Aruna Asaf Ali Information in Marathi
अरुणा आसफ अली ह्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य महिला नेत्या होत्या. भारताला मुक्त करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
अरुणा आसफ अली यांच्या बद्दल संपूर्ण माहिती – Aruna Asaf Ali Information in Marathi
अरुणा आसफ अली यांच्या बद्दल थोडक्यात माहिती – Aruna Asaf Ali Biography
नाव (Name) | अरुणा आसफ अली (Aruna Asaf Ali) |
जन्म (Birth) | १६ जुलै १९०९ (16th July 1909) |
जन्मस्थान (Birth Place) | कालका, पंजाब (Kalka, Punjab) |
वडील (Father) | उपेंद्रनाथ गांगुली (Upendranath Ganguli) |
आई (Mother) | अंबालिका देवी (Ambalika Devi) |
पती (Husband) | आसफ अली (Asaf Ali) |
मृत्यु (Death) | २९ जुलै १९९६ (29th July 1996) |
ब्राम्हो समाजातील अरुणा यांचे पूर्ण नाव अरुणा गांगुली होते. त्यांचा जन्म १६ जुलै १९०९ साली झाला. उच्चशिक्षित अरुणा यांनी आपल्या कुटुंबियांचा विरोध पत्करून आसफ अली यांच्याशी विवाह केला होता. आसफ अली हे अरुणा यांच्या पेक्षा २३ वर्षांनी मोठे होते. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रमुख सदस्य होते. विवाहानंतर अरुणा देखील काँग्रेस मध्ये सामील झाल्या. येथूनच त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कारकिर्दीला सुरुवात झाली होती.
अरुणा आसफ अली यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान : Contribution of Aruna Asaf Ali in the Independence Movement Of India
- १९३० साली मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता. याच दरम्यान त्यांना पहिल्यांदा तुरुंगवासाला सामोरे जावे लागले.
- १९३२ साली त्यांना पुन्हा तुरुंगवास झाला. तुरुंगवासात असतानादेखील त्या मागे सरल्या नाहीत. तिथे कैद्यांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीविरोधात त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले.
- १९४२ साली करण्यात आलेल्या चाले जाव चळवळी दरम्यान महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू अशा महत्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. गांधीजीनी ‘करा वा मरा’ असा नारा दिला होता. अगदी त्याच प्रमाणे अरुणा आपल्या हातात ध्वज घेऊन गवालिया टँक मैदानात उभ्या होत्या. पोलिसांना न जुमानता त्यांनी ध्वजस्तंभावर ध्वज फडकवला होता.
अरुणा आसफ अली यांचे स्वातंत्र्योत्तर काळातील जीवन : Post Independence Life of Aruna Asaf Ali
- स्वातंत्र्यानंतर त्या राजकारणात सक्रीय झाल्या. १९४८ साली काँग्रेस मधून राजीनामा देऊन त्या कम्युनिस्ट पार्टी मध्ये सामील झाल्या.
- त्यांनी दलितांसाठी कार्य केले आणि अनावश्यक औद्योगिक बदलांना विरोध दर्शविला. महिलांच्या शिक्षणासाठी त्या कार्यरत होत्या.
- इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अरुणा, १९६४ साली पुन्हा काँग्रेस मध्ये परत आल्या. १९५८ साली दिल्लीच्या महापौर म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
अरुणा आसफ अली यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार : Aruna Asaf Ali : Awards and Honours
- १९६५ साली त्यांना आंतरराष्ट्रीय लेनिन शांतता पुरस्कार देण्यात आला.
- १९९२ सालचा ‘पद्म भूषण’ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
- १९९७ साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारत रत्न’ देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
काही महत्वाचे प्रश्न : FAQs
१. अरुणा आसफ अली यांचे विवाहापूर्वीचे नाव काय होते ?
उत्तर : अरुणा उपेंद्रनाथ गांगुली.
२. अरुणा आसफ अली यांचा जन्म कोठे झाला होता?
उत्तर : कालका, पंजाब.
३. अरुणा आसफ अली यांनी कोणते वृत्तपत्र सुरु केले होते?
उत्तर : ‘Patriot’ (देशभक्त).
४. अरुणा आसफ अली यांच्यावर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता ?
उत्तर : महात्मा गांधी.
५. अरुणा आसफ अली यांना ‘भारत रत्न’ कोणत्या साली देण्यात आला ?
उत्तर : १९९७ साली.
६. भारताची ‘Grand Old Lady’ म्हणून कोणाला संबोधण्यात येते ?
उत्तर : अरुणा आसफ अली.
७. अरुणा आसफ अली यांचा मृत्यु कधी झाला ?
उत्तर : २९ जुलै १९९६.