मराठी रंगभुमिवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे रमेश भाटकर

Ramesh Bhatkar

आपल्या अभिनयामुळे, व्यक्तिमत्वामुळे आणि आपल्या करारी आवाजाने रसिकांच्या मनात घर केलेले अभिनेते रमेश भाटकर!

खरंतर त्यांचं पहिलं प्रेम म्हणजे मराठी रंगभुमी! ! ! त्यांची सुरूवात देखील तेथुनच झाली.

रंगंभुमी आणि चित्रपट, मालिका ही क्षेत्र तशी वेगवेगळी भासत असली तरी देखील मराठी रंगभुमीवरून ज्या कलाकाराचे चित्रपटसृष्टीत आगमन होते त्याला तशी फार अडचण येत नाही कारण रंगभुमिवर अभिनयाचा खरा कस लागतो, कारण प्रेक्षक अगदी समोर बसलेला असतो. आपला अभिनय कसा झाला याची पावती लगेच प्रेक्षकांच्या प्रतिसादावर ठरते आणि त्यामुळेच रमेश भाटकर यांचा अभिनय हा उच्च दर्जाचा मानला गेला आहे.

Ramesh Bhatkar

मराठी रंगभुमिवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे रमेश भाटकर – Ramesh Bhatkar

नाव: रमेश स्नेहल (वासुदेव) भाटकर
जन्म 3 ऑगस्ट 1949
कार्यक्षेत्र: मराठी रंगभुमी, चित्रपट, मालिका
पत्नी (Wife): मृदुला भाटकर (न्यायाधिश)
मुलगा (Son): हर्षवर्धन भाटकर
मृत्यु (Death): 4 फेब्रुवारी 2019

आपल्या अभिनयाच्या जोरावर रमेश भाटकर यांनी मराठी रंगभुमी आणि चित्रपटसृष्टी गाजवली आहे. डॅशिंग व्यक्तिमत्वामुळे त्यांना पोलिसाची भुमिका फार उठुन दिसायची आणि तश्या भुमिकाच त्यांच्या वाटयाला जास्त येत गेल्या.

’हॅलो इन्सपॅक्टर’ नावाच्या मालिकेत त्यांची भुमिका त्या काळी फार गाजली आणि लोकप्रिय देखील झाली. या मालिकेच्या सुमारास टिव्ही वाहिन्यांचे ऐवढे प्रस्थ नसल्याने दुरदर्शन च्या सहयाद्री वाहिनीवर प्रसारित होत असलेल्या या मालिकेला फार मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला. या व्यतिरीक्त ’दामिनी’ या मालिकेत देखील त्यांच्या भुमिकेचे फार कौतुक झाले. गेल्या वर्षी ’माझे पती सौभाग्यवती’ या आणि ’तू तिथे मी’ या मालिकांमधुन प्रेक्षकांना त्यांचे पुन्हा दर्शन झाले.

रमेश भाटकर यांची सुरूवात मराठी रंगभुमीवरून झाली. ’अश्रुंची झाली फुले’ हे त्यांनी अभिनय केलेले पहिले नाटक. हे नाटकं फार गाजले. त्यानंतर ’अखेर तू येशीलच’, ’मुक्ता’, ’केव्हांतरी पहाटे’, ’राहु केतु’ ही त्यांची नाटकं फार गाजली. मराठी रंगभुमी हे त्यांचे पहिले प्रेम होते.

रमेश भाटकर यांचे वडिल स्नेहल (वासुदेव) भाटकर हे सुप्रसिध्द संगितकार आणि भजनसम्राट होते.

रमेश भाटकर यांच करिअर – Ramesh Bhatkar Career

रंगभुमीवर अभिनय सुरू असतांनाच त्यांना चित्रपटातुन देखील आॅफर्स येऊ लागल्या. 1977 या वर्षी ’चांदोबा चांदोबा भागलास का’ या चित्रपटातुन रमेश भाटकरांचे चित्रपटसृष्टीत आगमन झाले. पुढे सचिनच्या ’अष्टविनायक’ या चित्रपटात त्यांनी सचिनजींच्या मित्राची भुमिका केली. ’दुनिया करी सलाम’, आपली माणसं, या चित्रपटात देखील त्यांचा अभिनय लक्षात राहिला. माहेरची साडी या चित्रपटात अलका कुबलच्या नव.याची भुमिका त्यांनी केली. या चित्रपटाने यशाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले.

रमेश भाटकर यांनी अभिनय केलेले काही मराठी चित्रपट – Ramesh Bhatkar Movies

माहेरची साडी, आई तुझा आशिर्वाद, आई पाहिजे, बंधन, भरत आला परत, सवत माझी लाडकी, वहिनीची माया, प्रेम करूया खुल्लमखुल्ला, हमाल दे धमाल, चतुर नवरा चिकनी बायको, आपली माणसं, सख्खा भाऊ पक्का वैरी

रमेश भाटकर यांनी अभिनय केलेले काही हिंदी चित्रपट

बेदर्दी, हफ्ता वसुली, मुंबई टाईम, द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर,

द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आधारीत चित्रपटात रमेश भाटकर यांनी माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांची भुमिका केली आहे. कर्करोगाशी झुंज देत असतांना त्यांनी या चित्रपटात अभिनय करून खरा कलावंत अखेरपर्यंत लढत राहाणारा असतो हे सर्वांना दाखवुन दिले.

खेळाची देखील त्यांना विशेष आवड असुन ते खो खो आणि जलतरणपटु देखील राहीले आहेत.
2018 साली 98 व्या अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनात ’’जिवनगौरव’’ पुरस्कार देऊन रमेश भाटकर यांचा गौरव करण्यात आला.

वयाची 70 री आली असतांना देखील वार्धक्याच्या खुणा त्यांच्या चेह.यावर कधीही दिसल्या नाहीत. त्यांचा उत्साह आणि काम करण्याची जिद्द तशीच कायम होती.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी जवळजवळ 30 वर्ष काम केलं आहे.

रमेश भाटकर यांच निधन – Ramesh Bhatkar Death

वर्षभरापुर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले. आपल्याला कर्करोग झाल्याचे आणि आपल्याजवळ कमी वेळ असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अधिक उत्साहाने काम करण्यास सुरूवात केली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु अखेरीस कर्करोगापुढे ते हरले आणि 4 फेब्रुवारी 2019 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे पण नक्की वाचा: 

लक्ष्य दया : तुमच्या जवळ रमेश भाटकर बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा रमेश भाटकर यांचे जीवन Ramesh Bhatkar in Marathiतुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे facebook page लाइक करायला सुद्धा.

नोट : Ramesh Bhatkar Biography – रमेश भाटकर यांची जीवनी या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here