भारतातील महान गणितज्ञ भास्कराचार्य यांचा बद्दल संपूर्ण माहिती

Bhaskaracharya Information in Marathi

मध्ययुगीन भारतात अनेक थोर गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ होऊन गेलेत. ज्यांमध्ये जगाला शून्याची ओळख देणारे  महान गणितज्ञ आर्यभट्ट, वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे सुश्रुत या सर्वांचा समावेश होतो. असेच एक महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ म्हणजे भास्कराचार्य.

भारतातील महान गणितज्ञ भास्कराचार्य यांचा बद्दल संपूर्ण माहिती – Bhaskaracharya Information in Marathi

भास्कराचार्य यांचे बालपण – Bhaskaracharya History

भास्कराचार्य यांचा जन्म इस. १११४ साली कर्नाटक मधील बिजापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महेश्वर होते. ते बालपणीपासूनच गणितामध्ये हुशार होते. त्यांना इतरांना शिकविण्याची हौस होती.

भास्कराचार्य यांचे कार्य – Bhaskaracharya’s Work in the Field of Mathematics

गणितामध्ये अतिशय हुशार असलेल्या भास्कराचार्य यांनी त्या काळातील अनेक गणिते अगदी सहज सोडविली. यांपैकी काही गणिते युरोप खंडात देखील सोडविल्या गेलेली नव्हती. दरम्यान उज्जैन स्थित खगोलशास्त्रीय वेधशाळेचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

भास्कराचार्य यांनी आपले संपूर्ण कार्य ६ ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहे.

भास्कराचार्य यांचे ग्रंथ – Bhaskaracharya Book

१. लीलावती (Lilavati ): हा ग्रंथ गणित विषयावर लिहला गेलेला आहे.
२. बीजगणित (Bijaganita) : यामध्ये गणितातील बीज म्हणजेच मुळाबद्दल लिखाण केलेले दिसते.
३. सिद्धांतसिरोमनी (Siddhanta Shiromani) : हा ग्रंथ दोन प्रमुख भागांमध्ये विभागलेला आहे. प्रथम भागामध्ये खगोलीय गणिताबद्दल माहितीत आहे तर द्वितीय भागामध्ये गोलाबद्दल माहिती उपलब्ध आहे.
४. ग्रहगणित (Grahaganita): यामध्ये ग्रहांचा अभ्यास आणि गणितातील सूत्रे यांच्या अभ्यासावर लिखाण केलेले आहे.
५. वासनाभ्यास
६. विवरण

भास्कराचार्य यांचा खगोलशास्त्रीय अभ्यास – Bhaskaracharya’s Astronomical Studies

भास्कराचार्य यांनी आपल्या गणितीय सूत्रांच्या मदतीने अनेक खगोलीय घटनांचा अभ्यास केला. पृथ्वीला सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करायला ३६५ दिवसांचा कालावधी लागतो हे त्यांनी तेव्हाच सिद्ध केले होते. तसेच ग्रहांची फिरण्याची गती, चंद्र आणि सूर्य ग्रहण इ. अभ्यास देखील त्यांनी केला होता.

भास्कराचार्य यांचे निधन – Bhaskaracharya Death

अशा या महान भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञाचे निधन ११८५ मध्ये झाले. आपल्या एकूण आयुष्यात त्यांनी अनेक सूत्रे आणि सिद्धांत मांडले, जे आजमितीला देखील खरे ठरत आहेत.

भास्कराचार्य बद्दल काही महत्वाचे प्रश्न – Bhaskaracharya Quiz Questions

१. भास्कराचार्य कोण होते?

उत्तर: भास्कराचार्य हे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते.

२. भास्कराचार्य यांचा जन्म कुठे झाला होता?

उत्तर: बिजापूर, कर्नाटक.

३. भास्कराचार्य यांच्या मुलीचे नाव काय होते?

उत्तर: लीलावती (इंटरनेट वरील उपलब्ध माहिती नुसार)

४. भास्कराचार्य यांच्या वडिलांचे नाव काय होते?

उत्तर: महेश्वर.

५. भास्कराचार्य यांचा जन्म केव्हा झाला?

उत्तर: इस. १११४ मध्ये.

2 COMMENTS

  1. छान माहिती दिली आहे. मला आवडली असुन आणखी वाचावीशी वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here