Thursday, May 8, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक अण्णा हजारे

Anna Hazare Information in Marathi

“जी माणसं स्वतःकरता जगतात ती नामशेष होतात, जी समाजाकरता जगतात ती माणस मृत्युनंतर देखील कायम जिवंत राहतात”

महाराष्ट्र राज्य एक पुण्यपावन भुमी आहे अनेक थोरामोठयांना या भुमीने जन्माला घातले, ही व्यक्तीमत्व इतकी मोठी झाली की त्यांचे दैदिप्यमान असे यश सर्व जगाने मान्य केले. ही माणसे स्वतःकरता न जगता समाजाच्या उध्दाराकरता आपल्या आयुष्याचे कण न् कण वेचती झाली.

असे म्हणतात की माणसं उगाचच मोठी होत नाहीत आपल्या प्राणापलिकडे जात, संसारावर तुळशीपत्र ठेऊन समाजाचे हित सर्वोच्च स्थानी ठेवत त्याकरता आपले उभे आयुष्य लावतात तीच माणसे इतिहासाच्या पानांवर विराजमान होतात. महाराष्ट्राच्या पवित्र भुमित जन्माला आलेले थोर समाजसुधारक अण्णा हजारे यांच्याबद्दल या लेखात आपण जाणुन घेउया.

महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक अण्णा हजारे – Anna Hazare Information in Marathi

Anna Hazare Information in Marathi
Anna Hazare Information in Marathi
पुर्ण नाव:किसन बापट बाबूराव हजारे
जन्म:15 जुन 1937
जन्मस्थान:राळेगण सिध्दी, अहमदनगर, महाराष्ट्र
वडील:बाबुराव हजारे
आई:लक्ष्मीबाई हजारे
विवाह:अविवाहीत

एक निष्ठावान सैनिक ते समाजसुधारक आणि माहितीच्या अधिकाराकरता लढणारे अण्णा हजारे गेल्या 4 दशकांपासुन अहिंसेच्या माध्यमातुन आपल्या “आदर्श गाव” अभियानासोबत जनतेला माहितीच्या अधिकाराकरीता प्रेरीत करण्याचे अभुतपुर्व कार्य करतायेत. अण्णांच्या… ग्रामपंचायतीत बदलांच्या प्रयत्नांना, शासकिय अधिका.यांच्या तडकाफडकी होत असलेल्या बदल्यांना थांबवणे, सरकारी कार्यालयांमधे चालणारी बाबुशाही या विरोधात लढण्याच्या अभियानाला ब.याच आदराने आणि सन्मानाने पाहिल्या जातं.

1962 साली झालेल्या भारत.पाकिस्तान युध्दात शहीद झालेल्या सैनिकांच्या आर्मी कॅंप ला अण्णांनी भेट दिली होती. त्यानंतर सरकारने तरूणांना भारतिय सैन्यात प्रवेश घेण्याकरता आवाहन केलं होतं. अण्णा देशाकरता अतिशय भावनिक असल्यामुळे त्यांनी सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत 1963 साली भारतिय सैन्यात प्रवेश घेतला.

सैनिक सेवेत कार्यरत असतांना 15 वर्षांमधे अण्णांची ब.याच ठिकाणी बदली झाली… सिक्किम, भुतान, जम्मु-कश्मीर, आसाम, मिझोराम, लेह-लद्दाख. या ठिकाणी बदलीवर असतांना विपरीत वातावरणाला देखील त्यांना सामोरे जावे लागले.

त्या दरम्यान अण्णा आपल्या आयुष्यात निराश झाले होते मानवी जीवनाच्या अस्तित्वाला पाहता त्यांना आश्चर्य वाटत असे, त्यांना पडणा.या लहान.सहान प्रश्नांविषयी ते विचारमग्न व्हायचे. एक वेळ ही निराशा इतकी पराकोटीला पोहोचली की अण्णा आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत देखील पोहोचले.

आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी दोन पानांचा निबंध लिहीला की त्यांना जीवन का नकोसे झाले आहे, पण अचानक त्यांच्या विचारांना बदलवणारी एक छोटीशी घटना त्यांना जगण्याचे बळ देऊन गेली. ही प्रेरणा त्यांना दिल्ली रेल्वे स्थानकावर असलेल्या बुक.स्टाॅल मुळे आली ( या ठिकाणी ते नंतर राहिले देखील ) ते बुक.स्टॉल जवळ गेले आणि तिथे ठेवलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकाला विकत घेतले.

पुस्तकावर असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या फोटोने त्यांना प्रेरित केले आणि ज्यावेळेस त्यांना पुस्तकाला वाचावयास सुरूवात केली त्यावेळी अण्णांना त्यांच्या सगळया प्रश्नांची उत्तर मिळाली होती. त्या पुस्तकाने त्यांना शिकविले की मानवी जीवनाचा मुख्य उद्देश मानवतेची सेवा करणे हाच आहे. सामान्य माणसाच्या भल्याकरता काही करणं म्हणजेच परमेश्वराकरता काहीतरी केल्यासारखं आहे.

1965 साली पाकिस्तान ने भारतावर हमला केला त्यासुमारास अण्णा खेमकरण सीमेवर तैनात होते. 12 नोव्हेंबर 1965 ला पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला त्यात अण्णांचे सहकारी शहीद झाले. त्याक्षणी अण्णांच्या डोक्याजवळुन एक बंदुकीची गोळी गेली, ही घटना अण्णांना अंर्तबाहय बदलविणारी ठरली.

अण्णा म्हणतात की ती घटना माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. या घटनेचा अर्थ असा की जीवनात काहीतरी करायचे शेष आहे. स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांचा अण्णांवर फार प्रभाव पडला आणि या प्रभावामुळेच वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी आपले आयुष्य मानवतेची सेवा करण्याकरता समर्पित केले. पुढे अण्णांनी असा निर्णय घेतला की यापुढे जीवनात ते कधीही पैश्याचा विचार करणार नाहीत आणि याच कारणामुळे ते आजतागायत अविवाहीत आहेत.

त्यानंतर अण्णांनी सैन्यातुन परतण्याचा विचार केला परंतु अवघ्या 3 वर्षांमधे सैन्यातुन बाहेर पडलो तर पेंशन योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणुन अण्णांनी कुणावरही निर्भर राहाण्याची वेळ येउ नये म्हणुन सैन्यात आपली 15 वर्षांची सेवा पुर्ण केली आणि सेवानिवृत्ती वेतनास पात्र झाल्यानंतर अण्णा अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्यात आपल्या राळेगण सिध्दी या गावी परतले.

ज्या सुमारास अण्णा सैन्यात सेवेवर होते तेव्हां देखील वर्षातुन 2 महिने ते आपल्या गावी दुष्काळाच्या झळा सोसणा.या शेतक.यांचे हाल हवाल पाहाण्याकरता येत असत. वर्षाकाठी केवळ 400 ते 500 मि.मी पाऊस या राळेगण सिध्दी परिसरात पडत असे शिवाय येथे पाणी साठवण्याची कुठलीही योजना किंवा धरण नव्हते यामुळे या क्षेत्राला दुष्काळग्रस्त घोषीत करण्यात आले.

पिण्याच्या पाण्याकरता देखील या गावाला पुर्णपणे टॅंकर्सवर अवलंबुन राहावे लागत होते. 80 टक्के गाव अन्नधान्याकरता दुस.या गावावर विसंबुन होते. कामाच्या शोधार्थ गावकरी 6.7 कि.मी दुर जात असत आणि कित्येकांनी चरितार्था करता नदी तिरावर दारूची दुकानं थाटली होती. गावानजिक जवळपास 30 ते 40 दारूची दुकाने सुरू होती त्यामुळे गावातील शांतता भंग पावत चालली होती.

लहान – मोठी भांडणे, चो.या, धमक्या, हे तर नित्याचच होऊन बसलं होतं. गावातील परिस्थीती एवढी भयावह होत होती की नागरिक मंदिरातील दानपेटी फोडुन पैसे चोरण्यास देखील मागे पुढे पाहात नव्हते. पुढे विलासराव साळुंके जे पुण्यातील सासवड येथे वास्तव्याला होते त्यांच्यासमवेत अण्णा पावसाच्या पाणी साठवणी अभियानात पुढे आले.

साळुंके ग्रामपंचायतींसोबत काम करीत होते. अण्णांनी हे अभियान आपल्या राळेगणसिध्दीत राबवायचे ठरविले. पाण्याचा थेंबन् थेंब जमिनीत साठवुन जमीनीची उत्पादन क्षमता वाढवण्याकरता त्यांनी गावातील शेतक.यांना प्रशिक्षीत केले. सर्वांना सोबत घेउन अण्णांनी मागासलेल्या गावाला आज आदर्शग्राम बनविले आहे. आज या गावात पाण्याची अजिबात कमतरता भासत नाही.

जागोजागी पाण्याकरता चरे खोदले, बांधबंदीस्ती केली, नळ बसविले, जमिनीची उत्पादन क्षमता वाढली, असे अनेक कार्य या गावाच्या प्रगतीकरता अण्णांनी केले आज या ठिकाणी 5 बांध आणि 16 अंतर्गत बांध बांधण्यात आले आहेत. अण्णांचे म्हणणे होते की जर आपण नैसर्गिक संसाधनांचा योग्य त.हेने वापर केला तर याचा परिणाम आपल्याला गावाच्या प्रगतीत विकासात दिसुन येईल. अण्णा म्हणतात आज आपण पेट्रोल, डिजल, केरोसिन, कोळसा, पाणी या सर्वांचा नाश करीत चाललो आहोत.

मर्यादित मात्रेत या गोष्टी आपल्याजवळ उपलब्ध आहेत त्यामुळे याचा जपुन वापर करायला हवा अथवा याच गोष्टींकरता उद्या आसपासची राज्यं एकमेकांसोबत युध्द पुकारतील. या गोष्टींना देखील एक मर्यादा असल्याने आपण येणा.या पिढयांचा देखील विचार करावयास हवा. जास्तीत जास्त पाणी कसे साठवले जाईल याचाच विचार आज प्रत्येक गाव करीत आहे.

महात्मा गांधी कायम म्हणायचे जंगलं तोडुन इमारती बांधणे म्हणजे विकास नव्हे तर आदर्श व्यक्ती तयार करणे म्हणजे ख.या अर्थाने विकास होय. आपण सतत आपल्या नातेवाईकांना, सहका.यांना, शेजा.यांना, गावाला, राज्याला आणि देशाला सहकार्य करावयास हवे.

हे सर्व करतांना आपल्या नजरेसमोर एक आदर्श हवा ज्यामुळे हे काम आपण सहज पुर्णत्वास नेऊ शकु आणि असा आदर्श तुम्ही पैश्याने किंवा बळजबरीने निर्माण करू शकत नाही. या करीता सकारात्मक विचार, महान कार्य आणि इच्छाशक्तिीची आवश्यकता असते. असं म्हणतात की जेव्हां एक बी जमीनीत पेरलं जातं तेव्हां ते बी दुस.या बीजांना सोबत घेउन बाहेर येतं.

अश्याच त.हेने आपण स्वतःला देखील चांगल्या कामाशी जोडायला हवे जेणेकरून पुर्ण समाज देखील आपल्या मागोमाग चांगले काम करेल आणि आपण आपल्या देशाची प्रगती करू शकु. आज समाजाला असा नेता हवा आहे जो सामाजिक हिताकरता आत्मदहन करावयास देखील मागेपुढे पाहाणार नाही.

अण्णा हजारेंचे राळेगण सिध्दी हे गाव भारतातील पहिले आदर्श गाव बनले, आज हे गावं एक पर्यटन केंद्र देखील बनले आहे. देशविदेशातील कित्येक लोक अण्णांच्या या अभुतपुर्व कामाला पाहाण्याकरता येत असतात. आलेली माणसे बघतात की एक दुष्काळग्रस्त गाव, मागासलेले गाव आदर्श गावात कसे परीवर्तीत झाले.

येथे येणा.यांमधे राजकारणी, संशोधक, सामाजिक कार्यकर्ता आणि विद्यार्थी यांचा समावेश असतो. राळेगण सिध्दीत 4 उच्चपदवी धारक विद्यार्थी आहेत यांनी शोधप्रबंधात पी.एचडी केली आहे. अण्णा हजारेंचे सामाजिक जीवन: अण्णा हजारें चे असे मत आहे की विकासाच्या प्रगतीत भ्रष्टाचार हीच एकमेव बाधा आहे आणि म्हणुन 1991 साली त्यांनी एक अभियान सुरू केले या अभियानाला भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे नाव देण्यात आले.

या अभियानामुळे समजले की 42 वनअधिका.यांनी संधी साधुन करोडो रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे. अण्णांनी या वनअधिका.यांच्या विरोधात पुरावे सादर करून त्यांना कारागृहात टाकण्याची विनंती केली पण त्यांच्या या विनंतीला रद्द करण्यात आले कारण ते सर्व अधिकारी प्रचलीत पार्टीचे अधिकारी होते. या घटनेमुळे अण्णा निराश झाले आणि त्यांनी त्यांना मिळालेला पùश्री पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींना परत केला आणि प्रधानमंत्री इंदिरा गांधीनी दिलेला वृक्षमित्र पुरस्कार देखील परत केला.

पुढे अण्णांनी या कारणासाठी आळंदीला आंदोलन केले. यामुळे सरकार खडाडुन जागे झाले आणि त्यांनी त्वरीत भ्रष्टाचा.यांवर कारवाई केली. सरकारवर अण्णांच्या आंदोलनाचा चांगलाच परिणाम झाला 6 पेक्षा जास्त मंत्र्यांना राजिनामा द्यावा लागला आणि 400 पेक्षा जास्त अधिका.यांना आपल्या नौकरीवर पाणी सोडावे लागले आणि घरचा रस्ता धरावा लागला.

पण अण्णा या कारवाईने समाधानी नव्हते त्यांचा जोर पुर्ण प्रणाली बदलायला हवी व भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण व्हावा यावर होता. अण्णांनी सहका.यांसमवेत माहितीचा अधिकार या अभियानाला सुरूवात केली. या अभियानाकरता त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर 1997 साली आंदोलन केले परंतु सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांची मागणी धुडकावुन लावली. लोकांना या अभियानाची माहिती देण्याकरता आणि त्यांना या अधिकारासाठी जागृत करण्याकरता अण्णा संपुर्ण महाराष्ट्रात फिरले.

सरकारने अण्णांना आश्वासन दिले की माहितीचा अधिकार हा कायदा बनविला जाईल परंतु राज्यसभेत त्याचा उल्लेख केला जाणार नाही. अण्णांना हे कदापी मान्य नव्हते या आंदोलनादरम्यान अण्णा 10 दिवस अस्वस्थ होते. अण्णांनी पुन्हा या अभियानाकरता मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आरंभले.

तब्बल 12 दिवस आमरण उपोषणानंतर अखेरीस भारताच्या राष्ट्रपतींनी या कायदयाच्या समंतीपत्रावर हस्ताक्षर दिलेच आणि सर्व राज्यांमधे माहितीच्या अधिकाराचा कायदा लागु करण्याचे आदेश दिले आणि अश्या त.हेने 2005 साली राष्ट्रीय स्तरावर माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आला. 2005 साली माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आल्यानंतर अण्णा हजारेंनी 12000 कि.मी. यात्रा करून लोकांना या कायदयाविषयी जागृत केले.

अण्णा अनेक महाविद्यालयांमधे आणि शाळांमध्ये देखील गेलेत. 24 पेक्षा जास्त जिल्हा आणि राज्यस्तरीय बैठकांमध्ये या अधिकाराकरीता लोकांना माहिती दिली. तिस.या चरणात अण्णा रोज 2.3 सभा घेत असत. 155 पेक्षा अधिक तालुक्यांमधे त्यांनी सभा घेतल्या. लोकांमध्ये माहितीच्या अधिकाराची जाणीव जागृती वाढवण्याकरता जागो.जागी फलक छापले, बॅनर लावण्यात आले.

लहान.लहान अभियान आयोजित करण्यात आले. 1 लाखापेक्षा जास्त माहिती पुस्तकं कमी किमतीत विकण्यात आली. समाजात या माहितीच्या अधिकाराची जाणीव होण्याकरता हे उपाय पुरेसे ठरले या उपायांमुळे लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव होऊ लागली. पुढे अण्णांना पुन्हा पùश्री आणि पद्मविभूषण प्रदान करण्यात आला.

या व्यतिरीक्त त्यांना स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी म्हणुन 25 लाख रू. पुरस्कार म्हणुन देण्यात आले. या रकमेतुन प्रतीवर्षी 2 लक्ष खर्च करत अण्णा 25.30 गरीब जोडप्यांचे सामुहीक विवाह लावत असत. सैन्यातुन सेवानिवृत्त झाल्यानंतर अण्णांनी आपले संपुर्ण जीवन सामाजिक कार्याला वाहुन घेतले. ते म्हणायचे माझ्या गावी माझे एक घर आहे पण गेल्या 35 वर्षांपासुन मी घरी गेलेलो नाही. करोडो रूपयांच्या योजनांना मी अमलात आणले पण माझा स्वतःचा असा बॅंक बॅलेन्स नाही.

भ्रष्टाचार समुळ नष्ट होण्याकरता मी गेल्या 12 वर्षांपासुन लढतो आहे. हे अभियान कोणत्याही अनुदाना व्यतिरीक्त फक्त लोकांच्या सहकार्यामुळे यशस्वीपणे भारतात सुरू आहे. मी जेथेही सभा घेण्याकरता जातो तेथे लोकांना पैसे देण्याकरता आवाहन करतो त्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांची सेवा करू शकेल आणि लोकांचे मला सहकार्य मिळते.

लोकांकडुन मिळालेल्या पैशाचा उपयोग मी आपल्या अभियानात करतो. गोळा झालेले पैसे गावातल्या नागरिकांसमोरच मोजले जातात आणि माझे स्वयंसेवक मोजलेल्या पैशांची पावती देखील देतात अण्णांनी पुढे सांगीतले की हे अभियान काही वर्षांपुर्वी आम्ही सुरू केले त्यावेळी आमच्याजवळ 1 रूपया देखील नव्हता, आज हे अभियान आपल्या बळावर राज्यातील 33 जिल्हयात आणि 252 तालुक्यांपर्यंत पोहोचले आहे.

हे अभियान लक्षात घेता आम्ही गावातील ग्रामसभांना देखील हे अधिकार प्रदान केले त्यामुळे तेथे कार्यरत अधिका.यांकडुन ग्रामस्थाना लुबाडले जाणार नाही. या प्रयत्नांमुळे कित्येक जागी होत असलेला भ्रष्टाचार हळुहळु कमी होत गेला आणि गरीब कुटूंबांना सामाजिक न्याय मिळु लागला. यामुळे राज्य शासनाने गरीब जनतेकरता अनेक योजना आणल्या उदा. केरोसिन देणे, एलपीजी देणे, रेशनकार्ड देणे, हे सगळं अण्णा हजारेंच्या प्रयत्नांमुळेच गरीबांच्या घरापर्यंत आज पोहोचु शकत आहे.

राज्य शासनाने सहकारी संस्थांना आणि अर्बन बॅंकांना उन्नत बनविण्याकरता प्रयत्न केले आणि या सहकारी संस्थांवर विश्वास ठेवुन आज गावकरी देखील आपली छोटयात छोटी रक्कम त्या संस्थांमधे ठेवी स्वरूपात जमा करतात परंतु अनेक संस्था चालकांनी पैसे घेतल्यानंतर परत करतांना असमर्थता दर्शवली आहे.

या सर्व गोष्टींमुळे लोकांचा या संस्थांवरचा विश्वास कमी होत गेला आणि लोकांचे करोडो रूपये बुडले. लोकांजवळ मुलीचा विवाह करण्याकरता देखील पैसा नव्हता या गोष्टींमुळे अण्णा 8 महिने अस्वस्थ होते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संस्था चालकांनी 125 करोड रूपयांपेक्षा जास्त रक्कम गरीबांची परत केली. पुर्ण 400 करोड परत मिळण्याकरता ते आज देखील प्रयत्न करतायेत.

भविष्यात BVJS कायदा शक्ती च्या राष्ट्रीयकरणाकरता आणि कायदयांची पुनर्निर्मीती होण्याकरता ते लढणार आहेत. अण्णा म्हणतात ’’आम्ही असा निर्णय घेतलाय की मध्य भारताचा विकास करावा त्यामुळे जनतेत सहज शासनाच्या योजनांच्या बाबतीत जागृकता निर्माण करता येईल आणि त्यांना भ्रष्टाचारा संबंधी आणि त्याच्या प्रकारा संदर्भात माहिती देता येईल.

अण्णांच्या या निर्णयाला लक्षात घेता राज्य शासनाने हा निर्णय घेतला की राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण या चारही जागांवर आपली समिती गठित करून तेथे त्यांच्या एका सदस्याला नियुक्त करावे जेणेकरून तो राज्य शासनाचे प्रतिनीधीत्व करेल. तसे पाहाता सरकार विशेषतः NGO तील सदस्यांना निवडत होते, त्यामुळे त्या क्षेत्रात काम करून भ्रष्टाचार कमी केला जावा आणि जेव्हां असे होईल तेव्हांच आपण भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न पाहु शकतो.

गावातीलच रहिवासी तेथे राहुन आपल्या गावाला “आदर्श गाव” बनवेल आणि भ्रष्टाचार ला संपवेल हया एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. जेव्हां या दोनही गोष्टींना प्रत्येक ठिकाणी लागु केले जाईल तेव्हां निश्चितच एक सामाजिक दृष्टया चांगले राज्य निर्माण होण्यास चालना मिळेल. अण्णा हजारे नेहमी म्हणतात,

’’जे स्वतःकरता जगतात ते नामशेष होतात आणि जे समाजाकरता जगतात ते मृत्युनंतर देखील जिवंत राहातात’’

भारतीय सैन्यात 15 वर्ष व्यतीत केल्यानंतर अण्णांनी आपले संपुर्ण आयुष्य देशसेवेला समर्पित केले. त्यांना वाटले असते तर ते संपुर्ण आयुष्य निश्चिंत आणि आरामदायक व्यतीत करू शकले असते पण त्यांच्या भावना आपल्या देशाकरता अत्यंत प्रामाणिक आणि सच्च्या होत्या म्हणुन त्यांनी समाजसेवेचा मार्ग निवडला आणि तेव्हांपासुन ते आजतागायत ते लोकांच्या भल्याकरता लढतायेत.

स्वतःचे पोट भरण्याकरता तर प्राणी सुध्दा जगतात पण आपल्या आयुष्यातील काही वेळ काढुन इतरांकरता जे जगतात त्यांना मनुष्य असे म्हणतात. आपल्या आसपासच्या लोकांची सेवा करणे, त्यांना मदत करणे, गरीबांप्रती सहानुभुती बाळगुन त्यांना सहकार्य करणे हीच मानव असण्याची लक्षणे आहेत.

अण्णा हजारेंचा नारा – Anna Hazare Slogan

“तीच लुट, तोच भ्रष्टाचार, तो उपद्रव आज सुध्दा अस्तित्वात आहे”

भारताला स्वातंत्र्य नंतर देखील स्वातंत्र्य मिळाले नाही ही वास्तविकता आहे. फक्त एवढाच फरक पडला की गोरे गेले आणि काळे आले.

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
January 26, 2024
आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..
Marathi Biography

आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवानेते…..

Aditya Thackeray Mahiti शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातील बलाढ्य पक्ष म्हणून आज ओळखला जातो. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात असलेल्या शिवसैनिकाची नाळ आपल्या पक्षासोबत...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved