डॉक्टरने शेणाने लेपलेल्या एसयूव्ही गाडीमधून आपल्या मुलीला दिला निरोप, जाणून घ्या काय आहे या मागील सत्य!

Mulichi Anokhi Bidai 

मित्रांनो, आपण बातम्या, वर्तमानपत्र, आकाशवाणी किंवा इंटरनेट वर नवरीला निरोप देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पहिल्या, ऐकल्या व वाचल्या असतील. देश विदेशांतील पुष्कळ लोक लग्नसराईत नेहमीच काहीतर नवीन पद्धतीने लग्न करण्यापासून ते नवरीला निरोप देण्यापर्यंत प्रयत्न करीत असतात. जेणेकरून आपलं लग्न लोकांच्या लक्षात राहील. त्याकरिता लग्नाच्या साजसजावटीपासून ते डेस्टिनेशन वेडिंग इत्यादी गोष्टींचा आधार आपण घेत असतो. आजवर आपण मुलीची बिदाई करण्याच्या विविध पद्धती पाहिल्या असतील.

कोणी हेलिकॉप्टर, कोणी महागडी गाडी तर कोणी पॅराशूट आदी प्रमाणे मुलीची बिधाई आपण पाहली असेल परंतु, गाईच्या शेणाने लेपलेल्या गाडीतून वधूला सार करतांना आपण कधी पाहिलं आहे का? वाचून धक्का बसला ना, आणि हे कस काय शक्य आहे!  कोणी इतक्या महागड्या एसयूव्ही गाडीला शेण लावून आपल्या मुलीला निरोप का देईल? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. परंतु, हे खर आहे.

मित्रांनो, महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील औरंगाबाद या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. औरंगाबाद येथील एका डॉक्टरांने आपल्या लाडक्या मुलीला निरोप देण्यासाठी चक्क एका महागड्या एसयूव्ही गाडीला शेणाने सुशोभित करून त्या गाडीमधून आपल्या मुलीला निरोप दिला. काय आहे यामागील वास्तव्य चला तर जाणून घेवूया.

अश्या प्रकारे केली आपल्या लेकीची बिदाई – Kolhapur Cow dung Car in Wedding

Kolhapur Cow dung Car in Wedding
Kolhapur Cow dung Car in Wedding

मित्रांनो, त्या महान व्यक्तींचं नाव आहे डॉक्टर नवनाथ दुधाळ ते पेशाने एक डॉक्टर आणि वैज्ञानिक असून, त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे मुंबईतील टाटा रिसर्च हॉस्पिटल मध्ये सेवा केली आहे.

रुग्णालय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर डॉक्टर नवनाथ दुधाळ यांनी समाजसेवक राजीव दीक्षित यांच्या प्रेरणेने उस्मानाबाद येथे एक गुरुकुल गौशाला सुरु करून शेणखता विषयी संशोधन करण्यास सुरुवात केली. संशोधन करीत असतांना त्यांच्या निर्देशनात आलं की, गायीच्या शेणाचे बरेचसे फायदे आहेत जसे गायीच्या शेणामुळे कर्करोग बरा करू शकतो, आणि शेण हे बाहेरील तापमान कमी करू शकते.

डॉक्टर नवनाथ दुधाळ यांनी लग्नात आलेल्या सर्व वर्हाडी मंडळीना गायीच्या शेणाच्या वापरण्यास प्रोत्साहन म्हणून ही आगळीवेगळी पद्धत अवलंबविली. कारण स्पष्ट करताना नवनाथ दुधाळ म्हणाले की, शेण मानवांसाठी खूप फायदेशीर आहे, कर्करोग म्हणजे कन्सर  आणि मानवी शरीरात होणाऱ्या अनेक आजारांवर उपयोगी आहे. म्हणून डॉ. नवनाथ दुधाळ यांनी गायीच्या शेणावरील उपाय दर्शविण्यासाठी ही पद्धत अवलंबली, डॉक्टर नवनाथ दुधाळ यांच्या मते लग्ना मध्ये यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असूच शकत नाही.

याकारणास्तव, त्यांनी आपल्या मुलीला निरोप देतांना त्यांच्या महागड्या एसयूव्ही गाडीला शेणाचा लेप दिला होता. त्यांनी आपल्या या निर्णयाबद्दल सांगितल की, संपूर्ण गाडीला शेणाचा लेप लावण्यासाठी सुमारे तीस किलो शेणाचा वापर करण्यात आला होता. डॉ. नवनाथ दुधाळे यांचे असे म्हणने आहे की, शेण लावल्यानंतर उन्हाळ्यात गाडीचे तापमान कमी करण्यासाठी ए. सी. चा जास्त वापर करावा लागत नाही.

त्याचं बरोबर त्यांनी असा सुद्धा दावा केला आहे की,  उन्हाळ्यात गाईच्या शेणाचा वापर केल्यास गाडी लवकर थंड होते. इतकेच नाही तर गाडीला सुमारे सहा महिने धुण्याच काम पडणार नाही. ज्यामुळे दिवसाला किमान वीस लिटर तर सहा महिन्यात सुमारे ६००० ली. पाण्याची बचत होईल.

मित्रांनो, डॉ. नवनाथ दुधाळे यांनी आपल्या गाडीवर शेण लावण्याव्यातिरिक्त आपल्या मोबाईलच्या कव्हरला सुद्धा शेण लावले आहे. त्यांनी गाईच्या शेणापासून बनवलेली गणपतीची मूर्ती आपल्या गाडीत ठेवली आहे. डॉ. नवनाथ दुधाळ यांचे याबद्दल अस मत आहे की, मोबाईलच्या किरणोत्सर्गामुळे कव्हर वर शेणाचा लेप लावल्यास बचाव करता येईल तसचं, गाडी मध्ये देखील सकारात्मक उर्जा कायम राहील.

गाईच्या शेणापासून मिळणारे फायदे आपल्याला नक्कीच कळाले असतील. मित्रांनो, आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की पाठवा.आणि असेच माहिती पूर्ण लेख वाचण्यासाठी जुळून राहा माझी मराठी सोबत. धन्यवाद.

मित्रांनो, माझ्याबद्दल सांगायचे झाल्यास, विशेष असं काही नाही. माझ शिक्षण बि.सी.ए. कम्प्युटर क्षेत्रांत झालं असून, मला लिहिण्याची आणि वाचण्याची आवड असल्याने मी माझा छंद जोपासण्यासाठी या क्षेत्राकडे वळलो आहे. "माझी मराठी" या वेबसाईट च्या माध्यमातून लिखाण करून मी माझा छंद जोपासत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here