एकतेचा प्रतिक भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती

Rashtradhwaj Tiranga Mahiti

प्रत्येक स्वतंत्र देशाचा एक आपला ध्वज आहे. हा ध्वज त्या देशाची ओळख मानल्या जाते. ब्रिटिशांपासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने आपला तिरंगा ध्वज सर्वमान्य केला. 22 जुलै 1947 रोजीच निर्वाचित संसद सदस्यांनी तिरंगा भारताचा ध्वज म्हणून मान्य केला होता.

सर्व देशांसाठी आपला राष्ट्रध्वज फार सन्माननिय मानला जातो.

देशाचा प्रत्येक नागरिक याच्या सन्मानासाठी झटतो. असंख्य सैनिक आपल्या प्राणाची आहूती देतात. आपला राष्ट्रध्वज हा विविधतेत एकतेचा प्रतिक मानला जातो.

एकतेचा प्रतिक भारतीय ध्वज – Indian Flag Information in Marathi

Indian Flag Information in Marathi

भारतिय राष्ट्रध्वजाची माहिती – Tiranga Colour Meaning in Marathi

भारतिय ध्वज आयाताकृती असून यात तीन मोठया पट्टया आहेत.

सर्वात वर केशरी मध्य भागात पांढरा, सर्वात खाली हिरव्या रंगाची अशा तीन समान आकाराच्या पट्टया आहेत.

ध्वजाची लांबी आणि रूंदीचे गुणोत्तर 3ः2 इतके आहे. पांढ-या म्हणजेच मधल्या पट्टीत अशोक चक्र आहे.ज्याचा रंग निळा असून त्यात 24 धारा आहेत. आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आपल्यासाठी एक महान प्रतिक आहे.तिरंगा भारतातील विविध भाषीक, धार्मिक जातीयतेत एकतेचा प्रतिक मानला जातो.  तिरंग्यातील तीन रंगाचा व अशोकचक्राचा अर्थ हा वेगवेगळा आहे.

 1. केशरी रंग – तिरंग्यातील सर्वात वरील पट्टा केशरी रंगाचा आहे.
 2. केशरी रंग निस्वार्थ सेवा साहस शौर्य आणि अचाट देशभक्तीचे प्रतिक मानले जाते.
 3. केशरी रंगाचा प्रभाव राजनैतिक वैभवातूनही दर्शवला जातो.
 4. त्यामुळे समृध्द लोकशाहीचे प्रतिक मानल्या जाते.
 5. पांढरा रंग – पांढरा रंग तिरंग्यात मध्यभागी असून हे देशाच्या शुध्दतेचे, शांतीचे आणि मानवतेचे प्रतिक मानल्या जाते.
 6. हया रंगातून देशातील स्वच्छता व ज्ञानाची ओळख आहे.
 7. पांढरा रंग सत्यता आणि पवित्रतेचे प्रतिक मानल्या जाते.
 8. विकासाचा मार्ग या माध्यमातून उद्घोषीत होतो.
 9.  हिरवा रंग – हिरवा रंग देशाच्या कृषी आणि धवल क्रांतीचे प्रतिक मानले जाते.
 10. देशात अन्नधान्य पिकवणा-या शेतक-यांच्या महत्वास यातून दर्शविले जाते.
 11. देशाची समृध्दी आणि धनधान्याची भरभराटी यातून दर्शविली जाते.

अशोक चक्र – Ashok Chakra in Indian Flag

राष्ट्रध्वजातील मध्यम पट्टयात निळया रंगाचे अशोकचक्र आहे.  हे 3 -या शतकातील मौर्य शासक सम्राट अशोक यांच्या सारनाथ स्तंभातून घेतले आहे.

हे चक्र जीवनचक्राचे व प्रगतीच्या गतीचे प्रतिक मानले जाते.  तसेच जीवनातील विविध गोष्टींबाबत जीवनाचे चक्र निरंतर चालत राहाते याचे द्योतक अशोक चक्र मानले जाते.

तिरंग्याचा विकासक्रम – Indian Flag History in Marathi

भारताच्या राष्ट्रीय ध्वजात अनेक बदल झालेत.

हे सर्व बदल स्वातंत्र्या आधी केले गेलेत, बरेच बदल झाल्यानंतर आजचा आपला तिरंगा आपणांस दिसतो आहे.

राष्ट्रीय ध्वजाचा विकासक्रम

 • 1904 – 06 पासून भारताच्या राष्ट्रीय ध्वजात स्वातंत्र्या आधीच बदल करण्यात आले.
 • प्रथम राष्ट्रध्वज 1906 मध्ये जाहीर झाला.
 • हा ध्वज स्वामी विवेकानंदाच्या आयरिश शिष्ये नी बनविला होता, त्यांचे नाव भगिनी निवेदिता असे होते.
 • याचे नंतर नामकरण भगिनी निवेदिता असे ही करण्यात आले.
 • या ध्वजात लाल आणि पिवळया रंगाच्या पट्टया होत्या ज्यात लाल रंग स्वातंत्र्यााठी संघर्षास दाखवत होता तर पिवळा रंग स्वातंत्र्याच्या यशाचे प्रतिक मानले जात होते.
 • त्या ध्वजाखाली बंगाली भाषेत ‘‘वंदे मातरम्” लिहीले होते. या ध्वजावर वज्रधारी इंद्र आणि मध्यात कमळ दर्शवले होते. ज्यामध्ये वज्र आणि कमळास शुध्दतेचे प्रतिक मानले गेले होते.
 • दुसरा राष्ट्रीय ध्वज पॅरीस मध्ये मॅडम कामा यांच्या व्दारा 1907 मध्ये जाहीर करण्यात आला होता.
 • वरील पट्टयास सोडले तर हा ध्वज पूर्वीच्याच ध्वजासमानच होता जो सप्तऋषींना दर्शवत होता.
 • हा ध्वज बर्लिन येथे सामाजिक सभेत दर्शवला गेला होता.
 • तिसरा ध्वज 1917 मध्ये सर्वांसमोर आला. यावेळेस बरेच राजनैतिक बदल पाहायला मिळत होते.  त्यावेळी डाॅ. एनी बेसेन्ट आणि लोकमान्य टिळक यांनी गृह सरकारच्या समोर हा ध्वज झिडकारून इंग्रजी सत्तेचा विरोध केला होता. या ध्वजांत पाच लाल आणि चार हिरव्या धारा होत्या त्यांमध्ये मुख्यतः सप्तऋषींना केंद्रीत केले होते.

Rashtradhwaj Tiranga Mahiti

 • भारताचा चैथा राष्ट्रीय ध्वज सन् 1921 मध्ये ऑल  इंडिया काॅंग्रेस कमिटीच्या हैदराबादच्या सदस्यांनी एक ध्वज बनवून गांधीजींना दिला.
 • या ध्वजात लाल आणि हिरव्या रंगाचे पट्टे होते.
 • हे दोन मुख्य पट्टे भारतातील हिन्दू मूस्लीम एैक्यास दर्शवत होते.
 • गांधीजींनी यात काही बदल करायला सांगितले, त्यांनी दोन्ही रंगांच्या मध्यात चरखा हे चिन्ह अंकित करायला लावले.
 • त्यांच्या मते हा भारताच्या विकासास दर्शवतो असे गांधीनी सूचवले.
 • 1931 सालच्या ध्वजास आपला राष्ट्रध्वज मानण्याचा प्रस्तावही मान्य करण्यात आला होता या ध्वजात चार गोष्टी होत्या.
 • सर्वात वर केशरी पट्टा, मध्यम भागात पांढरा आणि सर्वात खाली हिरवा आणि मधल्या पट्टयात गांधीजींचा चरखा असे या राष्ट्रध्वजाचे स्वरूप होते हा ध्वज सर्वमान्य होता.
 • 22 जुलै 1947 मध्ये निर्वाचीत असेंब्लीने भारताचे स्वातंत्र्य मान्य केले आणि राष्ट्रध्वजात एक बदल केला, चरखा काढून त्याजागी निळया रंगाचे अशोकचक्र स्थापीत केले.

अशा प्रकारे तिरंगा हा आजवरचा आपला राष्ट्रध्वज ठरला तेव्हांपासून आजवर यात कोणताच बदल करण्यात आला नाही.

ब्रिटीश भारतीय ध्वज 1858 -1947 ब्रिटीश भारताने 1858 मध्ये ध्वजाची सुरूवात केली होती. त्यावेळी ध्वज पश्चिमी हेरलडीक स्टॅंडर्ड वर आधारीत होता.

हा ध्वज ब्रिटिश ध्वजासमानच होता. निळया ध्वजात राॅयल यूनियन ध्वज आणि डाव्या किना-यावर भारताच्या ता-याला राॅयल मुकूटात लावले होते.

ध्वज कोड (नियम) – Rules and Regulations for Hoisting Indian Flag

 1.  26 जानेवारी 2002 ला भारतीय ध्वज नियमावलीत बदल केला गेला त्या अन्वये भारतातील नागरिकांना राष्ट्रीय सणानिमीत्य घरांवर, ऑफिस कारखाने, सार्वजनिक वाचनालये इत्यादी ठिकाणी ध्वजारोहणाचा अधिकार दिला.
 2. राष्ट्रीय ध्वजास ठराविक नियमात चढवणे व उतरवणे जरूरी आहे.  याच्या अपमानास दंडनिय अपराध मानल्या जाते.
 3. 2002 च्या ध्वज नियमावलीत तीन भागात विभाजीत केल्या गेले, पहिल्या भागात राष्ट्रीय ध्वजाची साधारण माहीती दिली आहे.
 4. दुस-या भागात आपण कोठे कोठे राष्ट्रध्वज फडकवू शकतो.
 5. तिस-या भागात केंद्र सरकार व राज्य सरकार आणि त्यांच्या संस्थांनी कशाप्रकारे ध्वजारोहण करावे यासाठी नियमावली दिली आहे.
 6. आपण भारतीय हिन्दू, मुस्लीम, क्रिश्चिनीयन, पारसी व इतर जाती – धर्मीय लोकांना जगण्या व मरण्या साठी एक ध्वज असणे आवश्यक आहे. त्याने आपल्या देशाबद्दल माहिती मिळावी – महात्मा गांधी.

ध्वजारोहणाविषयक नियम  –

 • 26 जानेवारी 2002 साली ध्वजारोहणासाठी काही ठराविक नियम सांगितल्या गेले.
 • राष्ट्रीय ध्वजास कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये ( शाळा, काॅलेज, स्पोर्टक्लब, स्काउट कॅंप, इत्यादी ) यांजागी पूर्ण सन्मानाने तिरंगा फडकवू शकतात, फडकवतांना राष्ट्रवचन घेणे जरूरी आहे.
 • सामाजिक,खाजगी संस्था तसेच शैक्षणिक संस्थांचे सदस्यही राष्ट्रीय सणानिमीत्य ध्वजारोहण करू शकतात.
 • स्तंभ 2 अन्वये कोणत्याही खाजगी संस्थांमध्ये सन्मानपूर्वक राष्ट्रीय सणानिमीत्य ध्वजारोहण करू शकतो.

काय करू नये

 1. रात्रीच्या वेळी ध्वजास फडकवू शकत नाही.
 2. राष्ट्रीय ध्वज जमीनीवर पडता कामा नये, ध्वजाचा उचीत सन्मान व्हावा, त्याचा कपडा नवीन व निट इस्त्री केलेला हवा.  राष्ट्रध्वजाचा वापर रिबन किंवा ध्वजपर माध्यमाने करता येत नाही.
 3.  ध्वज अगदी साफ व डाग नसलेला हवा.  त्याची घडी विस्कटलेली नसावी. राष्ट्रध्वज हा राष्ट्राचा मान मानल्या जातो.

राष्ट्रध्वज राष्ट्राचा एक प्रतिनिधीस्वरूप असल्यामुळे खेळाडू, भारतीय सैनिक याची शान वाढवतात तेव्हां आपणा सर्वांची छाती गर्वाने भरून येते.

राष्ट्रध्वज आपल्या सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे.राष्ट्रीय ध्वज हे राष्ट्राचे एक प्रतिरूप असते.  त्यामूळे प्रत्येक नागरिकाने त्याचा सन्मान करणे गरजेचे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top