Sunday, June 29, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

महान भारतीय शास्त्रज्ञांबद्दल माहिती

Indian Scientists Information in Marathi

आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे. या क्षेत्रात विश्वातील महान शास्त्रज्ञांनी आपले अमुल्य योगदान देऊन आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध आणि सुखकर बनविले आहे. यामध्ये अनेक भारतीय शास्त्रज्ञांची नावे सुद्धा समोर येतात.

आज आपण अशाच काही महान भारतीय शास्त्रज्ञांची थोडक्यात माहिती बघणार आहोत.

महान भारतीय शास्त्रज्ञांबद्दल माहिती – Indian Scientists Information in Marathi

Indian Scientists Information in Marathi
Indian Scientists Information in Marathi

प्राचीन काळातील महान भारतीय शास्त्रज्ञ – Indian Ancient Scientists

विज्ञानात अगदी प्राचीन काळापासून भारतीय शास्त्रज्ञांनी आपले योगदान दिले आहे. त्यांपैकी काही पुढील प्रमाणे.

  1. आर्यभट्ट : आपल्यापैकी सर्वांना माहित असेल कि शून्याचा शोध भारतातच लागला आहे. परंतु हा शोध कुणी लावला हे तुम्हाला ठाऊक आहे का. हा शोध लावला आहे आर्यभट्ट यांनी. ते प्राचीन काळातील थोर गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि ज्योतीष्याचार्य होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारताच्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाला “आर्यभट्ट” नाव दिले आहे.
  2. महर्षी चरक : महर्षी चरक यांना भारतीय वैद्यकशास्त्राचे जनक असे म्हटल्या जाते. आपल्या ‘चरक संहिता’ या ग्रंथामध्ये त्यांनी विविध आजारांची माहिती आणि उपचाराच्या पद्धतींबद्दल विस्तृत लिखाण केलेले आहे.
  3. महर्षी वराहमिहिरा : जमिनीच्या खाली पाण्याचे अस्तित्व आहे हे सर्वात आधी सांगणारे शास्त्रज्ञ म्हणजे महर्षी वराहमिहिरा. त्यांनी ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात ग्रहण, भूकंप, वास्तुशास्त्र इ. विषयांवर प्रकाश टाकलेला आहे.
  4. महर्षी कणाद : यांचे खरे नाव आलुक्य असे होते. कणाद या नावामागची कथा म्हणजे आलुक्य यांचा कणांचा अभ्यास. ‘कण’ म्हणजे वस्तूचे सूक्ष्म अवशेष. याच अभ्यासावरून त्यांचे नाव कणाद असे पडले. अणूंचा सिद्धांत जगासमोर पहिल्यांदा महर्षी कणाद यांनी मांडला.
  5. महर्षी सुश्रुत : शस्त्रक्रियेचे जनक म्हणून महर्षी सुश्रुत यांचे नाव समोर येते. प्राचीन काळातच त्यांनी ‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथामध्ये शस्त्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती लिहलेली आढळते.

नोबेल पारितोषिक मिळविणारे भारतीय शास्त्रज्ञ : Indian Scientists who won Nobel Prize

भारतातील काही शास्त्रज्ञांना जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणारे नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. ते शास्त्रज्ञ पुढीलप्रमाणे :

  1. भारतरत्न सी.व्ही. रमन : यांना भौतिकशास्त्रातील प्रसिद्ध ‘रमन प्रभाव’ साठी १९३० सालचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.
  2. हर गोबिंद खुराना : हे भारतीय अमेरिकी शास्त्रज्ञ आहेत. यांना १९६८ साली ‘अनुवांशिकतेवरील संशोधनासाठी’ नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.
  3. सुब्रमण्यम चंद्रशेखर : यांना एस. चंद्रशेखर म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यांना ‘ताऱ्यांची रचना आणि उत्पत्ती’च्या शोधासाठी १९८३ साली नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.
  4. व्यंकटरमण रामकृष्णन : यांना २००९ साली ‘राईबोसोमची रचना व कार्य’ या विषयावरील सखोल अभ्यासासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.

भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांचे संशोधन – Indian Scientists and their Inventions

  • सी.व्ही. रमन : रमन प्रभाव
  • सत्येंद्रनाथ बोस : यांनी अणूंच्या केंद्रात असणाऱ्या ‘बोसॉन’ चा शोध लावला.
  • डॉ. होमी जे. भाभा : यांना भारतीय अनुशास्त्राचे जनक म्हटल्या जाते. यांच्याद्वारे भारतात अणु उर्जेच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे.
  • डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : यांना भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक म्हटल्या जाते. पहिल्या स्वदेशी क्षेपणास्त्राचे श्रेय डॉ. कलाम यांना जाते.
  • बिरबल सहानी : यांनी वनस्पती शास्त्रात आपले अमूल्य योगदान दिलेले आहे.
  • श्रीनिवास रामानुजन : यांनी गणित विषयाचा सखोल अभ्यास केला आहे.
  • विक्रम साराभाई : भारतातील अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात यांच्या पासून झाली आहे.
  • प्रफुल चंद्र रे : यांनी ‘मर्क्युरस नायट्रेट’ या पदार्थाचा शोध लावला तसेच बंगाल केमिकल एंड फार्मासुटीकल कंपनी ची स्थापना केलेली आहे.

अमेरिकी अंतराळ संस्था नासा मध्ये कार्य करत असलेले भारतीय शास्त्रज्ञ : Indian Scientists in NASA

नासा ही अमेरिकेची आणि कदाचित जगातील सर्वात मोठी अंतराळ संस्था आहे. या संस्थेत काही भारतीय शास्त्रज्ञांनी आपली कामगिरी बजावली आहे आणि अजूनही ती सुरूच आहे. नासा संस्थेमध्ये कार्यरत असलेले काही भारतीय शास्त्रज्ञांची यादी पुढील प्रमाणे :
१. कल्पना चावला
२. सुनिता विलियम
३. अश्विन वासावडा
४. डॉ. कमलेश लुल्ला
५. डॉ. अनिता सेनगुप्ता
६. डॉ. सुरेश कुळकर्णी
७. डॉ. मेय मयप्पन
८. शर्मिला भट्टाचार्य

भारतीय महिला शास्त्रज्ञ : Female Indian Scientists

शास्त्रज्ञांच्या या यादीमध्ये फक्त पुरुष मंडळीच नाही तर महिला देखील आघाडीवर आहेत. विज्ञानामध्ये अनेक भारतीय महिलांनी आपले अमुल्य योगदान दिलेले आहे. त्यांपैकी काही भारतीय महिला शास्त्रज्ञांची यादी खालीलप्रमाणे :

  1. इरावती कर्वे
  2. अण्णा मनी
  3. कादंबिनी गांगुली
  4. राजेश्वरी चॅटर्जी
  5. टेसी थॉमस
  6. उषा बरवाले झेहर
  7. दर्शन रंगनाथान
  8. शुभा तोळे इ.

सध्या जीवित असलेले महान भारतीय शास्त्रज्ञ : Famous Indian Scientists alive today

मित्रांनो आजही आपल्या मध्ये काही महान शास्त्रज्ञ हजर आहेत. हे लोक रोज आपल्या सर्वांचे जीवन आरामदायी आणि सुखकर बनविण्यासाठी नवनवीन प्रयोग करत आहेत. यांपैकी काही शास्त्रज्ञ पुढीलप्रमाणे :

  1. चेतन चिटणीस
  2. चारुसीता चक्रवर्ती
  3. सिवा उमापती
  4. परमजीत खुराना
  5. रतन कुमार सिन्हा इ.

भारतीय शास्त्रज्ञांबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Quiz on Indian Scientists

१. शास्त्रज्ञ म्हणजे काय?

उत्तर: शास्त्रज्ञ म्हणजे कुठल्याही प्रकारच्या शास्त्राचा अभ्यासक होय. ते आपल्या अभ्यासातून मानवी जीवन अधिकच प्रभावी आणि सुखकर बनविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.

२. भारतातील रसायन शास्त्रातील प्रसिद्ध शास्त्रज्ञांची नावे काय ?

उत्तर: नागार्जुन, सत्येंद्रनाथ बोस, महर्षी कणाद, प्रफुल चंद्र रे, हर गोबिंद खुराना, सी.एन.आर. राव, गोविंद देसिराजू इ.

३. भारतातील वैद्यकिय शास्त्रातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ कोण आहेत ?

उत्तर: श्रीपाद पाटील, राधेशाम शर्मा, दीपा भरतीया, ओम प्रकाश सिंह इ.

४. भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून कुणाला ओळखले जाते ?

उत्तर: सी. व्ही. रमण

५. विश्वातील पहिली महिला शास्त्रज्ञ कोण ?

उत्तर: मेरी क्युरी

Editorial team

Editorial team

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved