मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

Marie Curie Information in Marathi

Marie Curie Information in Marathi
Marie Curie Information in Marathi

मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती – Marie Curie Information in Marathi

नाव (Name) मेरी क्युरी (Marie Curie)
जन्म (Birth) ७ नोव्हेंबर १८६७ (7th November 1867)
जन्मस्थान (Birth Place) वार्साव, पोलंड (Warsaw, Poland)
पेशा (Profession) शास्त्रज्ञ (Scientist)
पारितोषिक (Awards) नोबेल (१९०३ आणि १९११) (Nobel Prize in 1903 and 1911)
मृत्यु (Death) ४ जुलै १९३४ (4th July 1934)

मेरी क्युरी यांच्या बद्दल माहिती – Marie Curie Biography in Marathi

मेरी क्युरी ह्या एक शास्त्रज्ञ होत्या. त्यांचा जन्म पोलंड देशाची राजधानी वार्साव येथे ७ नोव्हेंबर १८६७ साली झाला होता. त्यांचे वडील हे शिक्षक होते. लहान वयातच त्यांना वडिलांकडून विज्ञानाचे धडे मिळाले होते. त्यांनी आपले शिक्षण भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांत पूर्ण केले. तसेच त्यांनी भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून देखील काम केले होते.

मेरी क्युरी यांचे अविष्कार – Marie Curie’s Inventions

मेरी क्युरी यांनी रेडीयम आणि पोलोनियम या किरणोत्सारी पदार्थांचा शोध लावला. त्यांनी पहिल्या महायुद्धातील जखमींच्या उपचारासाठी क्ष-किरण (X-Ray) गाडी आणि उपकरणे तयार केली. या किरणांमुळे रुग्णांची मोडलेली हाडे आणि त्यांना कुठे गोळ्या लागल्या आहेत हे बाहेरूनच बघू शकतो.

मेरी क्युरी यांचे विज्ञानातील योगदान – Marie Curie Contribution

यांनी शोधलेल्या रेडियम चा उपयोग कर्करोगाचा उपचार करण्यासाठी करण्यात येतो. पोलोनिम या पदार्थाचा उपयोग अंतराळातील उपग्रहांमध्ये उष्णता स्त्रोत म्हणून देखील वापर होतो. तसेच याचा वापर स्थिर उर्जा नाहीशी करण्यासाठी, फोटोग्राफिक फिल्म वरील धूळकण साफ करण्यासाठी होतो.

मेरी क्युरी यांची मुलगी – Marie Curie’s Daughter

मेरी क्युरी यांची मुलगी आयरिन क्युरी. त्यांचा जन्म १२ सप्टेंबर १८९७ साली झाला. आयरिन क्युरी ह्या देखील मेरी क्युरी प्रमाणे शास्त्रज्ञ होत्या. आपल्या आई वडिलांचा वारसा त्यांनी योग्यरीतीने पुढे चालवला. आयरिन यांना १९३५ साली रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

मेरी क्युरी यांचे विचार : Marie Curie’s Quotes

 1. “लोकांबद्दल नाही तर कल्पनांबद्दल उत्सुक रहा.”
 2. “परिपूर्णतेची भीती बाळगू नका, आपण त्या पर्यंत कधीही पोहचू शकत नाही.”
 3. “चांगले जग निर्माण करायचे असेल तर स्वतः पासून सुरुवात करा.”
 4. “मला वाटते, प्रगती हि लवकर आणि सहजा सहजी घडून येत नाही.”
 5. “कोणीही काय पूर्ण झाले ते बघत नसते, काय अपूर्ण आहे या कडेच सर्वांचे लक्ष असते.”
 6. “असे काही वैज्ञानिक असतात जे सत्य स्थापित करण्याऐवजी चुका शोधण्याची घाई करतात. ”

मेरी क्युरी यांचा मृत्यु – Marie Curie Death

४ जुलै १९३४ साली मेरी यांचा मृत्यु झाला. अप्लास्टिक अनेमिया या आजाराने त्या ग्रस्त होत्या. आपल्या आयुष्यात दीर्घ काळापर्यंत किरणोत्सारी पदार्थांच्या संपर्कात असल्याने त्यांचा मृत्यु झाला असे म्हटल्या जाते.

मेरी क्युरी यांना मिळालेले पुरस्कार : Marie Curie’s Awards and Honours

 • मेरी क्युरी यांचे विज्ञान क्षेत्रातील योगदान हे त्यांना मिळालेल्या पुरस्कारांवरून दिसून येते.
 • १९०३ साली त्यांना आणि बेक्वेरेल भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
 • १९११ साली त्यांना दुसऱ्यांदा किरणोत्सारा साठी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
 • डेवी मेडल ऑफ रॉयल सोसायटी हा सन्मान त्यांना १९०३ साली देण्यात आला.

मेरी क्युरी यांच्या बद्दल तथ्य : Facts about Marie Curie

 1. दोन वेळा नोबेल पारितोषिक मिळालेल्या मेरी क्युरी ह्या पहिल्या शास्त्रज्ञ आहेत.
 2. त्यांनी आपला आविष्कार हा एका जुन्या छता खाली केला होता.
 3. त्यांची वापरलेली पुस्तके अजूनही किरणोत्सारी असल्याचे म्हटल्या जाते.
 4. क्युरी यांना थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी प्रवृत्त केले होते.
 5. नोबेल च्या दोन वेगवेगळ्या विभागांत पारितोषिक मिळविणाऱ्या त्या प्रथम व्यक्ती आहेत.

काही महत्वाचे प्रश्न : (FAQs)

१. मेरी क्युरी याचे पूर्वीचे नाव काय होते ?

उत्तर : मारिया स्क्लोदोस्का.

२. मेरी क्युरी यांच्या पतीचे व मुलीचे नाव काय आहे ?

उत्तर : पतीचे नाव पिएरे क्युरी आणि मुलीचे नाव आयरिन क्युरी.

३. मेरी क्युरी यांना कधी व कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक दिले गेले ?

उत्तर : भौतिकशास्त्र (१९०३) आणि रसायनशास्त्र (१९११).

४. मेरी क्युरी यांना कशासाठी ओळखले जाते ?

उत्तर : रेडियम आणि पोलोनियम पदार्थांच्या शोधासाठी.

५. भौतिकशास्त्रामध्ये १ क्युरी म्हणजे काय ?

उत्तर : १ क्युरी म्हणजे १ ग्राम रेडियम मधून १ सेकंदाला होणारा किरणोत्सर्ग होय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here