कल्पना चावला यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

Kalpana Chawla Information in Marathi

नमस्कार मित्रांनो. आज आपण भारतीय अंतराळावीर कल्पना चावला यांच्या जीवनाविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरु करूयात. कल्पना चावला ह्या भारतीय अमेरिकी वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर होत्या. साल २००३ मध्ये अमेरिकी अंतराळ यान कोलंबिआच्या परतीच्या प्रवासात दुर्घटना होऊन त्यांचा मृत्यु झाला होता.

कल्पना चावला यांच्या बद्दल संपूर्ण माहिती – Kalpana Chawla Information in Marathi

Kalpana Chawla Information in Marathi
Kalpana Chawla Information in Marathi

कल्पना चावला यांच्याबद्दल माहिती – Kalpana Chawla Biography in Marathi

नाव (Name) कल्पना चावला
जन्म (Birthday) १ जुलै १९६१
मृत्यु (Death) १ फेब्रुवारी २००३
जन्मस्थान (Birthplace) करनाल (हरियाना)
व्यवसाय अंतराळवीर, अभियंता
ओळख पहिली भारतीय महिला अंतराळवीर
वडील (Father Name) बनसारीलाल चावला
आई (Mother Name) संज्योती चावला
पतीचे नाव (Husband Name) जीन पेरी हरीसन
पुरस्कार (Awards) नासा विशिष्ट सेवा पदक, नासा अंतराळ उड्डाण पदक, काँग्रेशनल अंतराळ पदक
भावंड २ बहिणी, १ भाऊ

कल्पना चावला यांचा इतिहास – Kalpana Chawla History in Marathi

कल्पना चावला यांचा जन्म १ जुलै १९६१ मध्ये भारतातील हरियाना राज्यातील करनाल या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव संज्योती तर वडिलांचे नाव बनारसीलाल असे आहे. कल्पना यांना आपल्या मागे दोन बहिणी व एक भाऊ आहे.

कल्पना चावला यांच प्राथमिक शिक्षण – Kalpana Chawla Education

आपले प्राथमिक शिक्षण कल्पना यांनी करनार येथील टागोर उच्चविद्यालय येथून पूर्ण केले. वयाच्या अगदी लहानपणापासूनच कल्पनाला वैमानिक बनायचे होते. त्यांना तारे आणि ग्रहांबद्दल विशेष आकर्षण होते. एकदा तर त्यांनी आपल्या वर्गखोलीत संपूर्ण भारताचा नकाशा काढला होता. आणि खोलीचे छप्पर विविध ताऱ्यांनी रंगविले होते. शाळेत जेव्हा केव्हा त्यांना चित्र काढायला संगीतल्या जात होते तेव्हा त्या फक्त विमान, अंतरीक्ष यान आणि ग्रह तारे यांचेच चित्र रेखाटायचे.

उच्च शिक्षण :

पंजाब स्थित अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९८२ साली त्यांनी वैमानिक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. पुढे वैमानिक अभ्यासक्रमात पद्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्या टेक्सास येथील अर्लिंगटन या विश्वविद्यालयात दाखल झाल्या. तिथे त्यांनी आपले शिक्षण यशस्विपणे पूर्ण केले. याच दरम्यान त्यांचा विवाह झाला. त्यांचे पती जीन पेरी हरीसन हे मुळचे फ्रांस येथील रहिवासी असून ते एक विमान प्रशिक्षक आहेत. कल्पना आणि जीन यांचा विवाह साल १९८३ मध्ये पार पडला होता.

अंतराळातील कारकीर्द – Kalpana Chawla Astronaut

Kalpana Chawla Photo
Kalpana Chawla Photo

कल्पना या प्रमाणित विमान प्रशिक्षक होत्या. त्यांनी जवळपास १ कोटी मैल अंतराळ यात्रा केलेली आहे या सोबतच ३७२ तास अंतराळात राहण्याच्या विक्रमही केलेला आहे. कल्पना चावला यांना विमाने, हवाई ग्लाइड उद्विण्यामध्ये प्राविण्य प्राप्त होते. त्यांच्याकडे व्यावसायिक विमाने उडविण्याचा परवाना देखील होता. अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केले जातो.

तसेच राकेश शर्मा नंतर जाणारी दुसरी भारतीय व्यक्ती म्हणजे कल्पना चावला होय. १९९३ मध्ये ‘अमेस संशोधन केंद्रा’ मध्ये त्यांना ‘ओवर सेट मेथड्स इंक’ येथे उपाध्यक्ष म्हणून नोकरी मिळाली होती. विमान अभियांत्रिकी मध्ये पदवी प्राप्त असल्यामुळे त्यांना नासा द्वारे हि संधी देण्यात आली होती.

त्यांनी आपली पहिली अंतरीक्ष यात्रा १९ नोव्हेंबर १९९७ साली STS-87 या यानाद्वारे केली होती. यानंतर त्यांना अंतराळ कार्यालयात तांत्रिक पदावर सामील करून घेण्यात आले होते. यानंतर साल २००० मध्ये त्यांनी कोलंबिआ STS- 107 या यानातील प्रवासासाठी निवडले गेले. काही तांत्रिक कारणांमुळे हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला. यानाच्या उड्डाणाबाबत अनेक शास्त्रज्ञ शंका व्यक्त करत होते. परंतु शेवटी १६ जानेवारी २००३ साली या यानाने उड्डाण केले.

कल्पना चावला यांचा मृत्यू – Kalpana Chawla Death

परंतु दुर्भाग्याने, काही दिवसांचा प्रवास करून जेव्हा हे यान पृथ्वीकडे परत येत असतांना काही तांत्रिक बिघाडामुळे हे यान क्षतिग्रस्त झाले. जमिनीपासून ६३ किलोमीटर उंचीवर असतांना यानात विस्फोट झाला. आणि बघता बघता यानातील सर्व यात्रेकरूंचा मृत्यु झाला. १ फेब्रुवारी २००३ रोजी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जगभर हळहळ व्यक्त करण्यात आली. यानातील सर्व सात प्रवासी जागीच ठार झाले होते.

कल्पना चावला यांच्या सन्मानार्थ – Kalpana Chawla Achievements

  1. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी कल्पना चावला यांच्या सन्मानार्थ आपल्या ‘मेट सॅट-१’ या अंतरीक्ष यानाचे नाव ‘कल्पना -१’ असे दिले होते. हरियाणा प्रशासनाने करनार येथील सरकारी दवाखान्याला ‘कल्पना चावला शासकीय दवाखाना’ असे नाव दिले आहे.
  2. फक्त भारतच नव्हे तर अमेरिकेने सुद्धा कल्पना यांच्या सन्मानार्थ न्यू यॉर्क शहरातील ‘७४ जँक्सन हाईट’ या रस्त्याचे नाव बदलवून ‘कल्पना चावला’ रोड असे केले आहे.
  3. कर्नाटक सरकारतर्फे ‘कल्पना चावला पुरस्कार’ हा लहान बालिका वैज्ञानिकांना दिला जातो.
  4. भारतीय तांत्रिक संस्था, खरगपूर यांच्या एका विभागाचे नामकरण ‘कल्पना’ चावला विभाग असे आहे.
  5. नासाने आपले एक सुपर संगणक कल्पना चावला यांना समर्पित केले आहे.

कल्पना चावला यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान – Kalpana Chawla Awards

  1. नासा विशिष्ट सेवा पदक
  2. काँग्रेशनल अंतराळ पदक
  3. नासा अंतराळ उड्डाण पदक

नेहमी विचारल्या जाणारी काही प्रश्ने :

१. अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण?

उत्तर : कॅप्टन राकेश शर्मा

२. कल्पना चावला यांनी किती वेळा अंतराळ प्रवास केला?

उत्तर : कल्पना चावला यांनी दोन वेळा अंतराळ प्रवास केला.

३. कल्पना चावला यांचा मृत्यु कोणत्या यानामध्ये झाला ?

उत्तर : कोलंबिआ STS-107 अंतराळयान.

४. चंद्रावर पाउल ठेवणारी प्रथम महिला कोण ?

उत्तर : जेसिका मेर.

५. कल्पना चावला यांनी अंतराळात एकूण किती दिवस घालवले ?

उत्तर : ३० दिवस.

६. कल्पना चावला पहिल्यांदा अवकाशात गेल्या तेव्हा त्यांचे वय किती होते ?

उत्तर : वयाच्या जवळपास ३६ व्या वर्षी कल्पना अवकाशात गेल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here