Sunday, September 17, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

कुस्तीपटू खाशाबा जाधव

Khashaba Jadhav Mahiti

भारताला महान खेळाडूंची परंपरा लाभलेली आहे. या मातीत अनेक खेळाडू जन्मले…वाढले..आणि आपल्या देशासाठी लढले… त्यांच्या या लढवय्या वृत्तीने आपल्या देशाचं नाव अनेक पातळ्यांवर उंचावलं गेलं …

या खेळाडूंच्या त्यागाच्या, समर्पणाच्या, जिद्दीच्या कहाण्या आपल्या महाराष्ट्राने देखील अनुभवल्या आहेत कारण महाराष्ट्राची ही माती तितक्याच ताकदीची आणि उर्जावान खेळाडूं जन्माला घालणारी होती आहे अन सदैव राहील.

पण असं देखील बऱ्याचदा घडतं कि या थोर खेळाडूंची गाथा इतिहासाच्या पानांमध्ये कुठंतरी लुप्त होते आणि त्यांचा संघर्ष पुढच्या पिढीपर्यंत कधी पोहोचतच नाही.

आज या लेखात अश्याच महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या विषयी जाणून घेऊया.

Contents show
1 कुस्तीपटू खाशाबा जाधव – Khashaba Jadhav Information in Marathi
1.1 About Khashaba Jadhav
1.1.1 Khashaba Jadhav Career

कुस्तीपटू खाशाबा जाधव – Khashaba Jadhav Information in Marathi

नावखाशाबा दादासाहेब जाधव
जन्म (Birthday)१५ जानेवारी १९२६
गावसातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील रेठरे हे गाव
जन्मस्थानगोळेश्वर जिल्हा. सातारा
खेळकुस्ती
कामगिरी१९५२साली पार पडलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत कुस्तीत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं
मृत्यू१४ ऑगस्ट १९८४ सातारा जिल्ह्यातील कराड इथं

भारताला १९५२ साली पार पडलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत पहिलं वैयक्तिक कांस्य पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव या कुस्तीपटूंनबद्दल विशेष गोष्ट हि कि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे पहिलं वैयक्तिक ऑलम्पिक कांस्य पदक त्यांनी आपल्या भारताला मिळवून दिलं .

सातारा जिल्ह्यातील एका लहान गावात जन्माला आलेल्या खाशाबांना कुस्तीचं बाळकडू घरातच मिळालं. त्यांचे आजोबा आणि त्यांचे वडील दादासाहेब सुद्धा उत्तम कुस्तीपटू होते.

वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षापासूनच खाशाबा कुस्तीतील बारकावे शिकू लागले.

वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षीच एका प्रसिद्ध पहिलवानाला चितपट करून खाशाबांनी सर्वाना आपली दखल घेण्यास भाग पाडलं.

पुढे सर्वदूर होणाऱ्या कुस्तीत सहभाग घेऊन खाशाबा मातब्बरांना धूळ चारू लागले.

कराड येथील टिळक विद्यापीठात १९४० ते १९४७ दरम्यान शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर खाशाबांनी आपलं संपूर्ण लक्ष कुस्तीवर केंद्रित केलं .

खाशाबांच्या कुस्तीतील कामगिरिची चर्चा सगळीकडे होऊ लागली.

त्यांच्यातील प्रतिभा ओळखून कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर यांना खाशाबा मध्ये असलेल्या गुणांचं चीज व्हावं असं मनोमन वाटून गेलं

About Khashaba Jadhav

खाशाबांच्या वडीलांना देखील हि चांगली संधी असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी घरची शेती गहाण ठेवून खाशाबांना कुस्तीतील पुढच्या प्रशिक्षणासाठी कोल्हापूरला पाठवलं.

कोल्हापूरच्या मराठा बोर्डिंग इथं राहून खाशाबा शिक्षण आणि तालीम यांचा अचूक मेळ बसवू लागले.

गोविंद पुरंदरे या क्रीडा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाने त्यांचा ऑलम्पिक स्पर्धेचा मार्ग सुकर झाला.

फ्लायवेट गटाकरता खाशाबांची लंडन ऑलम्पिक मध्ये १९४८ ला जेंव्हा निवड झाली त्यावेळी ते सहाव्या क्रमांकावर होते. इथवर पोहोचणारे भारतातील ते पहिले खेळाडू होते.

खाशाबा गादीवरचा कुस्तीप्रकार शिकलेले असल्याने आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे आणि तेथील नियमांचे त्यांना फारसे ज्ञान नव्हते. आणि त्यामुळे त्यांना पुढची फेरी देखील गाठता आली नाही.

पण त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे १९५२ ला हेलसिंकी हि फिनलंड ची राजधानी असलेल्या ठिकाणी ज्यावेळी ऑलम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तेंव्हा खाशाबा पूर्ण तयारीनिशी कुस्तीच्या रिंगणात उतरले होते.

हेलसिंकी इथं स्पर्धेला जाण्यासाठी पैसे नसल्याने गावकरी मंडळी यांनी लोकवर्गणी करून, ओळखीच्या लोकांनी त्यांना जमेल तशी मदत करून पैसे उभे केले.

Khashaba Jadhav Career

प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर सरांनी तर खाशाबाला ऑलम्पिक स्पर्धेला जाता यावं यासाठी स्वतःचं घर गहाण ठेऊन ७००० रुपये उभे केले.

खाशाबांचे कोल्हापूर चे प्रशिक्षक गोविंद पुरंदरे यांनी देखील ३००० रुपयांची जमवाजमव केली अन खाशाबा ऑलम्पिक स्पर्धेला जाऊ शकले .

त्या स्पर्धेत विविध देशातील २४ स्पर्धकांनी भाग घेतला होता.

खाशाबांनी मेक्सिको, जर्मनी, कॅनडा येथील स्पर्धकांना नमवून सेमी फायनल पर्यंत मजल मारली.

आंतरराष्ट्रीय राजकारण आडवं आलं नसतं तर खाशाबा सुवर्णपदक घेऊनच परतले असते.

पण त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं तरीदेखील हि बाब देखील कमी महत्वाची ठरत नाही कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ऑलम्पिक स्पर्धेतील हे पहिलं वैयक्तिक पदक ठरलं होतं.

खाशाबांच्या नावावर हा रेकॉर्ड जवळपास ४४ वर्ष कायम होता.

लियांडर पेस या टेनिस पटूचं नाव दुसऱ्या क्रमांकावर १९९६ साली या यादीत समाविष्ट झालं.

पदक पटकावून ज्यावेळी खाशाबा मायदेशी परतले त्यावेळी कराड रेल्वेस्थानकावर त्यांचे फार मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत करण्यात आले होते.

शेकडो बैलगाड्या… ढोलताशे…. लेझीम पथकं… आतिषबाजी फटाके यांच्या धामधुमीत खाशाबांच्या गोळेश्वर या गावापर्यंत जंगी मिरवणूक निघाली.

खाशाबांच्या या विजयाने त्यांच्या लहानश्या गावाची ओळख संपूर्ण देशभर झाली होती.

Previous Post

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

Next Post

बोटांचे मराठी नाव

Editorial team

Editorial team

Related Posts

Marathi Biography

श्री. एकनाथ शिंदे यांची माहिती

Eknath Shinde Mahiti महाराष्ट्रातील राजकारणात अतिशय महत्वाचा मानला जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना..! शिवसेना पक्षाने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात संधी देऊन...

by Editorial team
July 13, 2022
Marathi Biography

श्रीमती द्रौपदि मुर्मू यांची माहिती

Draupadi Murmu नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती तसेच भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदि मुर्मू...

by Editorial team
June 17, 2023
Next Post
बोटांचे मराठी नाव

बोटांचे मराठी नाव

रंगांचे मराठी नावे

रंगांचे मराठी नावे

भाज्यांची नावे मराठीत

भाज्यांची नावे मराठीत

ग्रहांचे नावे मराठीत

ग्रहांचे नावे मराठीत

धर्मवीर आनंद दिघे

धर्मवीर आनंद दिघे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2023, MajhiMarathi.Com, All rights reserved