किल्ल्यांचे दर्शन आपल्याला घडते. गडावर उभं राहून आपण संपूर्ण सातारा शहराचे दर्शन करू शकतो. अजिंक्यतारा हा गिर्यारोहकांच्या पसंतीचा गड आहे. शिवाय चढायला सोपा असल्याने नवीन गिर्यारोहक येथे प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात. महिन्याला हजारो पर्यटक आणि निसर्गप्रेमी हे येथे भेट देतात. जर आपण दुर्गप्रेमी आहात तर अजिंक्यतारा हा आपल्यासाठी एक उत्तम असा पर्याय आहे.

अजिंक्यतारा गडावर कसे जाल? – How to reach Ajinkyatara Fort?

सातारा हे शहर रेल्वे आणि बस सेवा या दोन्हींनी जोडले गेले आहे. आपण जर रेल्वेने जाल तर रेल्वे स्थानकावरून बस किंवा रिक्षाच्या सहाय्याने आपण गडाकडे जाऊ शकतो. शिवाय सातारा बस स्थानकावरून साधारणतः ४ किमी वर हा गड आहे. पर्यटक आपल्या स्वतःच्या मोटारगाड्या किंवा दुचाकी घेऊन देखील जाऊ शकतात. मोटारगाड्यांना जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था आहे.

अजिंक्यतारा गडाला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी : Best time to visit Ajinkyatara Fort

या गडाला जाण्याचा सर्वोत्तम काळ हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी आहे. असे असले तरी, साहसी गिर्यारोहक गडाला पावसाळ्यात भेट देतात.

अजिंक्यतारा किल्ल्याविषयी विचारल्या जाणारे काही महत्वाचे प्रश्न : FAQ About Ajinkyatara Fort

१. अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर: सातारा.

२. अजिंक्यतारा किल्ला कोणत्या राजाने बांधलेला आहे ?

उत्तर: अजिंक्यतारा हा किल्ला शिलाहार घराण्यातील राजा भोज (दुसरा) यांनी ११९० साली बांधलेला असल्याचे समजते.

३. मुघलांनी अजिंक्यताऱ्याचे नाव बदलून काय ठेवले होते ?

उत्तर: आझमतारा.

४. साताऱ्यातील इतर महत्वाचे गड किल्ले कोणते आहेत ?

उत्तर: प्रतापगड, सज्जनगड, भूषणगड, कमलगड इ.

५. अजिंक्यताऱ्याची उंची किती आहे ?

उत्तर: जवळपास ३३०० फुट. 

Editorial team

Editorial team

Related Posts

Forts

पद्मदुर्ग किल्ला माहिती

Padmadurg Fort छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी बऱ्याच किल्ल्यांची निर्मिती केली. त्यात अनेक गिरिदुर्ग, जलदुर्ग किंवा सागरीदुर्ग आणि...

by Editorial team
May 19, 2022
महाराणी ताराबाई माहिती
Marathi History

महाराणी ताराबाई माहिती

Maharani Tarabai Marathi Mahiti छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न प्रत्येक मराठी माणसाला दाखवले आणि ते...

by Editorial team
May 16, 2022
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved