मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल (आठल्ये)

Alka Kubal

मराठी चित्रपटसृष्टीत दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांनी आपला एक काळ गाजवला. या कलाकारांचे सिनेमे प्रेक्षक अगदी डोक्यावर घेत असत. तिकीट बारीवर या कलाकारांचे चित्रपट तुफान गर्दी खेचत असत. प्रेक्षक या कलाकारांच्या चित्रपटांची अक्षरशः वाट बघत असायचे असा हा काळ होता.

या पुरूष मंडळींप्रमाणेच कधी अभिनेत्रींचा एक काळ असेल असे तेव्हां कुणी म्हंटले असते तर कदाचीत त्यावेळी आपण त्यावर विश्वास ठेवला नसता. पण असा काळ आला आणि एका अभिनेत्रीने तो तुफान गाजवला देखील.

मराठी फिल्म इंडस्ट्रीत सासर-माहेर चित्रपटांची लाट आणणारी एक अभिनेत्री अलका कुबल!

अलका कुबल या मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. सुमारे दशकभर त्यांनी अभिनय केलेले चित्रपट, त्या चित्रपटांच्या विषयांनी स्त्री वर्गाला सिनेमागृहाकडे अगदी खेचुन आणले होते.

मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल (आठल्ये) – Alka Kubal

Alka Kubal

अलका कुबल यांचा अल्पपरिचय – Alka Kubal Information in Marathi

नाव (Name): अलका कुबल आठल्ये
जन्म (Age): 23 सप्टेंबर 1963 (56 वर्ष)
पतीचे नाव (Husband Name): समीर आठल्ये (छायाचित्रकार)
मुली (Children Name) : दोन मुली (एक मुलगी पायलट असुन, एक डॉक्टर आहे)

अलका कुबल याचं करिअर – Alka Kubal Career

मध्यमवर्गीय घरातील अलका कुबल यांना अभिनयाची आवड लहानपणा पासुनच होती. बालकलाकार म्हणुन ’नटसम्राट’ या नाटकाचे त्यांनी जवळजवळ 250 प्रयोग केले. या व्यतिरीक्त संध्याछाया, मी मालक या देहाचा, आणि वेडा वृंदावन या नाटकांमधुन देखील अलकाने रंगभुमीवर काम केलं आहे.

भोजपुरी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांमधे तीने अभिनयाची चुणुक दाखवली

पण अलका ख.या अर्थाने सुस्थापीत आणि प्रस्थापित झाली ते मराठी चित्रपटांमधुनच !

अण्णासाहेब देऊळकर आपल्या ’लेक चालली सासरला’ या चित्रपटाकरीता नव्या अभिनेत्रीच्या शोधात असतांना त्यांचा शोध अलकापाशी येऊन थांबला.

आपल्या चित्रपटात त्यांनी अलका कुबलला मध्यवर्ती भुमिका दिली. हुंडाबळी ठरलेल्या या स्त्रीची भुमिका अलकाने अत्यंत समरसतेने निभावली. हा चित्रपट तुफान गाजला आणि लोकप्रिय देखील झाला.

मराठी चित्रपटसृष्टीला एक नवी तारका मिळाली. अश्या पध्दतीच्या भुमिकांची अलकाकडे अक्षरशः रीघ लागली.

अलकाच्या आयुष्यातील ऐतिहासीक चित्रपट ’’माहेरची साडी’’

’लेक चालली सासरला’ या चित्रपटानंतर अलका कडे चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या त्या सुमारास विजय कोंडके (निर्माता दिग्दर्शक माहेरची साडी, आणि प्रसिध्द अभिनेते दादा कोंडके यांचे पुतणे) आपल्या नव्या प्रोजेक्ट ’माहेरची साडी’ या चित्रपटाकरीता अभिनेत्रीच्या शोधात होते.

त्या दरम्यान अलका कुबल आणि त्यांची भेट झाली आणि आपल्या चित्रपटाकरीता अभिनेत्री म्हणुन त्यांनी तिला करारबध्द केलं.

माहेरची साडी या चित्रपटाने ’न भुतो न भविष्यती’ असे ऐतिहासीक यश मिळविले. 1991 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम प्रस्थापीत केले. पहिल्या तीन महिन्यांमधेच या चित्रपटाने 6 करोड रूपयांपेक्षा अधिकची कमाई केली होती. (हा आकडा त्यावेळी फार मोठा होता) मुंबईच्या प्रभात टॉकीज ला तर हा सिनेमा सलग 2 वर्ष सुरू होता.

त्यावेळी या सिनेमाने केलेली कमाई ही मराठी चित्रपटातील सर्वाधिक कमाई ठरली. तब्बल 17 वर्ष सर्वाधीक कमाई केलेल्या चित्रपटाचा विक्रम आपल्या नावावर मिरवणा.या या चित्रपटाचा विक्रम 2008 साली आलेल्या ’साडे माडे तीन’ या चित्रपटाने मोडीत काढला.

माहेरची साडी हा चित्रपट ’बाई चली सासरिये ’ या राजस्थानी चित्रपटावर बेतलेला होता. पुढे जुही चावला आणि ऋषी कपुर अभिनीत ’साजन का घर’ देखील ’माहेरची साडी ’ या चित्रपटावरून प्रेरीत हिंदी सिनेमा बनविण्यात आला.

विक्रम गोखले, अजिंक्य देव, आशालता, उषा नाडकर्णी, रमेश भाटकर, किशोरी शहाणे, जयश्री गडकर या मुरलेल्या कलावंतांसोबत अलका कुबलने केलेला अभिनय फार वाखाणल्या गेला.

हा चित्रपट पाहाण्याकरता महिला वर्गाने त्या काळी प्रचंड गर्दी केली होती.

अल्का कुबल या अभिनेत्रीने आजवर 200 हुन अधिक चित्रपटांमधे अभिनय केला आहे.

हिंदी चित्रपटांमधे देखील अलकाने अभिनय केला असुन ’चक्र’ ( नसरूद्दीन शहा) व ’शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटांचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल.

अलका कुबल यांचा विवाह – Alka Kubal Marriage

अलका कुबल ने समीर आठल्ये यांच्याशी प्रेमविवाह केला असुन या दांपत्याला दोन मुली आहेत. समीर आठल्ये हे आघाडीचे छायाचित्रकार असुन आजवर 200 पेक्षा अधिक चित्रपटांमधे त्यांनी छायाचित्रकार म्हणुन काम पाहिले आहे.

या दोघांना दोन मुली असुन त्यांनी आई वडिलांचे क्षेत्र न निवडता मोठी कन्या पायलट झाली असुन धाकटी डॉक्टर होते आहे.

अलका कुबल अभिनीत काही महत्वाचे चित्रपट – Alka Kubal Movie List

 • लेक चालली सासरला,
 • माहेरची साडी,
 • आई तुझा आशिर्वाद,
 • वहिनीची माया,
 • भक्ती हीच खरी शक्ती,
 • ओवाळणी,
 • जख्मी कुंकु,
 • देवकी,
 • ओटी ही खणा नारळाची,
 • सासुची माया,
 • निर्मला मच्छिंद्र कांबळे,
 • शिर्डी साईबाबा,
 • तुझ्या वाचुन करमेना,
 • बाळाचे बाप ब्रम्हचारी,
 • नशीबवान,
 • काळुबाईच्या नावानं चांगभलं.

हे पण नक्की वाचा: 

लक्ष्य दया : तुमच्या जवळ अलका कुबल बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा अलका कुबल यांचे जीवन Alka Kubal in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे facebook page लाइक करायला सुद्धा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top