मराठी सुप्रसिध्द अभिनेत्री…..आशा काळे

Asha Kale

आशा काळे या मराठी रंगभुमीवरच्या आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या सुप्रसिध्द अभिनेत्री आहेत त्यांच्या घरंदाज अभिनयामुळे आज देखील त्यांचे चित्रपट संपुर्ण परिवारासह बघावेत असेच आहेत. सुलोचना, जयश्री गडकर यांच्यानंतर आशा काळेच अश्या अभिनेत्री आहेत त्यांची कारकिर्द मोठी आणि यशस्वी राहिली आहे.

मराठी सुप्रसिध्द अभिनेत्री…..आशा काळे – Marathi Actress Asha kale in Marathi

Aasha Kaleमराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीआशा काळे यांचा अल्पपरिचय – Famous Actress Asha Kale Information in Marathi

नाव (Name) आशा काळे
जन्म (Birthday) 23 नोव्हेंबर 1948
जन्मस्थान (Birthplace गडहिंग्लज
पतिचे नाव (Husband Name)  माधव पांडुरंग नाईक
आशा काळेंचे सासरचे नाव गौरी माधव नाईक
कार्यक्षेत्र अभिनय

सासरचे नाव गौरी माधव नाईक असे असले तरी देखील आज ही त्यांना ‘आशा काळे’ याच नावाने सर्वजण ओळखतात. सात्विक चेहरा, लोभसवाणे आणि घरंदाज रूप या त्यांच्या जमेच्या बाजु आहेत, या गोष्टी त्यांच्या अभिनयात अधिक भर घालतात.

आशा काळेंचे शिक्षण सुरूवातीला कोल्हापुर आणि त्यानंतर पुणे येथे झाले. लहान असतांना म्हणजे वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी रंगभुमीवर पहिले पाऊल ठेवले. रंगभुमिवर लहान असतांना आणि फार व्यस्त झाल्याने त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. कथ्थक चे मात्र त्यांनी शास्त्रशुध्द शिक्षण घेतले आहे. कथ्थक चे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या नृत्यांचे कार्यक्रम देखील करत असत. ’सीमेवरून परत जा’ हे आशाताईंचे पहिले व्यावसायिक नाटक व त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलेला पहिला चित्रपट म्हणजे ’ताबंडी माती’.

2015 या वर्षी आशा काळेंच्या अभिनय कारकिर्दीला 50 वर्ष पुर्ण झालीत.आशा काळे यांच्या हस्ते 2008 साली गोवा येथे झालेल्या 6 व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले होते.

आशा काळेंचे पति माधव पांडुरंग नाईक हे मराठी चित्रपट, लघुपट, व समाजप्रबोधनात्मक माहितीपटाचे निर्माते आहेत. 2013 साली माधव नाईक यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.

आशा काळे यांना मिळालेले पुरस्कार – Asha Kale Award

  • महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा ‘व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ’.
  • ठाणे महानगरपालिकेतर्फे 2008 साली ‘गंगाजमुना’ पुरस्कार.
  • रंगत संगत प्रतिष्ठान आणि साहिल फाउंडेशनचा 2008 सालचा ‘माणुस’ पुरस्कार.
  • 2011 साली मिळालेला भारती विश्वविद्यालयाचा ‘जीवनसाधना’ पुरस्कार.
  • 28 एप्रील 2015 ला मिळालेला संस्कृती कलादर्पण पुरस्कार.
  • पट्ठे बापुराव प्रतिष्ठानने 19 डिसेंबर 2015 ला दिलेला ‘शाहीर पट्ठे बापुराव पुरस्कार’.
  • अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ 14 जुन 2016.

आशा काळे यांनी अभिनय केलेले चित्रपट – Asha Kale Movie

बाळा गाऊ कशी अंगाई, अर्धांगी,अशी रंगली रात्र, बंधन, कुलस्वामिनी अंबाबाई, कैवारी, तांबडी माती, थोरली जाऊ, चांदणे शिंपीत जा, चुडा तुझा सावित्रीचा, गनिमी कावा,गणाने घुंगरू हरवले, घर गंगेच्या काठी, देवता, पुत्रवती, बंदिवान मी या संसारी, ज्योतिबाचा नवस, चोराच्या मनात चांदणे, माहेरची माणसे,सतीची पुण्याई, सासुरवाशीण, हा खेळ सावल्यांचा, संसार, सतीची पुण्याई, सतीचे वाण, हीच खरी दौलत, बायकोचा भाऊ, नशिबवान.

आशा काळे यांची काही मराठी नाटकं:

गहिरे रंग, एखादी तरी स्मितरेषा, गुंतता हृदय हे, एक रूप अनेक रंग, घर श्रीमंताचं, नल दमयंती, पाऊलखुणा, फक्त एकच कारण, बेईमान, देव दिनाघरी धावला, मुंबईची माणसं, लहानपण देगा देवा, वर्षाव, वाहतो ही दुर्वांची जुडी, महाराणी पद्यनी, वा.यात मिसळले पाणी, विषवृक्षाची छाया, सीमेवरून परत जा, संगीत सौभद्र, वेगळं व्हायचंय मला, साटं लोटं.

मालिका:

महाराणी पद्यनी, इंद्रधनु.

नक्कीच हा लेख तुंम्हाला आवडला असेल, तर मग आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आणि आंमच्या majhimarathi.com ला व्हिझिट करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here