या गोष्टींना पाहून आपल्याला आपले बालपण नक्कीच आठवणार..

Childhood Memories List

“लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा”

या अभंगात संत तुकाराम महाराज यांनी देवाला मागताना हेच मागितले कि देवा आम्हाला लहान पण दे कारण लहान पणी ना कशाची चिंता असते ना कोणत्या गोष्टीची काळजी. बस आपण मस्त स्वतःच्या धुंदीत राहायचं असत आणि आयुष्य जगायचं असत.

आपल्या लहानपणी सुद्धा काही घडलेल्या घटना किंवा तेव्हाच्या काही गोष्टी आपल्याला आठवत असतीलच, आणि त्यामध्येही ज्यांचा जन्म ९० च्या शतकातला असणार तर आपले बालपण जगापेक्षा खूपच वेगळे असणार आहे, कारण बालपणाचा जो आनंद ९० च्या शतकात जन्म घेतलेल्या पिढीने घेतला आहे कदाचितच तो कोणत्या पिढीला लाभला असेल. तो आजच्या शतकातील पिढीला मिळणार सुद्धा नाही,

कारण ९० चे शतक असे होते कि त्यामध्ये बऱ्याच गोष्टींची सुरुवात हि नव्याने झाली होती, आणि तेव्हा त्या नवीन आलेल्या गोष्टींसोबत जगण्यात जी मजा होती ती आजच्या डिजिटल युगात सुद्धा नाही. ती मजा एक वेगळीच मजा होती.

तर आजच्या लेखात आपण ९० च्या शतकातील काही गोष्टींची आठवण करून देणार आहे. ज्या गोष्टींना पाहिल्या आणि वाचल्या नंतर आपल्याला आपल्या लहानपणाची आठवण होईल.
तर चला पाहूया…

या गोष्टींना पाहून आपल्याला आपले बालपण नक्कीच आठवणार..

१) शक्तिमान – Shaktiman

Shaktiman
Shaktiman

आज जरी सगळीकडे अवेंजर्स ना सुपर हिरो म्हणून ओळखल्या जात असेल, तरी सुद्धा ९० च्या शतकातमध्ये सर्वांचा सुपरहिरो हा शक्तिमानच होता, लहानपनाला या टीव्ही शो ने आणखी एक उत्साह दिला.

२) Mango Bite.

Mango Bite
Mango Bite

नाव घेतल्या बरोबर तोंडाला पाणी सुटणारी तेव्हाची सर्वांची फेवरेट कॅन्डी Mango Bite. जर दोघे जन आहेत आणि एकच कॅन्डी असली तर ती कॅन्डी कशी खायचो आपल्यालाच माहिती आहे.

३) कॅसेटस् – Cassette tape

Cassette tape
Cassette tape

आज गाणे ऐकण्यासाठी आपल्याकडे किती सारे पर्याय आहेत, मग ते यु ट्यूब असो कि आणखी कोणते म्युसिक अ‍ॅप, पण ९० च्या शतकात जर आपल्याला गाणे ऐकायचे असले तर आपल्याला या कॅसेट्स चा वापर करावा लागत असे, आणि गाण्यांचा आनंद घ्यावा लागत असे.

४) थंड पेप्सी – Pepsi Cola

Pepsi Cola
Pepsi Cola

९० च्या शतकात उन्हाळ्यामध्ये मनाला गारवा देण्यासाठी या थंड पेप्सी खाल्या जात असतं. या पेप्सी ला आजही आठवले कि त्या पेप्सी चा स्वाद आठवतो.

५) काचाच्या गोळ्या – Kanche Game

Kanche Game
Kanche Game

आता सगळीकडे ऑनलाईन व्हिडीओ गेम्स खेळल्या जातात, पण लहानपणी सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या खेळांपैकी एक तो म्हणजे काचाच्या गोळ्या. आमच्या कडे गोल रिंगणात ह्या गोळ्यांना ठेवून त्यापैकी एक एक गोळीला उडवावे लागायचे.

६) रेनोल्ट चा पेन – Reynolds Pen

Reynolds Pen
Reynolds Pen

या पेनाला आपण लहानपणी पाहिले असणारच, हाच तेव्हाचा सर्वात जास्त विकल्या जाणारा पेन होता. आणि सर्वांना आवडणाऱ्या पेनांपैकी एक.

७) पोंगे – Ponga Pandit Food

Ponga Pandit Food
Ponga Pandit Food

९० च्या शतकात टाईमपास करण्यासाठी आपण या गोष्टीचा आनंद घेतलाच असेल, चित्रात दाखविल्याप्रमाणे आपण हि कोणती गोष्ट आहे ओळखलेच असेल, आपल्याकडे याला काय म्हणातात. आम्हाला नक्की सांगा.

८) गाडीची चावी.

Old Toy Key

 

आपल्याकडे आता कितीही मोठी गाडी असेल पण प्रत्येकाची सर्वात आधीची गाडीची चावी हीच होती.

९) पेपर पॅड – Paper Pad

Paper Pad
Paper Pad

आपण याला ओळखले असेलच, काहीही लिहायच्या वेळेस आपल्याला याची मदत व्हायची, परीक्षेला जाताना सोबत घेऊन जायचो तसेच आम्ही तर याने रूम क्रिकेट सुद्धा खेळायचो.

१०) व्हिडिओ गेम – Video Game

Video Game
Video Game

लहानपणीच्या या व्हिडीओ गेम ला आपण ओळखले असणारच, यामधील ब्रिक्स चा गेम तेव्हाचा आपल्यासाठी व्हिडीओ गेम होता.

या लेखाने आपल्याला ९० च्या दशकाचे दर्शन करून दिले असणारच. आणि जुन्या आठवणी जागृत करायला मदत केली असेल अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ९० च्या शतकात आपण पाहिलेल्या आहेत आणि त्यांची मजा घेतली आहे. त्या आमच्यासोबत आपण शेयर करू शकता, कोणत्याही सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वर.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल, आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या ९० च्या शतकातील मित्रांना शेयर करायला विसरू नका, आपल्याला हा लेख आवडल्यास आम्हाला कळवा आम्ही बाकी राहिलेल्या काही गोष्टींची यादी आणखी आपल्यासाठी घेऊन येऊ. अश्याच नवनवीन आणि मजेदार लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You SO Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top