दत्तजयंती विशेष माहिती

Datta Jayanti Information in Marathi

मार्गशीष या मराठी महिन्यात व डिसेंबर या इंग्रजी महिन्यात प्रभु दत्तात्रयांची जयंती अर्थात ‘दत्तजयंती’ साजरी होते. प्रभु दत्तात्रयामधे परमेश्वर आणि गुरू ही दोन्ही रूपं समाविष्ट असल्याने त्यांना ‘परब्रम्हमुर्ती सद्गुरू’ आणि ‘श्रीगुरूदेवदत्त’ म्हंटल्या जातं. गुरूवंशातील ते आद्यगुरू असुन त्यांना साधक, योगी आणि वैज्ञानिक देखील मानतात.

हिंदु धर्मातील ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या विलीनीकरणा वेळी दत्तात्रय प्रभुंनी अवतार घेतला म्हणुन त्यांना त्रिदेव सुध्दा म्हणतात… प्रभु दत्तात्रयांना शैवपंथी शिवाचा अवतार व वैष्णवपंथी विष्णुचा अंशावतार मानतात.

दत्तात्रेयांना नाथ संप्रदायातील नवनाथ पंथाचे अग्रणी देखील समजल्या जाते. रसेश्वर संप्रदायाचे प्रवर्तक दत्तात्रयांना मानतात. त्यांनी वेद आणि तंत्र या दोन भिन्न मार्गांना विलीन करून एकाच दत्त संप्रदायाची निर्मीती केली होती.

महायोगीश्वर भगवान दत्तात्रेय विष्णु अवतार आहेत. या अवताराचा उदय मार्गशिर्ष पौर्णिमेला सायंकाळी झाला.

पुत्रप्राप्तीच्या ईच्छेने अत्रीऋषींनी व्रत केले असता भगवान विष्णु प्रसन्न झाले आणि ‘दत्तो मयाहमिति यद् भगवान् स दत्तः’(मी स्वतःला तुम्हाला दिले आहे) अश्या रितीने वचन दिल्याने भगवान विष्णु पुत्ररूपात अत्रिऋषींना प्राप्त झाले आणि दत्त म्हणुन ओळखले गेले. अत्रिपुत्र असल्याने त्यांना ‘अत्रेय’ देखील म्हंटले गेले.

दत्तजयंती विशेष माहिती मराठीमध्ये – Datta Jayanti Information in Marathi

Datta Jayanti Information in Marathi
Datta Jayanti Information in Marathi

पौराणिक कथा – Datta Jayanti Story in Marathi

ब्रम्हा विष्णू आणि महेश यांच्या पत्नींना (देवी सावित्री, देवी लक्ष्मी, देवी पार्वती) आपापल्या पतिधर्मावर अत्यंत गर्व होता आणि त्या सतत त्याचे गुणगान देखील गात असत.

एकदा नारदमुनी तिनही लोकांत भ्रमण करीत करीत त्यांच्याजवळ येतात. त्यासमयी त्या तिन्ही देवींचे आपापले पतिधर्माचे गुणगान सुरू असते. तेव्हां नारदमुनी त्यांना अत्रीऋषींच्या पत्नी ‘अनुसुये’ बद्दल अवगत करतात. अनुसुया त्या तिघींपेक्षा देखील उत्तम रितीने पतिधर्म पाळते आहे हे नारदमुनींच्या तोंडुन ऐकुन त्यांचा जळफळाट होतो आणि तिचा पतिधर्माचा भंग करण्याकरीता त्या तिनही देवी आपापल्या पतीला आग्रह करतात.

स्त्रीहट्टापुढे ब्रम्हा विष्णु आणि महेश या तिनही देवांचा नाईलाज होतो आणि ते तिघेही भिक्षेकारांच्या रूपात अ़त्रीऋषींच्या आश्रमासमोर जाऊन उभे राहातात.

‘ओम् भवती भिक्षांदेही’ असा आवाज ऐकुन अनुसुया माता आश्रमाबाहेर येते आणि त्या तिनही भिक्षेकारांना भिक्षा देऊ लागते त्यावेळी ते तिघे म्हणतात ‘आम्हाला भिक्षा नको आम्हाला भोजन हवे आहे ‘अनुसुया त्यांना आश्रमात बोलवते आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागते.

स्वयंपाक होताच ती ज्यावेळी त्यांच्याकरता ताट वाढु लागते त्यावेळी ते तिघे म्हणतात आम्हाला भोजन नको ‘‘जोपर्यंत तु नग्न होऊन आम्हाला वाढणार नाही तोपर्यंत आम्ही जेवणार नाही’’.

अत्रीऋषींची पत्नी अनुसुया ही साधारण स्त्री नव्हती ती एक पवित्र पतिव्रता होती. ही साधारण माणसं नसुन आपली परिक्षा घेण्याकरता आली असल्याचे तिने जाणले आणि त्यांच्या ईच्छेचा आदर ठेवत आपल्या पतिचे स्मरण करून त्या तिघांवरही पाणी शिंपडले त्याक्षणी ती तिघेही बाळे झालीत आणि रांगु लागली. अनुसुयेने त्या तिघाही बालकांना आपले दुध पाजले.

बाहेरून आल्यानंतर अत्रीऋषींना झालेला प्रकार लक्षात आला.

बरेच दिवस झाले परंतु आपले पति घरी आले नाहीत या चिंतेने त्या तिनही देवींना आपली चुक लक्षात आली त्यांनी अनुसुया मातेला क्षमा मागीतली त्यावेळी अनुसुया माता म्हणाली ‘या तिघांना मी माझे दुध पाजले आहे. ही तिघेही माझी बालके झाली आहेत त्यामुळे यांना माझ्याजवळच राहावे लागेल त्यावेळी तीनही भगवान आपल्या प्रत्यक्ष रूपात अवतरीत झाले आणि आपापल्यातुन एक अंश काढुन एक नवा अवतार तयार केला. त्रिमुर्ती प्रभु दत्तात्रेय उदयास आले…..

दत्तजन्म सोहळा – Datta Jayanti

दत्तजयंती पुर्वी अनेक ठिकाणी मंदीरांमधे आणि कित्येक घरांमधे देखील श्री गुरूचरित्राचे पारायण केले जाते ते अतिशय पुण्यचरित्र समजुन अतिशय काटेकोरपणे आणि कडक नियम आचरून त्याचे पठण केले जाते. दत्तजन्माच्या दिवशी काही ठिकाणी दुपारी बारावाजता आणि बर्याच ठिकाणी सायंकाळी सहा वाजता दत्तजन्म केला जातो. मंदिरामधे भजन किर्तन देखील होते.

दुसर्या दिवशी पारणे केले जाते. महाप्रसाद वितरीत केला जातो. लांबुन आलेल्या भक्तांसाठी अन्नदानाचे आणि प्रसादाचे वितरण करण्यात येते. मंदिरांवर रोषणाई करण्यात येते. उत्साहात आणि पवित्र वातावरणात प्रभु दत्तात्रयांची पालखी काढण्यात येते.

तीन मुख, सहा हात, दोन पाय आजुबाजुला चार वेदाचे स्वरून दाखविणारे चार श्वान पाठीमागे उभी असलेली कामधेनु (गाय) अश्या रूपाचे कितीतरी ठिकाणी पुजन करण्यात येते.

‘‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’’ असा नामजप करण्यात येतो…

महाराष्ट्रात नृसिंहवाडी (कोल्हापुर), कारंजा (वाशिम). माहुर (नांदेड), गाणगापुर, औदुंबर, अश्या अनेक ठिकाणी दत्तजयंती च्या काळात मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी पहावयास मिळते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top