आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर जगभर आपली कीर्ती पसरविणारे विश्वातील काही महत्वपूर्ण संशोधक व वैज्ञानिक

Top 7 Scientists in the World

मित्रांनो, आपल्या या विश्वात अनेक महान संशोधनकर्ता व वैज्ञानिक होवून गेले आहेत, ज्यांनी आपल्या संशोधनाच्या बळावर आपले तसचं, आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केलं आहे. आपल्या भूतकाळात केल्या गेलेल्या विविध क्षेत्रांतील संशोधनांमुळे आज आपण त्या गोष्टींचा वापर करू शकतो. या लेखाच्या माध्यमातून आपण अश्याच काही देश विदेशातील महान संशोधाकांबाद्द्ल माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांनी आपल्या संशोधनामुळे आपलं तसचं आपल्या देशाचे नाव जगाच्या नकाशावर उमटवल आहे.

महान वैज्ञानिकांची माहिती – Famous Scientists in the World

Famous Scientists in the World
Famous Scientists in the World

List of Scientists:

 • अल्बर्ट आइनस्टाईन
 • मेरी क्यूरी
 • आयझॅक न्यूटन
 • चार्ल्स डार्विन
 • निकोला टेस्ला
 • सी. वी. रमण
 • ए. पी. जे. अब्दुल कलाम

मित्रांनो, वरील नमूद केलेल्या वैज्ञानिकांप्रमाणे देश विदेशात अनेक वैज्ञानिक व संशोधक होवून गेले आहेत. त्यांनी केलेल्या संशोधन कार्यामुळे आज पूर्ण विश्वात त्यांच्या नावाची कीर्ती पसरलेली आहे.  चला तर अश्या महान संशोधाकांबाद्द्ल थोडक्यात माहिती जाणून घेवूया.

१)  अल्बर्ट आइनस्टाईन – Albert Einstein

नाव अल्बर्ट हेर्मन्न आईनस्टाईन
जन्म १४ मार्च १८७९
जन्मस्थळ उल्मा (जर्मनी)
वडिल हेर्मन्न आईनस्टाईन
आई पौलिन कोच
विवाह पहिला विवाह मरिअक यांच्या बरोबर तर दुसरा विवाह एलिसा लोवेंन थाल यांच्या बरोबर
निधन १८ एप्रिल १९९५

मित्रांनो, विसाव्या शतकातील प्रारंभिक वीस वर्षांपर्यंत विज्ञान जगतात आपल्या कीर्तीची छाप सोडणारे जर्मन वंशीय सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म १४ मार्च १८७९ साली जर्मनीतील उल्मा या ठिकाणी झाला. अल्बर्ट आईनस्टाईन हे मानवी इतिहासातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती होते.  त्यांनी आपल्या संशोधनांच्या माध्यमातून, अंतरीक्ष, वेळ, आणि गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत दिले. त्यांची ख्याती इतकी प्रसिद्ध होती की, जेंव्हा ते कुठे बाहेर फिरायला जात तेव्हा लोक त्यांना अडवून त्यांच्या सिद्धांताची व्याख्या विचारत असत. अश्या वेळी अल्बर्ट आईनस्टाईन ‘तो मी नव्हेच’  या प्रकारची भूमिका घेत असत.

मित्रांनो, अल्बर्ट आईनस्टाईन या महान वैज्ञानिका बद्दल विशेष सागायचं म्हटल तर, ते लहानपणापासून हुशार नव्हते. त्यांच्या शालेय जीवनांत त्यांना मंदबुद्धी म्हणून चिडवल जात असे. त्यांच्या अंगी असलेल्या जिज्ञासू गुणवत्तेमुळे त्यांनी सतत अभ्यास करण्यात आपला वेळ व्यतीत केला.  त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारे गणित आणि भौतिकशास्त्र या सारख्या अवघड विषयांवर मात केली. त्यांच्या अंगी असलेल्या जीज्ञासुवृत्तीमुळे  त्यांनी भविष्यात लोकांना सापेक्षवादाचा सिद्धांत आणि द्रव्यमान ऊर्जा समीकरण E = Mc 2  चा सिद्धांत दिला.

अल्बर्ट आईनस्टाईन यांनी सादर केलेल्या सापेक्षवाचा सिद्धांत आणि प्रकश विद्युत वित्सर्जनाच्या  शोधाकरिता त्यांना सन १९२१ साली भौतिकशास्त्रातील नोबल पारितोषिक पुरस्कार देण्यात आला. मित्रांनो,  मंदबुद्धी म्हणून समजल्या जाणाऱ्या महान संशोधक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी जगाला दाखवून दिल की, कठोर परिश्रम, एकाग्रता आणि कामाप्रती असणारी जिज्ञासु वृत्तीमुळे कोणीही काहीही करू शकते.  अश्या या महान संशोधकाच्या जन्मदिवशी सन १४ मार्च रोजी अलौकिक दिवस म्हणून साजरा करता.  जर्मनीत जेंव्हा तानशाहा हिटलर यांचे शासन आले तेव्हा त्यांनी आपल्या देशातील यहुदी लोकांना देशाबाहेर काढलं.

अल्बर्ट आईनस्टाईन हे यहुदी धर्मीय असल्याने त्यांना सुद्धा अमेरीकेरत स्थलांतर कराव लागल.  अल्बर्ट आईनस्टाईन यांनी जर्मनी सोडल्यानंतर अमेरिकेच्या न्यूजर्सीत येऊन स्थायिक झाले होते. याच ठिकाणी “प्रिस्टन” महाविद्यालयात काम करीत असतांना १८ एप्रिल १९५५ साली त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

अल्बर्ट आईनस्टाईन यांना मिळालेले पुरस्कार – Albert Einstein Award

 • सन १९२१ साली आईन्स्टाईन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार.
 • सन १९२१ साली त्यांना मत्तयूक्की पदक देण्यात आलं.

२) मेरी क्यूरी – Marie Curie

मित्रांनो,  विज्ञान क्षेत्रांतील महत्वपूर्ण संशोधनामुळे दोन वेळा नोबल पारितोषिक पुरस्कार मिळविण्याचा मान पटकाविणाऱ्या प्रसिद्ध  भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ मेरी स्कोडोव्हस्का क्यूरी यांचा जन्म सन ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंड देशाची राजधानी वॉर्सा येथे झाला. मेरी क्युरी यांनी केलेल्या भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी त्यांना सन १९०३ साली आणि सन १९११ साली रसायन शास्त्रातील संशोधनाकरिता नोबल पारितोषिक बहाल करण्यात आला.

मेरी क्युरी यांचे मूळ नाव मारिया स्कोडोव्हस्का असून, त्यांच्या वडिलांचे नाव वाल्दिस्लाव असे होते. त्यांचे वडिल हे गणित आणि विज्ञान विषयांचे शिक्षक होते. तसचं, मेरी क्युरी यांच्या आईचे नाव ब्रोनिस्लावा असे असूण, त्या एक उत्तम शिक्षिका आणि पियानोवादक होत्या. मेरी क्युरी यांना जोसेफ, हेलेना, ब्रोनिस्लावा नावाची तीन भावंडे होती. सन ९ मे १८७८ साली मेरी क्युरी यांच्या आईचे क्षयरोगामुळे निधन झाले. सन २६ जुलै १८९५ साली मेरी क्युरी यांचा विवाह पिएर क्युरी या वैज्ञानिकासोबत झाला.

मेरी क्युरी यांचे कार्य – Work of Marie Curie 

मेरी क्युरी यांनी पाहिल्या महायुद्धाच्या काळात आपल्या देशांतील सैनिकांसाठी क्ष किरण व्हॅन टायर केली.  या व्हॅनच्या साह्याने त्या युद्धात जख्मी झालेल्या सैनिकांची तपासणी करीत असतं.  मेरी आणि पिएर क्युरी या दाप्त्याने पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले.

तसचं, मेरी क्युरी यांनी पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करुन नवीन मुलद्रव्याची भर घातली. या जोडीने  पोलोनियमपेक्षा १६५० पट  जास्त किरणोत्सारी असणाऱ्या रेडियम मूलद्रव्याचा शोध लावला. मित्रांनो, मेरी क्युरी या नोबल पारितोषिक मिळविणाऱ्या पहिल्या महिला होत्या.

तसचं,  दोन वेळा नोबल पारितोषिक मिळवणाऱ्या देखील त्या पहिल्या महिला आहेत.  अश्या महान नोबल पारितोषिक विजेता वैज्ञानिक मेरी क्युरी यांचे निधन सन ४ जुलै १९३४ साली रेडिएशनमुळे झालेल्या ल्युकेमिया आजाराने झाले.

३)  आयझॅक न्यूटन – Isaac Newton

मित्रांनो, कोणत्याही घानेचा विचार केल्याविना ती घटना कृतीत येवू शकत नाही, असे महान विचार आपल्या अंगी बाळगणारे आणि जगाला आपल्या विचारातून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत देणारे इंग्लंड देशांतील महान भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ सर  आयझॅक न्यूटन यांच्या विषयी थोडक्यात माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या महान भौतिकशास्त्रज्ञांचा जन्म सन २५ डिसेंबर १६४२ साली इंग्लंड मधील लिंकनशायर काउंटीच्या वूल्सथॉर्प-बाय-कोल्स्टरवर्थ,  या गावी झाला.

आयझॅक न्यूटन यांचे सुरुवातीचे जीवन खूप हलकीचे होते.  बालपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या आईनी दुसरे लग्न केले त्यामुळे त्यांना  आपल्या आजीच्या सोबत रहाव लागल. न्यूटन १२ वर्षाचे असतांना त्यांच्या सावत्र वडिलांचे सुद्धा निधन झाले. दुसऱ्या पतीच्या निधनानंतर आयझॅक न्यूटन यांची आई हाना आपल्या नूतन बाळासोबत आयझॅक राहत असलेल्या लिंकनशायर गावी परत आल्या. आयझॅक यांच्या आईनी त्यांचे शाळेतील नाव काढून त्यांना शेतात काम करण्यास पाठविले.

परंतु, मुळातच हुशार असलेल्या न्यूटन यांच्या डोक्यात शेतात काम करीत असतांना एक युक्ती सुचली. ते एका झाडाखाली बसले असतांना  ते हवेचा वेग मोजण्याचा विचार करू लागले. आपला विचार कृतीत आणत असतांना त्यांच्या मामानी त्यांना प्रश्न केला की, तू हे काय करत आहे.? तेव्हा त्यांनी उत्तर दिल मी हवेचा वेग मोजत आहे. न्यूटन यांच्या उत्तराने त्यांचे मामा विल्यम आयस्कॉफ अचंबित झाले. त्यांचे मामा विल्यम आयस्कॉफ हे केंब्रिज मधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत होते.

ते न्यूटन यांच्या अंगी असलेली हुशारी पाहून थक्क झाले.  त्यांनी आपल्या ताई हाना यांना न्यूटनला शाळेत दाखला घेण्यास सांगितलं.  यानंतर,  सन १९६१ साली न्यूटन ट्रिनिटी महाविद्यालयात दाखल झाले. यानंतर त्यांनी आपल्या कल्पना शक्तीच्या बळावर अनेक शोध लावले.  त्यातीलच एक गुरुत्वाकर्षणाचा शोध आपल्या सर्वांना माहितीच आहे. मित्रांनो, सन १६६८ साली आयझॅक न्यूटन यांनी ६ इंच लांब व एक इंच रुंद असलेली दुर्बीण तयार केली. लंडन संग्रहालयात आज देखील ती दुर्बीण आपणास पहावयास मिळते.

आयझॅक न्यूटन यांचे कार्य –  Work of  Isaac Newton

 • वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडून केप्लरचे नियम सिद्ध केले.
 • गणितीय क्षेत्रांत गतीचे नियम मांडले.
 • परावर्तीत दुर्बीण तयार केली, तसचं, प्रकाशाचे मुलभूत रंगाचे विघटन करून दाखवले.
 • ग्यॉटफ्रीड लिब्नित्झ याच्याबरोबर मिळून गणित क्षेत्रांतील कलन ही गणितशाखा विकसित केली.

आयझॅक न्यूटन यांचे गतिविषयक नियम – Isaac Newton Rule

इ,स, १६८७ साली आयझॅक न्यूटन यांनी आपले गतीचे नियम जगासमोर सादर केले होते.

 • पहिला नियम :- एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बाह्य बल क्रिया करीत नसेल तर ती वस्तू अचल अवस्थेत असल्यास त्याच स्थितीत राहील अथवा सरळ रेषेत एकसमान गतीत असल्यास ती सतत त्याच सरळ रेषेत एकसमान गतीने राहील. या नियमास जडत्वाचा नियम देखील म्हटलं जाते.

उदा. एक चुंबक दुसऱ्या चुंबकाकडे ओढला जाणे.

 • दुसरा नियम :- “संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.”

उदा. बंदुकीतून सुटलेली गोळी लक्ष स्थानी अचूक लागते.

 • तिसरा नियम :- क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात. मात्र त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात.

उदा. अग्निबाणाचे उड्डाण . आपल्या कल्पकतेच्या बळावर जगाला गुरुत्वाकर्षण तसचं, गतीचे नियम देणाऱ्या या महान शास्त्रज्ञाचे निधन सन २० मार्च १९२७ साली झाले.

४) चार्ल्स डार्विन – Charles Darwin

मित्रांनो, उत्क्रांती वादाचे जनक म्हणून प्रसिद्ध असणारे इंग्रज निसर्गवादी, भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांचा जन्म सन १२ फेब्रुवारी १८०९ साली इंग्लंड मधील शोर्पशायर श्रेव्स्बुरी याठिकाणी झाला होता.  चार्ल्स डार्विन यांचे वडिल रोबर्ट डार्विन हे एक समृद्ध डॉक्टर होते. ते त्याच्या परिवारातील सर्वात लहान व्यक्ती होते.  चार्ल्स डार्विन हे मोकळ्या विचाराचे व्यक्ती होते.

चार्क्स डार्विन यांना लहानपणापासूनच रसायनशास्त्र विषयाची खूप आवड होती.  म्हणून त्यांनी आपल्या घराच्या आवारात एक छोटीशी प्रयोग शाळा उभारली होती व त्या ठिकाणी ते आपले प्रयोग करीत असत.  इ.स. १८२५ साली डार्विन यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या क्राईस्ट महाविद्यालयातून पदवी धारण केली. त्या ठिकाणी त्यांना जीवाणू आणि विषाणू यांचे निरक्षण करण्याचे वेड  लागले. इ.स. १८२६ साली कॅप्टन किंग यांनी दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली.

तेव्हा चार्ल्स डार्विन यांचे मित्र हेन्स्लो यांच्या निमंत्रणावरून डार्विन देखील त्या मोहिमेत सामील झाले. सुमारे पाच वर्ष चाललेल्या या मोहिमेत डार्विन यांनी निरनिराळे पक्षी-प्राणी एकमेकांशी कसे वागतात, कसे एकमेकांशी जुळवून घेतात, याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला. तसचं, ते या मोहिमे अंतर्गत उत्क्रांतिवाद, सहजीवन आणि बळी तो कान पिळी यासारखे मुलभूत नैसर्गिक तत्व शिकले.

मानवाची निर्मिती चार पायी माकडांपासून कशी झाली. असे विचार त्यांच्या डोक्यात फिरू लागले. त्यांनी लिहिलेला origin of species हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. मानवी जीवनाला सापेक्षतेचा सिद्धांत देणाऱ्या महान वैज्ञानिकाचे इ.स.  १९ एप्रिल १८८२ साली वयाच्या ७४ वर्षी निधन झालं.

५) निकोला टेस्ला – Nikola Tesla

सर्बियायी अमेरिकी आविष्कारक, भौतिकशास्त्र विज्ञानी, यांत्रिकी अभियंता, विद्युत अभियंता व भविष्यवादी निकोला टेस्ला यांचा जन्म इ.स. १० जुलै १८५६ साली ऑस्ट्रीया साम्राज्यातील स्मिलजैन या ठिकाणी झाला होता. निकोला टेस्ला हे लहानपणापासून प्रतिभाव शाली व्यक्ती होते. त्यांना लहानपणापासून विज्ञान विषया प्रती खूप आवड होती.

टेस्लाची विविध पेटंट्स आणि सैद्धांतिक कामे वायरलेस संप्रेषण आणि रेडिओच्या विकासासाठी आधार असल्याचे सिद्ध झाले आहेत. टेस्ला यांनी विद्यत चुंबकीय क्षेत्रांत केलेली क्रांतिकारक विकास कार्य माइकल फैराडे  यांच्या विद्युत टेक्नॉलॉजीच्या सिद्धांतांवर आधारित होते. निकोला टेस्ला विशेष करून अल्टरनेटिंग-करंट (एसी) इलेक्ट्रिक सिस्टमच्या डिझाइनसाठी ओळखल्या जातात, जी आज जगभर वापरली जाणारी प्रमुख विद्युत यंत्रणा आहे. तसचं, त्यांनी “टेस्ला कॉइल” देखील तयार केली, जी अजूनही रेडिओ तंत्रज्ञानामध्ये वापरली जाते.

इ.स. १८८४ साली टेस्ला न्यूयॉर्क येथे दाखल झाले आणि थॉमस एडिसन यांच्या मॅनहॅटन मुख्यालयात अभियंता म्हणून नियुक्त झाले. तेथे त्यांनी एक वर्ष काम केलं आणि आपल्या व्यासंग आणि चातुर्याने त्यांनी एडिसन यांना प्रभावित केले. इ.स. १८९१ साली टेस्ला यांनी वेस्टिंगहाउस यांच्यासोबत मिळून शिकागो येथे जगातील कोलंबियन प्रदर्शनी प्रकाशित केली तसचं, नियाग्रा फाल्स या ठिकाणी एसी जनरेटर स्थापित करण्यासाठी सामान्य विद्युत धरकांसोबत भागीदारी केली.

त्यांनी आपल्या जीवनांत २०० पेक्षा जास्त आविष्कार केले. जगाला आपल्या नवीन नवीन शोधणे भारावून टाकणारे महान वैज्ञानिक सन ७ जानेवारी १९४३ साली त्यांच्या खोलीत मृत अवस्थेत आढळून आले.

६) सी. व्ही . रमण – C. V. Raman

मित्रांनो, आपल्या संशोधन कार्यातून आपली देशाचे नाव जगाच्या नकाशावर झळकवणारे महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमन यांचा जन्म इ.स. ७ नोव्हेंबर १८८८ साली तिरुचिरापल्ली, तामिळनाडू राज्यात झाला. रामन यांच्या वडिलांचे नाव चंद्रशेखर अय्यर व आईचे नाव पार्वती अम्मा असे होते. ते त्यांच्या आईवडिलांचे दुसऱ्या क्रमांकाचे पुत्र होते.

रमन यांचे वडिल ए. वी.  नरसिम्हाराव महाविद्यालय, विशाखापत्तनम, (विद्यमान आंध्रप्रदेश) येथे भौतिक विज्ञान और गणित विषयाचे प्रवक्ता होते.  शिक्षणाप्रती रुची असल्याने त्यांच्या वडिलांनी घरातच एक छोटेसे ग्रंथालय बनवले होते. याच कारणामुळे सी. वी. रमन यांचे गणित आणि विज्ञान विषयाप्रती गोडी निर्माण झाली होती. सन १९०४ साली रमन बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. रामन यांनी प्रथम क्रमांका बरोबर त्यान स्वर्ण पदक मिळालं. यानंतर त्यांनी  ‘प्रेसिडेंसी कॉलेज’ मधून एम. ए. चे शिक्षण घेण्यासठी दाखला घेतला आणि त्याकरिता त्यांनी भौतिकशास्त्र विषय निवडला.

महाविद्यालयीन जीवनांत रमन विविध शोधांचे लिखाण करीत असत.  त्यांच्या एका प्राध्यापकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपले शोध पेपर च्या स्वरुपात लिहून लंडन येथे प्रकाशित होणाऱ्या तत्वज्ञानाच्या मासिकात पाठविण्याचा सल्ला दिला. सन १९०६ साली केवळ १८ वर्ष वय असतांना त्यांचा पहिला शोध पेपर मध्ये छापल्या गेला.

सी. वी. रमन यांनी भौतिकशास्त्र विषयात केलेल्या अनेक शोधाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सी. वी. रमन यांनी केलेल्या रमन प्रभावाचा शोध सन २८ फेब्रुवारी १९२८ साली लागला होता. म्हणून या दिनाची आठवण म्हणून हा दिवस आपल्या देशांत राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

सी. वी. रमन यांना मिळालेले पुरस्कार – C. V. Raman Award

 • सन १९२४ साली सी. वी. रमन यांना लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य बनविण्यात आले.
 • सन १९२९ साली भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले होते.
 • सन १९२९ साली नाईटहुड हा बहुमान त्यांना देण्यात आला.
 • सन १९३० साली प्रकाशाचे प्रकीरण आणि रमन प्रभावाच्या शोधासाठी भौतिकशास्त्रातील नोबल पुरस्कार देण्यात आला.
 • सन १९५४ साली भारतरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आला.
 • सन १९५७ साली लेनिन शांती पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं.

सन ६ मे १९०७ साली सी, वी रमन यांचा विवाह लोकसुंदरी अम्मल यांच्या सोबत झाला होता. त्यांना दचंद्रशेखर आणि राधाकृष्णन नामक दोन पुत्र होते.  अश्या या महान वैज्ञानिकांचे निधन सन २१ नोव्हेंबर १९७० साली बंगळुरूमध्ये झाले. त्यावेळी ते  82 वर्षांचे होते.

७) ए. पी. जे. अब्दुल कलाम – A. P. J. Abdul Kalam

आपल्या देशाला क्षेपणास्त्र शास्त्रांच्या बाबतीत प्रगती पथावर आणणारे देशांतील महान एरोनॉटिक्स अभियांत्रिकी शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ साली रामेश्वर येथे झाला. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला येथे पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत होते.

अशी बेताची परिस्थिती असतांना देखील त्यांनी आपली शिक्षणाची गोडी सोडली नाही. कलाम यांनी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ महाविद्यालयातून बी. एस. सी. पदाची पदवी घेतली. यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. पुढील शिक्षणा करिता पैसे नसतांना त्यांच्या मोठ्या बहिणीने स्वत:चे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. 

या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कलाम सन १९६३ साली भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.

डॉ. अब्दुल कलाम यांनी विकसित केलेल्या अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे पूर्ण जगभर त्यांचे नाव झाले. वैज्ञानिक कार्याबरोबरच त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसचं, त्यांनी भारताचे ११ वे राष्ट्रपती पद देखील सांभाळल आहे. या प्रकारची अनेक कामगिरी सांभाळणाऱ्या महान वैज्ञानिकाच निधन सन २७ जुलै २०१५ साली  शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडल्यामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार – A. P. J. Abdul Kalam Award

 • सन १९९७ साली त्यांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

मित्रांनो, या महान वैज्ञानिकाचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top