फोर्ब्स च्या आंतरराष्ट्रीय मॅगझिन मध्ये महाराष्ट्राच्या या शेतकऱ्याचे नाव, काय केले पहा

Maharashtra rice farmers in Forbes’ list

फोर्ब्स मॅगझिन हि अमेरिकेची एक मिडिया कंपनी आहे, जी आठवड्यातून दोन वेळा स्वतःची एक मॅगझिन पब्लिश करते. या मॅगझिन मध्ये फायनान्स, टेक्नोलॉजी, सायन्स, इत्यादी बऱ्याच विषयावर लेख लिहिलेले असतात, आणि जगातील नामांकित कंपन्यांमधील फोर्ब्स हि एक कंपनी आहे.

हि तीच कंपनी आहे, जी दरवर्षी जगातील श्रीमंत व्यक्तींची यादी जगासमोर ठेवते, आपण सुद्धा फोर्ब्स विषयी बऱ्यापैकी वाचले असणारच. तर आजच्या लेखात आपण फोर्ब्स मॅगझिन विषयी नाही तर महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्याविषयी माहिती पाहणार आहोत,

ज्यांचे नाव आणि कार्याचे गुणगान फोर्ब्सने आपल्या मॅगझिन मध्ये केले होते. आपल्याला माहिती असेलच कि एखाद्या साप्ताहिकात आपले नाव येण्यासाठी काही तरी महान कार्य करावे लागते. तर फोर्ब्स सारख्या आंतरराष्ट्रीय मॅगझिन मध्ये नाव आले असणार तर त्यांनी जगाला काही तरी मोठे योगदान दिले असणारच. तर चला पाहूया या व्यक्तीविषयी थोडक्यात माहिती,

फोर्ब्स च्या आंतरराष्ट्रीय मॅगझिन मध्ये महाराष्ट्राच्या या शेतकऱ्याचे नाव, काय केले पहा – Dadaji Ramaji Khobragade Maharashtra rice farmers in Forbes’ list

Dadaji Khobragade
Dadaji Khobragade

नांदेड जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातील हि एक व्यक्ती आहे जी २०१० ला फोर्ब्स च्या मॅगझिन मध्ये झळकली होती, त्या व्यक्तीचे नाव आहे, “कृषिभूषण” दादाजी खोब्रागडे.

दादाजी खोब्रागडे हे एक अल्पभूधारक शेतकरी होते, ज्यांच्या येथे फक्त १.५ एकर शेती होती, घरचे गरीब अठराविश्व दारिद्र्याची परिस्थिती असून सुद्धा न डगमगता आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर वाणनिर्मितीत आपले मोलाचे योगदान दिले.

गरीब परिस्थिती पासून तर फोर्ब्स सारख्या आंतरराष्ट्रीय मॅगझिन मध्ये नाव येण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खूप खडतर राहिला, परिस्थिती माणसाला जगायला शिकवते त्याच प्रमाणे दादाजी यांनी सुद्धा मेहनतीवर जास्त भर दिला.

दादाजी खोब्रागडे यांच्या कडे एकूण १.५ एकर शेत होते, सन १९७१ मध्ये जेव्हा त्यांनी आपल्या शेतातील धानाची एक लोंब पहिली असता त्यांना विचार आला कि अश्याच प्रकारच्या धानाची वान आणखी तयार केली जाऊ शकते. शेतात पटेल-३ या नावाचे धान लावले होते, या वानामध्ये त्यांना बारीक दाणे असलेल्या काही लोंब्या आढळल्या.

याच दाण्यांच्या माध्यमातून त्यांना एक नवीन वाणाची कल्पना सुचली आणि तेथेच एका नवीन वाणाचा जन्म झाला, त्या वाणाला त्यांनी प्रचलित असलेल्या घड्याळाचे नाव दिले, ते होते एचएमएटी (HMAT). या १० वर्षाच्या मेहनतीनंतर वाणाला दादाजींनी जेव्हा आपल्या शेतात पिकवायला सांगितले कि या वाणापासून आपल्याला भरपूर उत्पन्न होईल पण तेव्हा कोणीही त्यांचे ऐकले नाही.

पण त्यांच्यात गावामध्ये राहत असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या चार एकर शेतात या वाणाचे धान टाकले तेव्हा पहिल्याच वर्षी त्या व्यक्तीला ९० क्विंटलचे उत्पन्न झाले. हे पाहून दादाजींनी विकसित केलेल्या धानाची कीर्ती विदर्भात चहूकडे पसरली,

या नवीन वाणाला तपासण्यासाठी अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाने आपल्या तज्ञांच्या सहय्य्याने हे वाण तपासले, आणि या वाणाला पिकेव्ही एचएमएटी (HMAT) या नावाने मार्केट मध्ये आणले. या गोष्टी साठी दादाजी खोब्रागडे यांचा विद्यापीठाशी संघर्ष चालला व या संघर्षात ते जिंकले.

आता हे वाण संपूर्ण महाराष्ट्रभर लोक वापरू लागले होते, पण तेव्हा या संशोधना कडे कोणत्याही कृषी विद्यापीठाने लक्ष न दिल्याची खंत व्यक्त झाली होती. दादाजींनी एकूण ९ नवीन वाणांचे संशोधन केले होते ते नऊ वाण खालील प्रमाणे आहेत.

तांदळाचे एकूण नऊ वाण –

  1. एचएमटी
  2. काटे एचएमटी
  3. नांदेड हिरा नं. १
  4. नांदेड-९२
  5. जय श्रीराम
  6. विजय नांदेड
  7. दीपकरत्न नांदेड
  8. डीआरके (दादाजी रामाजी खोब्रागडे)
  9. नांदेड चेन्नूर.

दादाजी यांना मिळालेले पुरस्कार – Dadaji Ramaji Khobragade Award

दादाजी यांनी कोणत्याही कॉलेजात शिक्षण घेतलेले नव्हते ते फक्त प्राथमिक शाळेत इयत्ता ३ री पर्यंत शिकलेले होते. परंतु तरीही त्यांनी अशी कामगिरी केली कि त्यांच्या नावावर आज १२ राष्ट्रीय पुरस्कार आणि काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत, दादाजी हे त्या लोकांसाठी एक प्रेरणा स्थान आहेत जे स्वतःला कमी शिकलेले समजतात.

त्यावेळेसचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना एचएमटी हे तांदळाचे नवीन वाण विकसित केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र व ५० हजार रुपयांची मदत देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता. सोबतच राज्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्या हातून सुद्धा त्यांचा गौरव करण्यात आला होता.

राज्य सरकार कडून त्यांना उत्कृष्ट शेतकरी म्हणून गौरव मिळाला होता. त्यांच्या कामाची दखल घेत फोर्ब्स ने २०१० मध्ये त्यांना मॅगझिन मध्ये दर्शविले. दादाजी हे तेव्हाचे प्रथम भारतीय शेतकरी होते ज्यांचे नाव फोर्ब्स च्या मॅगझिन मध्ये आले होते.

त्यांच्या कामगिरीला पाहून महाराष्ट्र सरकार ने तेव्हाच्या सातवीच्या पुस्तकात “थोरांची ओळख” या नावाने एक धडा दिला होता ज्यामध्ये त्यांनी संशोधन कश्या प्रकारे केले हे लिहिलेले होते.

दादाजी खोब्रागडे यांचे निधन – Dadaji Khobragade Death

नऊ तांदळाच्या जातींच्या संशोधनासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे दादाजी रामाजी खोब्रागडे यांचा ३ जून २०१८ रोजी पक्षाघाताने मृत्यू झाला, आणि ते अनंतात विलीन झाले. त्यांनी केलेलं कार्य हे जग नेहमी आठवण ठेवेल.

या लेखावरून आपल्याला एक गोष्ट तर शिकायला मिळालीच असेल कि माणसाला जीवनात मोठे होण्यासाठी खूप जास्त गोष्टींची आवश्यकता नाही आहे, फक्त आपल्या मध्ये एखाद्या कामाला करण्याची जिद्द आणि प्रबळ इच्छा असणे आवश्यक आहे.

आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असेल आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top