हॉर्स रेसिंग (घोड्यांची शर्यत) खेळाबद्दल संपूर्ण माहिती

Horse Racing Information in Marathi

घोडा आणि मनुष्य हे समीकरण फार पूर्वीपासून चालत आलेले आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आवडीचा “कृष्णा” तसेच महाराणा प्रताप यांचा घोडा “चेतक” सर्वज्ञात आहे. युद्धकाळी उपयोगात येणाऱ्या या घोड्यांचा उपयोग कालांतराने शर्यतींसाठी होऊ लागला. आधुनिक काळातही घोड्यांवर बसून पोलो, हॉर्स हॉकी इ. खेळ सुद्धा खेळले जातात.

पाश्चिमात्य देशांत हॉर्स रेसिंग (Horse Racing) खूपच प्रसिद्ध आहेत. फक्त जिंकणे आणि हारणे यावर न थांबता या खेळाने व्यवसायाचे स्वरूप धारण केले आहे. शर्यतीमधील घोड्यांची कामगिरी पाहून त्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ण केले जातात. ज्यामुळे घोड्यांच्या वेगवेगळ्या जातींचे संशोधन होऊ लागले. चला तर मग बघुयात या खेळाबद्दल मनोरंजक माहिती.

हॉर्स रेसिंग (घोड्यांची शर्यत) खेळाबद्दल संपूर्ण माहिती – Horse Racing Information in Marathi

Horse Racing Information in Marathi
Horse Racing Information in Marathi

हॉर्स रेसिंगचा इतिहास – Horse Racing History

या खेळाची सुरुवात नेमकी कधी झाली हे जरी माहित नसले तरी, हा खेळ अतिप्राचीन काळापासून खेळला जातो. या शर्यतींच्या आड सट्टा आणि जुगार खेळला जातो अशा संशयावरून काही देशांमध्ये हा खेळ अवैध घोषित केल्या गेलेला आहे.

हॉर्स रेसिंगचे नियम – Horse Racing Game Rules

शर्यतीची सुरुवात झेंडा फडकावून केली जाते. शर्यत सुरु झाली कि सर्व घोडेस्वार आपल्या घोड्याला पूर्ण ताकदीनिशी पळवतात. घोड्यांना पळवताना शर्यतीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी सर्वांना घ्यावी लागते.

सुरुवात होण्या अगोदरच कुठला घोडा प्रारंभ रेषेच्या समोर आला तर त्याला चुकीची सुरुवात (False Start) घोषित केले जाते.

हॉर्स रेसिंगचे मैदान – Horse Racing Track

घोड्यांच्या शर्यतीच्या मैदानाला रेस कोर्स म्हणतात. तसेच ज्या धावपट्टीवरून घोडे धावतात तिला रेस ट्रॅक म्हणतात. हा ट्रॅक सरळ किंवा अंडाकृती असतो. वेगवेगळ्या शर्यतींनुसार रेस ट्रॅकची लांबी बदलत राहते.

हॉर्स रेसिंगचे प्रकार – Types of Horse Racing

  1. फ्लॅट रेसिंग (Flat Racing) : जगातील सर्वात जास्त प्रसिद्ध शर्यत असून यामधील रेस ट्रॅक सपाट आणि अंडाकृती असतो.
  2. जम्प रेसिंग (Jump Racing) : यात रेस ट्रॅक वर काही विशिष्ट अंतरावर अडथळे असतात ज्यावरून घोड्यांना उडी मारून समोर धावावे लागते.
  3. एंडूरान्स रेसिंग (Endurance Racing) : ही लांब पल्ल्याची शर्यत असून लांबी काही शेकडो मैलांची असू शकते. खेळाडूंना शर्यत पूर्ण करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो.
  4. हार्नेस रेसिंग (Harness Racing) : या प्रकारामध्ये घोड्याला मागून एक हलक्या वजनाची गाडी दिलेली असते. याचा गाडीत बसून घोडेस्वार घोड्याला हाताळत असतो.

हॉर्स रेसिंगसाठी लागणारे साहित्य : Horse Racing Equipment

यासाठी सर्वात महत्वाचे साहित्य म्हणजे घोडा. घोड्यांच्या शर्यतीमधील घोडेस्वाराला जॉकी म्हटले जाते. जॉकीच्या हातातील चाबुकाच्या सहायाने तो घोड्याला जोरात पळवण्याचा प्रयत्न करत असतो.

घोड्यांच्या जाती – Breeds of Horses

Breeds of Horses
Breeds of Horses

वेगवेगळ्या शर्यतींसाठी वेगवेगळ्या जातीच्या घोड्यांचा उपयोग केला जातो. यामध्ये स्टँडरब्रेड, अरेबियन, क्वार्टर हॉर्स इ.

जगातील काही महत्वाच्या आणि प्रसिद्ध शर्यती – Most Famous Horse Race in the World

  1. केंटुकी डेर्बी (यु.एस.ए.)
  2. दुबई वर्ल्ड कप (दुबई)
  3. शिमा क्लासिक (दुबई)
  4. दि एवरेस्ट (ऑस्ट्रेलिया)
  5. जपान कप (जपान)

हॉर्स रेसिंग गेम बद्दल काही महत्वाचे प्रश्न – Horse Race Quiz Questions

१. घोड्यांची शर्यत हा खेळ ऑलिम्पिक मध्ये समाविष्ट आहे का?

उत्तर: नाही.

२. हॉर्स रेसिंग मधील घोडेस्वाराला काय म्हणतात?

उत्तर: जॉकी.

३. भारतामध्ये घोड्यांची शर्यत वैध आहे कि अवैध?

उत्तर: भारतामध्ये या बद्दल मतभेद पाहायला मिळतात.

४. घोड्यांचा उपयोग कुठल्या खेळांत केला जातो?

उत्तर: पोलो, हॉर्स हॉकी इ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here