ऑनलाईन वस्तू विकत घेताना आपण आपला पैसा आणि वेळ कसा वाचवू शकतो?

Online Shopping Benefits

मित्रांनो, आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि ऑनलाईन वस्तू घेताना आपण कश्या प्रकारे आपले पैसे वाचवू शकतो.

आजच्या जगात मोठ्या प्रमाणात कोणती वस्तू घ्यायची असल्यास ऑनलाईनच घेतो.

आपल्या मोबाईल मधील काही अ‍ॅप चा वापर करून कोणतीही गोष्ट आपण आपल्या घरी बोलावू शकतो.

खर तर ऑनलाईन शॉपिंग हि एक अशी गोष्ट आहे, जसे आपण एखाद्या दुकानाला भेट देऊन तिथून काही विकत घेतो, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईल अ‍ॅप चा वापर करून तिथून खूप काही विकत घेऊ शकता.

ऑनलाईन शॉपिंग तुमचा वेळ तर वाचवतेच सोबतच एक चांगला अनुभव सुद्धा देते, तेच जर आपण दुकानावर जाऊन एखादी वस्तू विकत घेतली तर आपल्याला त्यासाठी आपला वेळ द्यावा लागतो.

ऑनलाईन वस्तू विकत घेताना आपण आपला पैसा आणि वेळ कसा वाचवू शकतो? – Benefits of Online Shopping

Online Shopping

१) दुकानावर जाऊन खरेदी करण्याच्या कामाला करा बाय बाय – Say Goodbye Offline Shopping

जर तुम्ही दुकानावर जाऊन खरेदी करत असाल तर तुम्हाला पाहिजे असणाऱ्या वस्तू तुम्हाला त्या दुकानामध्ये शोधाव्या लागतील.

त्यामध्ये तुमचा वेळ वाया जाईल.

पण आपण जर दुकानावर जाऊन खरेदी करण्याच्या कामाला बाय बाय केले आणि ऑनलाईन शॉपिंग वर भर दिला तर तुम्हाला कुठे बाहेर जायची गरजही नाही.

तुमच्याच मोबाईल वर तुम्हाला सगळ्या वस्तू उपलब्ध असतील आणि त्यामुळे तुमचा वेळ पण वाचेल.

२) पर्यायी वस्तूंपासून सुटका – Available Alternative Goods

तुम्ही दुकानावरून वस्तू खरेदी करत असाल तर बरेचदा अशी परिस्थिती निर्माण होते जिथे तुम्हाला हवी असणारी वस्तू त्या दुकानावर उपलब्ध नसते, आणि तो दुकानदार आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तूसारखी दुसऱ्या ब्रांड ची वस्तू आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो, आणि कधीकधी असे होते कि आपण त्याच्याकडून ती दुसऱ्या ब्रांडची वस्तू विकत घेतोही.

पण तेच जर आपण ऑनलाईन शॉपिंग वरून एखादी वस्तू घेतो तर तिथे आपल्याला हव्या त्या ब्रांडच्या वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात म्हणून पर्यायी वस्तू घेण्याचा विषय च येत नाही.

३) दुकानांवर काही वस्तू जुन्या असतात – Outdated Goods is in Shop

अनेकदा काही वस्तू विकत घेताना आपल्याला अशी अनुभूती येते कि ती वस्तू जुनी आहे.

पण आपल्याजवळ पर्याय नसल्यामुळे ती वस्तू विकत घ्यावीच लागते, आणि दुकानदार पण सर्वात पहिले त्याच्याजवळ असणारा जुना स्टॉक विकतो.

त्याच्यामुळे आपल्याला बरेचदा जुन्या वस्तू मिळतात.

काहीवेळा तर असे होते बाहेरून चांगले दिसणारी फळे, किंवा भाजीपाला हा आतून तेवढा छान नसतो, आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

पण तेच जर तुम्ही ऑनलाईन ह्या गोष्टी विकत घेण्याचे ठरवले तर तुम्ही पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी चेक करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागते.

mercato.com सारख्या स्टोर वर आपण याचा अनुभव घेऊ शकता.

४) दुकानाच्या किमती पेक्षा स्वस्त – Less Price Available

जेव्हा एखादी वस्तू दुकानात येते तेव्हा ती खूप स्टेप मधून आपल्या पर्यंत येत असते.

जसे कंपनी पासून होलसेलर, होलसेलर पासून रिटेलर आणि त्यानंतर कस्टमर, त्यामुळे आपल्याला ती वस्तू महागात पडते पण ऑनलाईन शॉपिंग मध्ये तसे होत नाही.

त्यामध्ये कोणीही रिटेलर किंवा होलसेलर नसतो.

म्हणून आपल्याला ती वस्तू दुकानाच्या किमती पेक्षा कमी किमतीत पडते.

५) वेळ वाचवते – Save Time

खूप वेळा आपण आपल्या कामात बीझी असल्यामुळे दुकानात जाऊन काही विकत घेऊ शकत नाही, आणि गेलोच तर खूप ठिकाणी रांगेत सुद्धा उभे राहावे लागते.

त्यामुळे आपला वेळ वाया जातो.

ऑनलाईन शॉपिंग तुमचा तेवढाच वेळ वाचवते व तुम्हाला हवी असणारी वस्तू तुमच्या घरापर्यंत आणून देते.

तात्पर्य :

ऑनलाईन शॉपिंग तुमची लाईफस्टाईल सोपी बनवते, तसेच तुम्हाला तुमच्या दैनिंदिन जीवनात वेळ वाचवण्यासाठी उपयोगी ठरते.

तसेच तुम्हाला सगळ्या वस्तू तुमच्या दरवाज्यावर मिळतात.

अजून माहिती साठी आंमच्या  माझी मराठी  सोबत जुडून रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top