दादा कोंडके विषयी माहिती

Dada Kondke Mahiti

मराठी चित्रपटसृष्टीत आपला सुवर्णकाळ गाजवणारे मराठी अभिनेते आणि निर्माते दादा कोंडके रसिकांच्या मनात आज देखील घर करून आहेत. विनोदी शैलीत व्दिअर्थी संवाद हे दादांचे ठळक वैशिष्टय म्हणावे लागेल. त्यांच्या भुमिकांना आणि चित्रपटांना गर्दी करणारा एक खास प्रेक्षकवर्ग त्यांना लाभला.

दादा कोंडके विषयी माहिती- Dada Kondke Information in Marathi

Dada Kondkeदादा कोंडके यांचा अल्पपरिचय – Dada Kondke History in Marathi

नाव: कृष्णा खंडेराव कोंडके
जन्म:  8 ऑगस्ट 1932
जन्मस्थळ: नायगाव मुंबई
वडिलांचे नाव:  खंडेराव कोंडके
आई:  सखुबाई खंडेराव कोंडके
कार्यक्षेत्र:  वगनाट्य, चित्रपट कलाकार, चित्रपट निर्माता
कार्यकाळ: १९६९ ते १९६८
मातृभाषा: मराठी
अभिनय: मराठी, हिंदी, गुजराती
मृत्यु: १४ मार्च १९९८ मुंबई

विनोदी व्यक्तिमत्व दादा कोंडके  – Comedy Personality Dada Kondke Biography in Marathi

 • वसंत सबनीस यांनी लिहीलेल्या ’विच्छा माझी पुरी करा’ या वगनाटयामुळे दादा कोंडके प्रसिध्दीच्या झोतात आले. पुढे भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटातुन दादांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. दादांच्या व्दिअर्थी संवादफेकीने त्यांना इतरांपासुन वेगळं आणि यशस्वी देखील बनवलं. एक खास प्रेक्षकवर्ग त्यांच्या चित्रपटांची वाट पहात राहायचा.
 • १९७१ साली प्रदर्शित झालेला सोंगाडया, १९७३ चा आंधळा मारतो डोळा, १९७५ साली आलेला पांडु हवालदार, १९७७ चा राम राम गंगाराम आणि १९७८ साली बोट लावीन तिथे गुदगुल्या हे दादा कोंडके यांचे चित्रपट विशेष गाजले.
 • सोंगाडया चित्रपट प्रदर्शित होतांनाचा एक किस्सा आहे: या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी दादा कोंडकेंनी कोहिनुर चित्रपट गृहाची आगाऊ बुकिंग करून ठेवली असतांना देखील चित्रपटगृहाच्या मालकांना देवआनंद यांच्या “तीन देवीया” ला प्रदर्शित करायचे होते, हे दादांना कळताच त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना विनंती केली. मग काय? शिवसैनिकांनी कोहिनुर चित्रपटगृहासमोर निदर्शनं केली. त्यामुळे तेथे दादांचा ‘सोंगाडया’ प्रदर्शित झाला आणि तुफान यशस्वी देखील झाला.
 • बाळासाहेब ठाकरेंच्या उपकाराची जाण ठेवत पुढे दादा बाळासाहेबांच्या अनेक सभांना उपस्थित राहुन भाषणे देत असत.
 • दादांवर लोकांचे जिवापाड प्रेम असल्यामुळे त्या सभांना प्रचंड गर्दी देखील होत असे.
 • हिंदी चित्रपट सृष्टी कायम दादा कोंडकेंच्या सिनेमाला बोटे मोडत असत (कारण दादांचा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हिंदी चित्रपटांवर होत असे).
 • दादांच्या आलेल्या सलग ९ चित्रपटांनी रौप्यमोहात्सवी आठवडे साजरे केले होते आणि याची नोंद आजही ’गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’ कायम आहे.
 • दादा सामान्य माणसाला पडद्यावर उत्तम रितीने प्रदर्शित करायचे आणि म्हणुनच पोटाला चिमटा काढुन त्यांचे सिनेम पहाणारा वर्ग देखील सामान्य आणि अतिसामान्य परिस्थीतीतला होता.
 • मराठी चित्रपटाला अत्युच्च उंचीवर नेण्यात दादा कोंडके यांचा फार मोठा वाटा आहे.
 • मराठी कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे आणि हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा हे दादांच्या अभिनयानेच प्रेरीत होऊन त्यांच्यासारखी नक्कल करण्याचा बरेचदा प्रयत्न करत असत.
 • उषा चव्हाण या अभिनेत्रीने दादांसोबत जास्तीत जास्त चित्रपट केले.
 • १९९४ साली प्रदर्शित झालेला ’सासरचं धोतर’ हा दादांचा त्यांनीच निर्मीती केलेला अखेरचा सिनेमा होता.

दादा कोंडके यांचे गाजलेले चित्रपट – Dada Kondke Movies

राम राम गंगाराम, आगे की सोच, अंधेरी रात में दिया तेरे हाथ में, पळवा पळवी, पांडु हवालदार, आली अंगावर, मुका घ्या मुका, एकटा जीव सदाशिव, येऊ का घरात? , सासरचे धोतर, तुमचं आमचं जमलं, तेरे मेरे बीच में, खोल दे मेरी जुबान, गनिमी कावा, तांबडी माती, सोंगाडया, आंधळा मारतो डोळा, बोट लावीन तिथे गुदगुल्या.

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? आणि मी म्हणतो की बरंच काही. . . उभं आयुष्य नाव कमावण्याकरता खर्ची घालणाऱ्यांची संख्या विपुल आहे. आता माझंच बघा ना. . . मी समीर शिरवळकर गेल्या चौदा वर्षांपासून अकोला आकाशवाणीत उद्घोषक म्हणून कार्य करीत असताना लिखाणाची आवड आपल्या 'माझी मराठी' च्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जागर फाउंडेशन या संस्थेचा सक्रिय सदस्य असून फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. उत्तम, माहितीपूर्ण लेख तुमच्या पर्यंत आपल्या माझी मराठीतून पोहोचविण्याचा प्रयत्न यापुढे देखील असाच करत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here