Wednesday, August 27, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

गोल्फ खेळाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती

Golf Information in Marathi

जगात अनेक खेळ खेळले जातात. फुटबॉल असो किंवा हॉकी, हे सर्व खेळ जिंकण्याचा हेतूनेच खेळले जातात. परंतु असाही एक खेळ आहे कि जो जिंकणे आणि हरणे यांच्या पलीकडे जाऊन केवळ मनोरंजन आणि विश्रांतीच्या हेतूने खेळला जातो.

होय मित्रांनो, त्या खेळाचे नाव आहे गोल्फ. तुम्ही बहुतेक सिनेमांत बघितले सुद्धा असेल, उच्चभ्रू लोक छान हिरव्यागार गवतावर हा खेळ खेळतात. चला तर मग आपण या विशिष्ट खेळाबद्दल माहिती बघुयात.

गोल्फ खेळाचा संपूर्ण इतिहास आणि माहिती – Golf Information in Marathi

Golf Information in Marathi
Golf Information in Marathi

गोल्फचा इतिहास – Golf Game History

खेळाची सुरुवात नेमकी कुठल्या देशात झाली या बद्दल संभ्रमाची स्थिती आहे. परंतु इतिहासकारांच्या नुसार, गोल्फची सुरुवात स्कॉटलँँड आणि नेदरलँँड येथे १५ व्या शतकात झाली असावी असे सांगण्यात येते.

गोल्फचे नियम – Golf Rules

यामध्ये क्लब (धातूची काठी) च्या सहायाने बॉलला फटका मारत मारत मैदानावरील खडग्यामध्ये ढकलावे लागते. असे करत असताना खेळाडू किती वेळा क्लबने बॉल ला मारतो याची नोंद पंचांकडून ठेवली जाते. जो खेळाडू कमीत कमी फटके मारून बॉल ला खडग्यामध्ये ढकलतो तो विजयी होतो.

गोल्फसाठी लागणारे साहित्य – Golf Equipment

जसे खेळाचे नियम अगदी सोपे आणि सुटसुटीत आहेत त्याच प्रमाणे खेळासाठी लागणारे साहित्य देखील कमी आणि सहज उपलब्ध होणारे आहे. गोल्फ साठी आपल्याला एक धातूची काठी (क्लब), चेंडू (बॉल) आणि मोकळे मैदान बस एवढ्याच गोष्टींची गरज असते.

क्लबचे वेगवेगळे प्रकार असतात जसे कि, वूड्स, वेज्ड, पुटर्स, आयरन इ. ज्या ठिकाणावरून बॉल मारला जातो त्याला “टी” असे म्हणतात. “टी” म्हणजे एक लहान लाकडी आधार, ज्यावर बॉल ठेवला जातो आणि क्लबने मारला जातो.

गोल्फचे मैदान – Golf Course or Golf Ground

गोल्फच्या मैदानाला “गोल्फ कोर्स” म्हणतात. गोल्फ कोर्सचा विशिष्ट असा आकार आणि आकारमान नसते. या कोर्सवर ९ किंवा १८ लहान खडगे असतात. ज्या ठिकाणावरून बॉलला फटका मारला जातो, त्या ठिकाणाला टी असे म्हणतात.

खेळाडूंची संख्या खेळाडू – Number of Players

हा खेळ सांघिक नसून वैयक्तिक आहे. एका वेळेला केवळ एकच खेळाडू खेळतो. त्याची खेळी पूर्ण झाल्यानंतर पुढील खेळाडू मैदानात येतो.

भारतीय गोल्फ खेळाडू – Indian Golf Players

गोल्फ हा खेळ भारतात सुद्धा खेळला जातो. भारतातील काही नामवंत गोल्फ खेळाडू खालीलप्रमाणे :

  1. शुभंकर शर्मा
  2. अनिर्बन लहिरी
  3. जीव मिल्खा सिंह
  4. अर्जुन अटवाल
  5. ज्योती रंधावा इ.

गोल्फ जागतिक स्पर्धा – World Famous Golf Competition

जरी हा खेळ मनोरंजन आणि आरामासाठी खेळला जातो, तरी जगभरात याच्या काही महत्वाच्या स्पर्धा होतात. ज्यांमध्ये :

  1. दि मास्टर्स टूरनामेंट (The Masters Tournament)
  2. दि रायडर कप (The Ryder Cup)
  3. दि यु.एस. ओपन (The US Open)
  4. दि पी.जी.ए. चांपीयनशिप (The GPA Championship)
  5. दि ओपन किंवा ब्रिटीश ओपन चांपीयनशिप (The Open (British Open Championship)) इ. चा समावेश होतो.

गोल्फ खेळा बद्दल काही महत्वाचे प्रश्न – Questions about Golf

१. गोल्फ खेळाची सुरुवात कुठल्या देशात झाली ?

उत्तर: खेळाची सुरुवात कुठे झाली हे ठोसपणे माहित नसले तरी सर्वात आधी गोल्फ स्कॉटलंडमध्ये खेळल्या गेल्याचे समजते.

२. गोल्फ हा खेळ ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट आहे का ?

उत्तर: हा खेळ काही वर्षी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये समाविष्ट झालेला आहे.

३. गोल्फ मधील काठीला काऊ म्हणतात ?

उत्तर: क्लब.

४. ज्या ठिकाणावरून गोल्फचा बॉल मारला जातो त्या ठिकाणाला काय म्हणतात ?

उत्तर: टी.

Editorial team

Editorial team

Related Posts

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?
Information

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो?

पावसाळा आपल्याला घराच्या देखभालीबद्दल काय शिकवतो? पावसाळा जरी हिरवाई, थंडावा आणि ताजेपणा घेऊन येतो तरी त्याचे काही तोटेही आहेत. गळकी...

by Editorial team
August 26, 2025
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved