जांभूळ फळाची संपूर्ण माहिती

Java Plum Fruit

“जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो ” हे गाणे ओढांवर अलगद येते, जेव्हा मार्केट मध्ये आपल्याला जांभूळ विकायला आलेली असतात. आणि सहजच त्यांच्या कडे आपले मन वळते. उन्हळ्यात जसे आंबा अमृतफळा सारखा असतो तर पावसाळ्याच्या सुरवातीला जांभूळ हे अमृत फळच मानावे. इतके आंबट -गोड मनाला हरवून टाकणारे, चटपटीत जरी असले तरी त्याबरोबर औषधी गुणधर्म समविष्ट आहेत.

लहान मुलांपासून तर मोठया व्यक्ती ला आवडणारे हे फळ नेहमी स्वच्छ धुवून व जेवानंतर खावे.

जांभूळ फळाची संपूर्ण माहिती – Jambhul Information in Marathi

Jambhul Information in Marathi
Jambhul Information in Marathi
हिंदी नाव: जामुन
इंग्रजी नाव: Java Plum

या झाडाची उंची सर्वसाधारणपणे साठ ते सत्तर फूट असते. याचे खोड खूप मोठे, पांढरट रंगाचे असते. झाड मोठे झाल्यावर सालीवर काळे ठिपके दिसू लागतात.

याची पाने ४ ते ६ इंच लांबीची आणि १ ते २ इंच जाडीची असतात. पानांचा आकार लंबगोल, टोकदार असतो. पानांवर शिरा असतात.

याची फळे लंबुळकी असतात. याची फुले पांढऱ्या रंगाची गुच्छांनी येतात. फळांचे घोस लागतात. कच्ची फळे हिरवी व पिकल्यानंतर जांभळट काळ्या रंगाची दिसतात. आतील गर मऊ, लाल तांबूस रंगाचा असतो. या फळांची चव गोड असते.

जांभूळ मध्ये लोह व ब जीवनसत्त्व असते. तसेच काही प्रमाणात प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ व मेद तर कोलीन व फोलिक आम्लही त्यात असते अश्या बऱ्याच घटकाचा समवेश त्यात आहे.

जांभळाचा औषधी उपयोग  – Benefits of Jamun

या फळाचे औषधी उपयोग बरेच आहेत.

  1. ज्यां व्यक्तीला गॅसेसचा त्रास होत असेल त्यांनी जांभळाला मीठ लावून खावे.
  2. कावीळ व पांडुरोग (अ‍ॅनिमिया )झालेल्यांना आजारावर मात करण्यासाठी त्या दिवसात रोज सकाळी मीठ व जांभळे रोग्याला खायला द्यावीत.
  3. दातदुखी, दात किडणे, हिरड्या सुजणे, दात कमजोर होणे यावर जांभळाच्या झाडाच्या सालीचा काढा करून गुळण्या कराव्यात. त्रास कमी होतो व मुखशुद्धी होते.
  4. जांभळाच्या बिया वाळवून त्याचे चूर्ण करावे; त्यात काळे मीठ घालून सकाळ-सध्याकाळ पाण्याबराबर प्यावे. मधुमेहावर उपयोगी पडते.
  5. विंचू चावल्यास जांभळाच्या पानांचा रस लावल्याने सूज कमी होते, वेदनाही कमी होतात.
  6. जांभूळ हे फळ पित्तशामक आहे.
  7. जांभूळ हे लोहयुक्त असल्याने ते खाल्यास रक्त शुध्द व लाल होते.
  8. गर्भावस्थेत खूप जांभूळे खावी किवां त्याचे शरबत प्यावे, बाळाच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी पडतात .

इतर माहिती :  Other Information

जांभळाच्या झाडाची लागवड केल्यानंतर ७ ते १० वर्षांनंतर फळे येतात. जांभूळ खाल्ल्याने जीभ जांभळी होते. या फळाचा बहर चैत्र-वैशाखात असतो. याच्या सेवनाने कफ, दाह कमी होतो.खराब झालेल्या पाण्यात जर जांभळाच्या फांद्या टाकल्या तर पाणी स्वच्छ होते.जांभळापासून व्हिनेगर व वाईनही बनवतात.
हा वृक्ष मोठा असल्याने त्याची सावली थंड असते. हे फळ बहुउपयोगी असल्याने, झाडे लावून त्या फळांची विक्री करणे हे अर्थार्जनाचे चांगले साधन ठरते.

जांभूळ फळाबद्दल विचारलेजाणारे प्रश्न – FAQ About Jambhul Quiz

प्रश्न. जांभूळाचे इंग्रजी ,हिंदी व शास्त्रीय नाव काय ?

उत्तर: Java Plum हे जांभूळाचे इंग्रजी नाव आहे, तर हिंदीत जामून म्हणतात. शास्त्रीय (Botanical name ) नाव ujenia jambolina आहे.

प्रश्न. जांभूळ पाने पासून काय तयार होते?

उत्तर: या पानांपासून तेल काढल्या जाते ते एक प्रकारचे औषध युक्त असते .यात विटामिन ई असते.

प्रश्न. जांभूळाचे उत्पादन क्षेत्र कोणते ?

उत्तर: जांभूळाचे उत्पादन क्षेत्र महाराष्ट्र आहे. गुलाब जांभूळ बीविरहित, गुलाबी रंगाचे व गोलाकार असते. यांना गुलाबासारखा सुगंध येतो. ही जांभळे बंगाल व ब्रह्मदेशामध्ये येतात.

प्रश्न. जांभूळाचे जाती कोणत्या ?

उत्तर: राज जांभूळ व शूद्र जांभूळ अशा दोन जाती आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here