Friday, June 2, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

भारतीय वैज्ञानिक आणि संशोधनकर्ता विक्रम साराभाई

Vikram Sarabhai Marathi Mahiti

मित्रांनो, विक्रम अंबालाल साराभाई हे आपल्या भारत देशांतील एक महान भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. विक्रम साराभाई यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी करिता त्यांना भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेचे जनक आणि भारतातील अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.

विक्रम साराभाई यांनी केलेल्या अंतराळ संशोधन संस्थेच्या पायाभरणीमुळे आज आपला देश जगात अंतराळ संस्थेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे. त्यांनी रचलेल्या या अंतराळ संस्थान मार्फत देश विदेशातील अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. आपल्या भारत देशाला अंतराळ क्षेत्राच्या बाबतीत मजबूत स्थितीत आणणाऱ्या या महान शास्त्रज्ञांबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

भारतीय वैज्ञानिक विक्रम साराभाई – Vikram Sarabhai Information in Marathi

Vikram Sarabhai Information in Marathi

विक्रम साराभाई यांचा अल्पपरिचय – Vikram Sarabhai Biography in Marathi 

नाव (Name) विक्रम अंबालाल साराभाई (Vikram Sarabhai)
जन्म (Birthday) 12 ऑगस्ट 1919
जन्मस्थान (Birthplace)अहमदाबाद
आई (Mother Name)सरला देवी
वडील (Father Name)अंबालाल साराभाई

विक्रम साराभाई यांच्या जीवनाविषयी माहिती – Vikram Sarabhai History in Marathi

विक्रम साराभाईंचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी गुजरात मधील अहमदाबाद इथं झाला. त्याचं व्यापारी कुटुंब अत्यंत श्रीमंत होतं आणि विक्रम साराभाई साठी त्यांचा परिवार फार महत्वाचा होता. त्यांचे वडील अंबालाल साराभाई एक समृद्ध उद्योगपती होते, गुजरात इथं त्यांच्या अनेक मिल्स होत्या. अंबालाल आणि सरलादेवी यांच्या 8 अपत्यांपैकी विक्रम साराभाई हे एक. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळाव या करता सरला देवींनी मोंटेसरी पद्धतीची खाजगी शाळा काढली. त्यांच्या या शाळेचं पुढे फार नाव झालं.

विक्रम साराभाईंचा परिवार स्वातंत्र्य संग्रामात सक्रीय असल्याने महात्मा गांधी , रवींद्रनाथ टागोर, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरूंसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे त्यांच्या घरी येणे-जाणे होते. त्या सर्वांचा विक्रम साराभाई यांच्या आयुष्यावर फार प्रभाव पडला आणि त्यांच्या वैयक्तिक विकासात मोलाची भर पडली. इंटरमिडीएट विज्ञान परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विक्रम साराभाईंनी अहमदाबाद च्या गुजरात महाविद्यालयातून मेट्रिक पूर्ण केले.

पुढे ते इंग्लंडला निघून गेले आणि तेथील कैम्ब्रीज युनिवर्सिटीच्या सेंट जॉन महाविद्यालय मधून उच्चशिक्षित झाले. 1940 साली साराभाईंना प्राकृतिक विज्ञानात त्यांच्या योगदानासाठी कैम्ब्रीज इथं ट्रीपोस देण्यात आला. पुढे दुसऱ्या विश्वयुद्धाचे वारे वाहू लागल्याने विक्रम साराभाई भारतात परतले आणि भारतीय विज्ञान संस्था बैंगलोर इथं सर सी.व्ही. रमण (नोबेल पुरस्कार विजेता) यांच्या मार्गदर्शनात अवकाशातील किरणांवर संशोधन सुरु केलं. विश्वयुद्ध संपल्यानंतर ते पुन्हा कैम्ब्रीज युनिव्हर्सिटी ला परतले आणि अंतरीक्ष किरणांवर आधारीत त्यांचा शोधप्रबंध उष्णकटिबंधीय अक्षांश आणि संशोधन प्रस्तुत केल्याने त्यांना 1947 साली पीएचडी प्रदान करण्यात आली.

विक्रम साराभाईंचा विवाह – Vikram Sarabhai Life History

1942 मधे विक्रम साराभाई यांचा विवाह प्रसिद्ध क्लासिकल डांसर मृणालिनी साराभाई यांच्याशी झाला. त्यांचा विवाह समारोह चेन्नई इथं आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महात्मा गांधींचे भारत छोडो आंदोलन सुरु असल्याने साराभाई यांच्या परिवारातील कुणीही त्यांच्या विवाहाला उपस्थित राहू शकले नाही.

विक्रम आणि मृणालिनी यांना दोन मुलं झाली, कार्तिकेय साराभाई आणि मल्लिका साराभाई. मल्लिका साराभाई या प्रसिद्ध नृत्यांगना असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

विक्रम साराभाई यांची कारकीर्द – Scientist Vikram Sarabhai

सन १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यानंतर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. तेथे त्यांनी सन १९४७ साली ‘कॉस्मिक रे इन्वेस्टिगेशन इन ट्रॉपिकलया लॅटीट्यूड्स’ या विषयावर संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवली.  स्वतंत्र भारतात परत आल्यानंतर त्यांनी सन ११ नोव्हेंबर १९४७ साली अहमदाबाद येथे भौतिक संशोधन कार्यशाळेची स्थापना केली. तसचं, त्यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) ची स्थापना करण्यात महत्वाची भूमिका बजावली. विकर्म साराभाई यांनी अहमदाबाद येथे साकारलेल्या रिसर्च सेंटर मधून सन १९७५ साली आपल्या देशांतील पहिला अंतरीक्ष उपग्रह ‘आर्यभट्ट’  अवकाशात सोडण्यात आला.

मित्रांनो, विक्रम साराभाई यांनी आंतरराष्ट्रीय पातळीच्या अनेक संस्थांची निर्मिती केली आहे. ज्या खालील प्रमाणे आहेत.

  • भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट ‘ (IIM)
  • भौतिकशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (PRL),
  • अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे ‘अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन’ (ATIRA)
  • पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था

यासारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्थांची निर्मिती साराभाई यांनी केली आहे.

विक्रम साराभाई यांना मिळालेली पारितोषिक –  Vikram Sarabhai Award

  • सन १९६६ साली पद्मभूषण पुरस्कार
  • सन १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार

विक्रम साराभाईंचा मृत्यू – Vikram Sarabhai Death

30 डिसेंबर 1971 रोजी डॉ. विक्रम साराभाईंचे तिरुअनंतपुरम येथील कोवलम इथे निधन झाले. त्यावेळी ते थुंबा रेल्वेस्थानकावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिरुअनंतपुरम येथे गेले होते. त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये जास्त प्रवास आणि कामाचा ताण यामुळे त्यांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम झाला होता. त्यांच्या मृत्यूचे देखील हेच कारण सांगितले जाते.

विक्रम साराभाईंच्या जीवनाविषयी महत्वपूर्ण माहिती – About Vikram Sarabhai Mahiti

  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर साराभाई भारतात परतले, भारतात वैज्ञानिक सुविधांच्या विकासावर त्यांनी भर दिला. त्यांच्या कुटुंबाने चालविलेल्या अनेक समाजसेवी संस्थाना त्यांनी सहाय्य केलं, व 1947 मधे अहमदाबाद इथं भौतिक अनुसंधान प्रयोगशाळेची स्थापना केली.
  • विक्रम साराभाई हे एक वायूमंडलीय वैज्ञानिक होते, शिवाय PRL चे संस्थापक देखील होते. त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या प्रयोगशाळेत अंतरीक्ष किरणां संबंधित अनेक प्रयोग केल्या गेले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अंतरीक्ष विज्ञान आणि अंतरीक्ष किरणं याविषयी त्यांच्या संस्थांनी अनेक यशस्वी प्रयोग केलेत.
  • विक्रम साराभाई IIM, अहमदाबाद (इंस्टीट्युट ऑफ मैनेजमेंट) चे संस्थापक अध्यक्ष होते. आपले दुसरे व्यावसायीक कस्तुरभाई लालभाई यांच्यासमवेत त्यांनी 1961 साली शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक विकासात्मक कामं केलीत.
  • 1962 मधे अहमदाबाद इथं प्राकृतिक योजना आणि तंत्रज्ञान विश्वविद्यालय (CEPT University) स्थापन करण्यात साराभाईंचं महत्वपूर्ण योगदान आहे.
  • 1965 साली त्यांनी नेहरू विकास संस्थेची (NFD) स्थापना केली. भारतात शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राचा विकास हा या संस्थेचा मुख्य हेतू होता.
  • 1960 साली त्यांनी विक्रम ए. साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर (VASCSC) ची स्थापना केली, जेणेकरून विज्ञान आणि गणित विषयात लोकांची रुची वाढेल आणि साराभाई यांना विद्यार्थ्यांना या विषयांचे ज्ञान देता येईल. आपल्या देशात विज्ञाना प्रती लोकांची रुची वाढावी हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता.
  • डॉ. विक्रम साराभाई यांनी डॉ. होमी भाभा यांना त्यांच्या उपक्रमात खूप मदत केली. डॉ. भाभा न्युक्लीयर अनुसंधान करणारे पहिले भारतीय होते. डॉ. भाभांनी देखील साराभाई यांना पहिले रॉकेट लॉन्चींग स्टेशन, थुंबा च्या निर्मितीत सहाय्य केले होते. ज्याचे उद्घाटन 21 नोव्हेंबर 1963 ला करण्यात आले.
  • भारतात1969 साली भारतीय अंतरीक्ष अनुसंधान संस्थेच्या (ISRO) स्थापनेत साराभाई यांच महत्वपूर्ण योगदान राहिलंय. भारतात तंत्रज्ञानाचा उपयोग वाढावा आणि देशाची सेवा करणे हाच या संस्थेचा प्रमुख उद्देश होता.

वरील संपूर्ण माहितीचे लिखाण आम्ही,  वाचलेल्या पुस्तकांच्या माहितीच्या आधारावर केले आहे. जरी आपणास यात कोणतीही चूक आढळून आल्यास आम्हाला कळवा. तसचं, आपणाकडे आणखी काही माहिती असल्यास आम्हाला सांगा.

Previous Post

जीवनाला योग्य दिशा देणारे लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार

Next Post

 महाराष्ट्राची आन बाण शान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित स्टेटस

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu पूर्ण नाव द्रौपदी श्याम मुर्मू जन्म 20 जून 1958 उपरबेडा, जि. मयूरभंज (ओडिशा राज्य) राजकीय कारकीर्द 1997 ते...

by Editorial team
July 13, 2022
Next Post
Shivaji maharaj Status in Marathi

 महाराष्ट्राची आन बाण शान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित स्टेटस

Why Animals Eyes Shine at Night

तुम्हाला माहिती आहे का ....प्राण्यांचे डोळे रात्री का चमकतात? जाणून घ्या या लेखाद्वारे.

23 April History Information in Marathi

जाणून घ्या २३ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष

Marathi Wishes for Retirement

हे Retirement Wishes देऊन करा आपल्या सहकारी मित्राला निवृत्त

Jhansi Fort Information in Marathi

झाशीच्या किल्ल्याची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved