मगरा विषयी संपूर्ण माहिती

Crocodile Information in Marathi

जेव्हा पृथ्वीवर जीव सृष्टी निर्माण झाली, तेव्हा बरेचशे सजीव सुद्धा जन्माला आले, सर्वात आधी पाण्यात राहणाऱ्या सजीवांचा जन्म झाला, त्यानंतर पाण्याशिवाय रहायला शिकलेल्या सजीवांनी जमिनीवर चालण्यासाठी स्वतःचा विकास केला आणि उभयचर प्राण्यांचा जन्माला सुरुवात झाली जे पाण्यात तर राहतच होते, सोबत जमिनीवर सुद्धा चालत होते,

तर आजच्या लेखात सुद्धा आपण अश्याच प्राण्याविषयी माहिती पाहणार आहोत, जो पाणी आणि जमीन दोन्हीवर राहू शकतो, त्या प्राण्याला आपण मराठीमध्ये मगर हिंदी मध्ये मगरमच्छ आणि इंग्रजी मध्ये “Crocodile” असे म्हणतो, तर चला पाहूया या अनोख्या प्राण्याबद्दल माहिती,

मगर हा एक उभयचर प्राणी असून तो खाऱ्या आणि गोड्या या दोन्ही प्रकारच्या पाण्यात राहतो, या प्राण्याला मुख्यता याच दोन प्रकारांत विभागल्या जात, हा प्राणी आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, या खंडामध्ये पाहायला मिळतो.

मगरा विषयी संपूर्ण माहिती – Crocodile Information in Marathi

Crocodile Information in Marathi
Crocodile Information in Marathi

मगराविषयी थोडक्यात माहिती – Magar Information in Marathi

हिंदी नाव : मगरमच्छ
इंग्रजी नाव: Crocodile
फॅमिली : क्रोकोडायलिडे
शास्त्रीय नाव : Crocodylidae

मगरीला दोन डोळे, चार पाय व एक लांब शेपटी असते. या प्राण्याचा जबडा मोठा असतो. हा प्राणी जिभेने आपले भक्ष्य पकडून मग खातो. मगरीचे डोके त्रिकोणी व चपटे असते. तोंडाच्या वरच्या बाजूस दोन नाकपुड्या असतात. या प्राण्याच्या तोंडात दात असतात व वरच्या बाजूस दोन मोठेदात असतात.

या प्राण्याची लांबी शेपटीपासून डोक्यापर्यंत ७ ते ८ फूट असते, या प्राण्याची त्वचा जाड असते.

रंग : मगरीचा रंग राखाडी काळपट असतो.

अन्न : मगर ही मांसाहारी आहे. पाण्यातील कीटक, मासे, किडे, छोटे-छोटे सापहे मगरीचे अन्न आहे.

निवासस्थान : मगर समुद्र, तलाव, तळे या ठिकाणी आढळते.

इतर माहिती : मगरीला आपला जबडा लवकर उघडता येत नाही. म्हणून मगर आपले भक्ष्य समोर दिसताच हळूहळू आपला जबडा उघडून ठेवते, आणि भक्षाजवळ जाऊन चटकन आपले भक्ष्य तोंडात घेते. स्वत:च्या रक्षणासाठी मगर आपल्या शेपटीचा उपयोग करते.

एखादे वेळेस मगर आपल्या जबड्यात माणसालाही पकडू शकते. मानव व इतर प्राण्यांचे पाय, हात असे अवयव मगर आपल्या जबड्यात पकडते.

मादी मगर समुद्र, तलाव, तळे यांच्या काठावरील झुडपात घरटी बांधून आपली अंडी घालते, त्यातून मगरीची पिल्ले जन्मतात. सर्वसाधारणपणे मगर तीन ते चार अंडी घालते. मगरीचे हृदय चार कप्प्यांनी बनलेले असते.

प्राण्यांचे वर्गीकरण करण्याच्या पद्धती ह्या ठरलेल्या असतात, आता आपण मगर बाहेरून दिसायला कसा आहे याविषयी माहिती पाहूया, मगराचे शरीर खूप कठीण असतं, याचं शरीर हे बुलेटप्रुफ असतं, म्हणजेच यांना बंदुकीच्या गोळीने सुद्धा काही होणार नसते, त्यांच्या शरीराचे चामडे खूप कठीण असतं, त्यांच्या शरीरावर बाकी प्राण्यांसारख्या घामाच्या ग्रंथी नसतात,

तसेच त्यांचे शरीर हे १४ ते १६ फुट लांब इतके असतं, जर मगर हा लहान असेल तर त्याची लांबी हि ७ फुटांपर्यंत असते, एखादाच मगर असतो जो २० फुटांपर्यंत सुद्धा लांब असतो, मगराचा आयुष्यकाळ हा ७०-१०० वर्षापर्यंत असतो,

जर मगर हा प्रौढ अवस्थेत असेल तर त्याचे वजन २०० ते १००० किलो पर्यंत असू शकतं. मगर हा प्राणी जमिनीवर तसेच पाण्यात सुद्धा राहतोच, पण पाण्यात असताना त्याला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या वर यावे लागते, पण आवश्यकता पडली तर तो ५-६ तास सुद्धा पाण्यामध्ये राहू शकतो,

मगर जर जंगलात राहत असेल तर त्याचा जीवनकाळ हा ३०-५० वर्षापर्यंत असतो आणि तेच जर मगर हा पाण्यामध्ये राहत असेल तर तो ७०-८० वर्ष जगतो, मगराची विशेषता एक अशी कि मगर आपले डोळे उघडे ठेवून सुद्धा झोप घेऊ शकतो.

सोबतच मगर स्वतःचे तोंड उघडे ठेवून सुद्धा झोपतो, कारण त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या घामाच्या ग्रंथी नसतात ज्याच्या माध्यमाने तो शरीरातील उष्णता बाहेर टाकू शकेल, म्हणून तो स्वतःचे तोंड उघडे ठेवून झोपतो,

आता बरेच जणांना असा प्रश्न समोर आला असेल कि तो जर तोंड उघडे ठेवून झोपत असेल तर त्याच्या शरीरात पाणी किंवा बाहेरील गोष्टी जात नसणार का? तर त्याचे उत्तर आहे, नाही कारण त्याच्या गळ्याजवळ एक वाल्व्ह असतो जो बाहेरील कोणतीही गोष्ट आतमध्ये जाण्यापासून रोखते.

मगराची आणखी विशेषतः एक म्हणजे ते कोल्ड ब्लडेड प्राण्यांमध्ये वर्गीकृत होतात त्यांच्या शरीरात चयापचय क्रिया खूप हळू होत असते, म्हणून हे प्राणी खूप दिवस उपाशी सुद्धा राहू शकतात. आता पहा ना मगर एक महिना काहीही न खाता जिवंत राहू शकतो,

मगरांचे अंड्याच्या रुपात त्यांचे प्रजनन करतात. एका वेळेला मगरीण खूप सारे अंडे देते पण त्यापैकी खूप कमी च जिवंत राहतात कारण इतर प्राणी त्या अंड्यांना खाऊन घेतात त्या साठी मगरीला त्या अंड्यांना एखाद्या ठिकाणी लपवून ठेवावे लागते, आणि जेव्हा त्या अंड्यातून आवाज येतो तेव्हा त्या अंड्यांना मगरीण बाहेर काढते, आणि नवीन मगराच्या पिल्लांचा जन्म होतो.

मगराच्या कातडीचे फायदे:

आपल्याला माहितीच आहे जनावरांच्या कातड्याचा वापर माणूस बऱ्याच ठिकाणी करायला लागला आहे, त्याच प्रमाणे मगराच्या कातड्यापासून कमरेचे बेल्ट, पर्स, जॅकेट, पिशव्या, यांची निर्मिती केल्या जाते. म्हणून मागील काही वर्षात मगरांच्या शिकारीत वाढ झालेली पाहायला मिळते.

तसेही भारतात यांच्या २ प्रजाती आणि ३ जाती आहेत, बाकी मगर हे इतर खंडात पाहायला मिळतात.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेली हि माहिती आवडली असेल आपल्याला लिहिलेली हि माहिती आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका,

सोबतच अश्याच लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top