पहा काय करतोय लहानपणीचा जुनियर जी. अशी आहे आताची लाईफ.

जी जेम जेमी बूम! याला वाचल्या नंतर आपल्याला काही आठवले का? आपला जन्म जर ९० च्या शतकात झाला असणार तर आपण लहानपणी बरेचशे TV शो पाहिले असतील, त्यापैकी एक म्हणजे जुनियर जी. बरेच जणांना आठवण असेलच. आठवण नसेल तर आपल्याला आठवून देतो कि ह्या शो ला सर्वात आधी डी.डी. नेशनल वर दाखविल्या गेले होते.

आले का आठवण? मग आले असणार तर आपल्याला ह्या शो मध्ये कोण कोण होत ते सुद्धा माहिती असेलच या शो मध्ये जुनियर जी नावाचा एक मुलगा होता ज्याचे नाव गौरव होते, आणि तो त्या नाटकामध्ये एक अनाथ मुलगा दाखवलेला असतो,

पहा काय करतोय लहानपणीचा जुनियर जी. अशी आहे आताची लाईफ – Junior G

Junior G
Junior G

एक दिवस त्याला काही सुपर पावर मिळतात आणि तो त्या शक्तींचा उपयोग फ्युमांचू नावाच्या राक्षस प्रवृत्तीच्या व्यक्तीला हरविण्यासाठी करतो. या नाटकाचा सर्वात पहिला एपिसोड हा १० नोव्हेंबर २००१ ला दाखविला गेला होता.

आपला जन्म ९० च्या शतकात झाला असेल, तर आता आपण म्हणणार कि हि गोष्ट तर आम्हाला सुद्धा माहिती आहे. हो आपल्याला हा TV शो माहिती असणारच, पण आपल्याला या शो मध्ये जो लहान मुलगा जुनियर जी बनला होता तो सध्या काय करतोय माहिती आहे का?

नाही! तर चला आपण आजच्या लेखात पाहुया आपल्या बालपणाला सुंदर बनविणाऱ्या त्या जुनियर जी विषयी. कि तो लहानपणचा जुनियर जी कोण आहे आणि सध्या काय करतोय. तर चला पाहूया पुढे.

लहानपणीचा जुनियर जी आहे तरी कोण आणि करतो काय?

लहानपणी एकीकडे शक्तिमान लोकांच्या पसंतीचा शो समोर आला होता आणि त्यानंतर जुनियर जी नावाचा शो लहान मुलांना आवडायला लागला होता विशेष करून त्या नाटका मधील जुनियर जी चे पात्र पार पडणारा जुनियर जी नाटकामधील एक साधा भोळा मुलगा गौरव,

हा गौरव म्हणजे खरोखरच्या जीवनातील अमितेश कोच्चर. अमितेश आता खूप मोठा झाला आहे. एवढा मोठा कि त्याचे आता लग्न सुद्धा झाले आहे. त्याने स्वतःचे यु ट्यूब चे एक चॅनेल सुरु केले आहे, त्याचे हे यु ट्यूब चॅनेल एक ब्लॉगिंग चॅनेल आहे.

Amitesh Kochhar
Amitesh Kochhar

या चॅनेल मध्ये तो दैनंदिन जीवनातील अनुभव तसेच प्रवासाचे अनेक व्हिडीओ तो त्याच्या चॅनेल वर शेयर करत असतो. यु ट्यूब वर अमितेश चे बऱ्यापैकी सबस्क्रायबर आहेत. अमितेश त्याच्या सोशल मिडीया अकाउंट वर स्वतःची ओळख Ex Junior G म्हणून देतो.

याच अमितेश ने आपल्या लहानपणाला तेव्हा एक वेगळा आनंद दिला होता, आपल्याला अजूनही बरेचश्या गोष्टी आठवत असणार या विषयी. आज अमितेश मुंबई मध्ये आपल्या घरी राहतो,

तो त्याच्या यु ट्यूब चॅनेल वर जुनियर जी वेळेस झालेल्या काही घटनांचा उल्लेख सुद्धा करताना दिसतो. उल्लेख म्हणजेच त्याचा त्या वेळेसचा अनुभव कसा राहिला तेव्हा सेटवर कशी मजा आली या सर्व गोष्टीं त्याने यु ट्यूब चॅनेल वर शेयर केलेल्या आहेत.

आपल्याला अजूनही त्याच्या विषयी जाणून घ्यायचे असेल तर आपणही त्याच्या यु ट्यूब चॅनेल ला भेट देऊ शकता. अमितेश चे अमितेश Vlogs नावाचे एक यु ट्यूब चॅनेल आहे.

आपल्या सर्वांचा लाडका जुनियर जी ज्याला ९० च्या शतकात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती ओळखत असेलच, त्याने लहानपणीच्या जीवनाचे काही दिवस आनंदमय बनविले.

तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आवडला असणार, आपण सोशल मिडीयावर असणार तर आपल्याला हा लेख कसा वाटला सोशल मिडीयावर कळवायला विसरू नका,

या लेखाला आपल्या ९० च्या शतकातील आपल्या मित्रांना पाठवून तुमच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा द्यायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here