ईनडोअर खेळांपैकी सगळ्यात आवडणारा खेळ “कॅरम”

Carrom Information in Marathi

आपल्या भारतात मैदानी खेळाचे जसे असंख्य चाहाते आहेत अगदी तसच ईनडोअर गेम खेळणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे असाच ईनडोअर खेळांपैकी एक खेळ आहे ‘कॅरम’. अतिशय सरळ साधा सोपा असं या खेळाचं वर्णन आपल्याला करता येतं. आपल्या मनोरंजनाकरता याला मोठया प्रमाणात खेळणारे सुध्दा आहेत.

कॅरम बोर्ड लहान मुलं, महिला वर्ग, तरूण, वृध्द अशी सर्व वयोगटातील मंडळी अगदी सहज खेळु शकतात. हा खेळ खेळतांना दोन, तीन किंवा चार खेळाडुंची गरज भासते.

ईनडोअर खेळांपैकी सगळ्यात आवडणारा खेळ “कॅरम” – Carrom Information in Marathi

Carrom Information in Marathi

साहित्य – Carrom Board Striker Material

हा खेळ खेळण्याकरता एक कॅरम बोर्ड, नऊ-नऊ काळया आणि पिवळया सोंगटया आणि एक लाल रंगाची सोंगटी जीला क्विन अथवा राणी असं म्हणतात, एक स्ट्राइकर (ज्याने गोटयांना मारण्यात येतं आणि कॅरम बोर्ड च्या चारही कोपऱ्यात असलेल्या छिद्रांमध्ये टाकल्या जातं) कॅरम वर टाकण्याकरता बोरीक पावडर (याने गोटया कॅरम वर अगदी सहजतेने सरकतात)

कॅरम खेळण्याची सुरूवात – Carrom History

हा खेळ खेळण्याची सुरूवात भारतिय उपमहाव्दीप येथे झाल्याचे बोलले जाते. पहिल्या महायुध्दानंतर हा खेळ अत्यंत लोकप्रीय झाला. सुरूवातीच्या काळात कॅरम च्या अनेक स्पर्धा देखील आयोजित केल्या जायच्या.

साधारण 1935 च्या सुमारास हा खेळ भारता व्यतिरीक्त श्रीलंकेत देखील खेळला जाऊ लागला अधिकृतरित्या कॅरमकरीता स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात येऊ लागले.

आंतरराश्ट्रीय स्वरूपात याचा विकास हा 1988 ला झाला. याच काळात आंतरराश्ट्रीय कॅरम महासंघाची स्थापना भारतात चेन्नई येथे करण्यात आली. याच वर्शी या खेळासंबंधीचे नियम देखील प्रकाशित करण्यात आले. हळुहळु कॅरम हा खेळ अन्य देशांमध्ये देखील अत्यंत लोकप्रीय झाला आणि संपुर्ण विश्वातील लोकांना या खेळाचा परिचय झाला.

हा खेळ भारताप्रमाणेच श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तानात देखील फार प्रसिध्द आहे.

जसं आपण भारतिय याला कॅरम या नावाने ओळखतोनं अगदी त्याच पध्दतीनं फिजी इथं विंडी-विंडी व इस्त्रायल इथं जी-जी या नावांने हा खेळ प्रचलित आहे.

हिंदी चित्रपटांनी देखील कॅरम या खेळाला बऱ्यापैकी प्रसिध्दी मिळवुन दिल्याचं आपल्या लक्षात येतं.

आता हेच पहा नां, ‘स्ट्राइकर’ ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सारख्या पाॅप्युलर चित्रपटांमध्ये मोठमोठे कलाकार कॅरम खेळतांना पहायला मिळतात.

मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात तर कॅरम हा खेळ असाध्य आजाराने ग्रस्त वृध्दाला आपलें दुःख विसरायला मदत करतो असं दाखवलयं. या रूग्णाचे पात्र चित्रपटातील महत्वाचे कॅरेक्टर असल्याचे आपल्याला दिसते.

‘अंकुश’ या गंभीर विषयवार आधारित चित्रपटात चार बेरोजगार युवकांना ‘कॅरम’ काही काळ का होईना आयुष्यात येणाऱ्या कटु अनुभवांना विसरण्यासाठी मदत करतांना दाखवलयं.

कॅरमबोर्ड वर खेळण्यात येतो हा खेळ – Carrom Board Game

प्लायवुड अथवा हार्ड बोर्ड वर हा खेळ खेळल्या जातो. हा बोर्ड चैकोनी आकाराचा बनविण्यात आलेला असतो. या बोर्ड च्या खालच्या बाजुला लाकडी फ्रेम फिक्स करण्यात आलेली असते जेणेकरून कॅरमबोर्ड ला मजबुती प्राप्त होते. कॅरम बोर्ड च्या चारही कोपर्यांमध्ये चार छिद्र असतात. या छिद्रांमध्येच खेळतांना खेळाडु गोटया टाकतात. कॅरमबोर्ड च्या मध्यभागी एक मोठया आकाराचा गोल असतो त्याची गोलाई सुमारे 15 सेंटिमिटर असते.

सोंगटयांचा खेळ – Carrom Game

कॅरम बोर्ड वर मधोमध लाकडाच्या पिवळया आणि काळया गोटया मधोमध लाल गोटी ठेवुन सजवल्या जातात. लाला रंगाच्या गोटीला राणी किंवा क्विन असे म्हणतात, या गोटया साधारण तीन सेंटीमिटर आणि मोठयातमोठया साडे चार सेंटीमिटर असतात. कॅरमबोर्डवर एकुण 19 गोटया असतात, 9 गोटया काळया 9 गोटया पिवळया आणि 1 क्विन अश्या एकुण 19 सोंगटया.

स्ट्राइकर ने काळी गोटी छिद्रात टाकल्यास 1 गुण आणि पिवळी गोटी टाकल्यास 2 गुण मिळतात क्विन घेतल्यास 5 अंक प्राप्त होतात. कॅरमबोर्डवर एखादी गोटी तुटल्यास किंवा हरविल्यास त्याच रंगाची दुसरी गोटी ठेवण्यात येते.

स्ट्राइकर बजावतो महत्वाची भुमिका – Carrom Striker

कॅरम खेळतांना खेळाडु स्ट्राइकरने चारी छिद्रापैकी कोणत्याही छिद्रात गोटी टाकुन गुण मिळविण्याचा प्रयत्न करतो. स्ट्राइकर ची गोलाई ही 4 ते 6 सेंटिमीटर च्या मधात असायला हवी. गोटयांना छिद्रात टाकतांना खेळाडु स्ट्राइकर गोलाच्या बाहेर ठेवु शकत नाही. बोर्डवरील चारही छिद्रांच्या समोर एक लांब बाणाची खुण केलेली असते या खुणेवर देखील खेळाडु आपला हाथ किंवा बोटं ठेवु किंवा टेकवु शकत नाही.

भारतात उज्वल आहे कॅरम चे भविष्य:

आपल्या भारतात अनेक नामवंत खेळाडु झाले आहेत. त्यांना खेळतांना पाहुन भारतातील इतरही तरूण खेळात आपले उज्वल भविश्य शोधतांना दिसतात.

आपल्या भारतातील मारिया इरूदयुम दोन वेळेस विश्व विजेता झाले आहेत. 1996 च्या अर्जुन पुरस्काराने त्यांना गौरवान्वित करण्यात आले आहे. भारतातील तरूणांकरता मारिया एक प्रेरणास्त्रोत आहे.

कॅरम चे नियम – Carrom Rules

कॅरम खेळतांना चार खेळाडुंची आवश्यकता असते. दोन खेळाडुंची मिळुन एक टिम अश्या तऱ्हेने हे खेळाडु आमने सामने बसतात. प्रत्येक संघाचे गुण वेगवेगळे मोजल्या जातात, ज्या संघातील दोन्ही खेळाडुंचे गुण अधिक तो संघ विजयी घोशीत केला जातो.

कॅरम चा एक खेळ हा 29 अंकांचा असतो एका मॅच मध्ये 29-29 अंकाचे तीन खेळ असतात. जो खेळाडु तिन पैकी दोन खेळ जिंकतो तोच खेळाडु स्पर्धा देखील जिंकतो.

कॅरमसिंगल्स सुध्दा खेळला जातो:

या खेळात खेळाडु आपल्या गोटया घेतांना प्रतिस्पर्धी खेळाडुच्या गोटया अडविण्याचा प्रयत्न करत असतो.

स्ट्राइकर ने शॉट मारतांना खेळाडुच्या हाताचा किंवा बोटाचा स्पर्श कॅरम ला होता कामा नये. असे झाल्यास खेळाडुची शॉट मारण्याची संधी हुकते.

खेळाडुने स्ट्राइकर ठेवतांना सुध्दा काळजी घ्यायला हवी. स्ट्राइकर बरोबर दोन रेशांच्या मधोमध ठेवावयास हवा, जर चुकुन तो केवळ एकाच रेशेला स्पर्श करत असेल तर तो फाऊल मानण्यात येतो.

खेळाडुने बाणाचे निशाण नेहमी आपल्या लक्षात ठेवावयास हवे.

शॉट मारतांना जर स्ट्राइकर छिद्रात गेला तर पेनल्टी म्हणुन खेळाडुला छिद्रात गेलेल्या दोन गोटया पुन्हा कॅरम बोर्डवर ठेवाव्या लागतात. पण जर त्या वेळेस खेळाडु जवळ गोटया नसतील तर ज्यावेळेस सोंगटया येतील त्यावेळी त्याच्या कडुन ही पेनल्टी वसुल करण्यात येते.

खेळतांना जर सोंगटीला खेळाडुच्या बोटाचा स्पर्श झाला तर त्याला ती गोटी पुन्हा बोर्डवर ठेवावी लागते.

खेळाच्या अखेरीस बोर्डवर जर एक काळी एक पिवळी आणि एक लाल अश्या सोंगटया शिल्लक राहील्या तर सर्वात आधी खेळाडुला लाल गोटी घेऊन त्याचे कव्हर घ्यावे लागते (त्या वेळेस जर लगेच कव्हर घेतल्या गेले नाही तर पुन्हा लाल गोटी छिद्रातुन काढत बोर्डवर ठेवावी लागते)

कॅरम हा अत्यंत सहजतेने खेळला जाणारा खेळ असुन कोणत्याही वयोगटातले खेळाडु हा खेळ खेळु शकतात. त्यामुळेच या खेळाची लोकप्रियता वाढलेली दिसुन येते. या खेळाचे नियम देखील अत्यंत साधे आणि सर्वसामान्यांना समजणारे असल्याने हा खेळ आजच्या घडीला अत्यंत मनोरंजक आणि वेळ घालविण्याचे फार चांगले माध्यम म्हणुन पुढे आला आहे.

Read More:

आशा आहे की आपणास “कॅरम या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास – Carrom Information in Marathi” याविषयी हा लेख उपयुक्त वाटेल. जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर कृपया फेसबुकवर शेअर करा.

टीपः आम्ही अचूकतेसाठी प्रयत्न करतो. कृपया आम्हाला सांगा की आपल्याला या लेखात कॅरम या खेळाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास योग्य दिसत नसेल किवां आपल्याकडे कॅरम या खेळाबद्दल अधिक माहिती असल्यास आम्हाला कमेंट च्या माध्यमातून कळवा ती योग्य असल्यास आम्ही या लेखात नक्कीच अपडेट करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here