भारतीय क्रिकेट खेळाडू हार्दिक पंड्या बद्दल संपूर्ण माहिती

Hardik Pandya Information Marathi

भारतीय क्रिकेट संघ म्हटलं कि आपल्याला सुरुवातीला आठवणारी काही नावं म्हणजे कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर इ. हि सर्व मंडळी जरी आता क्रिकेट खेळत नसली तरी त्यांनी जे विक्रम केलेत, ते प्रत्येकाच्या नक्कीच लक्षात आहेत. परंतु हल्ली ज्या एका खेळाडूने संपूर्ण क्रिकेट जगायचं लक्ष वेधलं आहे, तो म्हणजे हार्दिक पंड्या.

हार्दिक म्हणजे संघाची आण, बाण आणि शान आहे. धुवांधार फलंदाजी म्हणू नका कि उत्कृष्ट गोलंदाजी, हार्दिक सर्वच गोष्टींत अगदी निष्णात आहे. तो मैदानावर येताच प्रेक्षकांत उत्साहाचं वातावरण आपोआपच निर्माण होतं. चला तर मग बघुयात हार्दिक पंड्याच्या या यशामागचं कारण:

भारतीय क्रिकेट खेळाडू हार्दिक पंड्या बद्दल संपूर्ण माहिती- Hardik Pandya Information Marathi

Hardik Pandya Information Marathi
Hardik Pandya Information Marathi

हार्दिक पंड्याचा जन्म आणि बालपण : Hardik Pandya Biography in Marathi

हार्दिकचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ साली चोर्यासी, सुरत (गुजरात) येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव हिमांशु पंड्या तर भावाचे नाव कृणाल पंड्या असून कृणाल देखील एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पंड्या कुटुंब वडोदरा या ठिकाणी स्थलांतरित झाले. क्रिकेटची अत्यंत आवड असल्याने हार्दिकने आपल्या शिक्षणाला प्राधान्य न देता क्रिकेटला निवडले. तुम्हाला कदाचित ऐकून नवल वाटेल, हार्दिकचे शिक्षण ९ व्या वर्गापर्यंतच झालेले आहे.

हार्दिक पांड्याची कारकीर्द – Hardik Pandya Cricket Career

वडोदरा स्थित किरण मोरे क्रिकेट अकॅडमी मधून क्रिकेटचे धडे घेत असताना, ‘सय्यद मुश्ताक अली चषका’चा सामना हार्दिकने गाजवला. २०१३ साली या चषकामधे त्याने ‘बरोडा क्रिकेट संघाला’ दणदणीत विजय मिळवून दिला. आणि येथूनच खरतर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली.

हार्दिकने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला २०१६ सालापासून सुरुवात केली. २६ जानेवारी २०१६ रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या टी-२० सामन्यात तो झळकला. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१६ रोजी त्याने पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना साली न्यूझीलँड संघाविरुद्ध खेळाला.

इतकेच नव्हे तर इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच (IPL) मध्ये खेळतांना आपल्याला एक वेगळाच हार्दिक अनुभवायला मिळतो. त्याची खेळी सुरु झाली म्हणजे षटकार आणि चौकारांची जणू आतिषबाजीच सुरु होते. एवढंच काय तर गोलंदाजी मध्ये सुद्धा तो मागे नाही. एकंदरीत काय तर हार्दिक पंड्याच्या रूपाने भारतीय संघाला एक उत्कृष्ट आणि निपुण अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे.

हार्दिक पंड्याबद्दल काही तथ्य : Facts about Hardik Pandya

  • टोपण नाव : हॅरी, कुं-फु पंड्या (Hardik Pandya Nickname)
  • उंची : ६ फूट (१८३ सेमी) (Hardik Pandya Height)
  • वय : २७ वर्ष (२०२१ साली) (Hardik Pandya Age)
  • शिक्षण : ९ वा वर्ग
  • IPL संघ : मुंबई इंडियन्स
  • पत्नी : नताशा स्टॅंकोव्हिक (Hardik Pandya Wife)
  • मुलगी : अगस्त्या (Hardik Pandya Daughter)
  • एकूण संपत्ती : सुमारे ३७ कोटी रुपये (इंटरनेटवरील उपलब्ध माहितीनुसार) (Hardik Pandya Net Worth)
  • भाऊ : कृणाल पंड्या (Hardik Pandya Brother Name)

तर मित्रांनो हि होती भारतीय अष्टपैलू क्रिकेट खेळाडू हार्दिक पंड्याबद्दल महत्वाची माहिती. आशा करतो कि, हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल.

भारतीय क्रिकेट खेळाडू हार्दिक पंड्याबद्दल काही महत्वाचे प्रश्न : Quiz on Hardik Pandya

१. हार्दिक पंड्याचा जन्म कधी आणि कुठे झाला?

उत्तर: ११ ऑक्टोबर, १९९३ साली गुजरात मधील सुरत येथील चौरासिया या ठिकाणी.

२. हार्दिकच्या पत्नीचे नाव काय आहे?

उत्तर: नताशा स्टॅंकोव्हिक.

३. हार्दिकच्या मुलीचे नाव काय आहे?

उत्तर: अगस्त्या पंड्या.

४. हार्दिक पांड्याची उंची किती आहे?

उत्तर: ६ फूट (१८३ सेमी.).

५. हार्दिक पंड्या कुठल्या IPL संघाकरिता खेळतो?

उत्तर: मुंबई इंडियन्स.

६. हार्दिकची एकूण संपत्ती किती आहे?

उत्तर: सुमारे ३७ कोटी रुपये (इंटरनेट वरील उपलब्ध माहितीनुसार).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here