लगोरी खेळाबद्दल संपूर्ण माहिती

Lagori Information in Marathi 

पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्या म्हटल्या कि आपलं गाव आठवायचं. गावाकडचे विविध खेळ आठवायचे. त्यात मग काही खेळ घरात बसून खेळल्या जायचे तर काही मैदानी खेळ असायचे. कॅरम, चांपुल, चिट्ठ्या, सापशिडी इ. खेळ घरात बसून खेळल्या जायचे. मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानाची गरज असते. क्रिकेट, आबाधुबी, लगोरी, चोर-पोलीस, खो-खो असे नानाविध मैदानी खेळ मुलांना आवडायचे.

परंतु आज मोबाइल आणि व्हिडीओ गेम मुळे आपल्याला मैदानी खेळांचा जणू विसरच पडला आहे. कुणी घराच्या बाहेर पडण्यास तयारच नाही. तासंतास मोबाईल वर गेम खेळत राहणे आणि सोशल मिडिया वर वेळ घालवणे हे आजच्या पिढीला प्रचंड प्रमाणात आवडीचे आहे.

खेळल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. त्यात मैदानी खेळ म्हटले कि शरीराचा व्यायाम होतो. चला तर मग आज आपण अश्याच एका मैदानी खेळा बद्दल जाणून घेऊया. या खेळाचं नाव आहे लगोरी. होय, लगोरी खेळ जो आपल्या पैकी बऱ्याच जणांनी खेळाला सुद्धा असेल.

लगोरी खेळाबद्दल संपूर्ण माहिती – Lagori Information in Marathi

Lagori Information Marathi 
Lagori Information Marathi

लगोरी खेळासाठी लागणारे साहित्य – Lagori Game Set

लगोरी साठी आपल्याला ७ छोट्या दगडांची गरज असते. हे दगड चापट किंवा ओबडधोबड असले तरी चालतील. दगड ओबडधोबड असतील तर आणखी मज्जा येईल. शिवाय आपल्याला हवा आहे एक चेंडू. हा चेंडू एकमेकांना मारावा लागतो, त्यामुळे सौम्य चेंडू घ्यावा. लगोरी पासून १५ ते २० फूट अंतरावर चेंडू मारण्यासाठी रेष आखावी.

लगोरी खेळासाठी लागणारे गडी :

या साठी आपल्याला दोन संघांची गरज असते. प्रत्येक संघामध्ये कमीत कमी ३ आणि जास्तीत जास्त १० गडी असू शकतात.

लगोरी खेळाचे नियम – Lagori Game Rules

आपल्याला ७ दगड एकमेकांवर रचून त्यांची माळी तयार करावी लागेल. या माळीलाच लगोरी असे म्हणतात. दोन संघापैकी पहिल्या संघातील गडी चेंडू मारून हि लगोरी पाडणार आणि ती परत उभी करण्यासाठी प्रयत्न करणार. दुसरा संघ हा पहिल्या संघाला लगोरी उभी करण्यापासून रोखणार.

हे करत असतांना दुसरा संघ हा चेंडू मारून पहिल्या संघातील गड्यांना बाद करेल. जर कोणताही गडी बाद न होता लगोरी उभी राहिली तर त्या संघातील गडी आपला एक पाय लगोरीवर ठेऊन लगोरी असे ओरडणार. आणि याप्रमाणे पहिला संघ विजयी होईल.

जर पहिल्या संघातील कुणी एक गडी बाद झाला तर दुसरा संघ चेंडू मारून लगोरी पडणार. आणि खळे पुन्हा सुरु होईल. लगोरी पाडल्यानंतर गडी हे संपूर्ण मैदानात कुठेही पळू शकतात. आणि विरुद्ध संघातील गडी त्यांना बाद करण्यासाठी धावपळ करतील. असे अत्यंत साधे आणि सोपे नियम आहेत.

लगोरी खेळापासून फायदे – Benefits of Lagori Game

  1. शारीरिक व्यायाम व धावण्याची सवय होते.
  2. संघ कार्य शिकायला मिळते.
  3. चतुराई आणि चपळता शिकायला मिळते.
  4. नेतृत्व गुण अंगीकृत होतो.

नेहमी विचारल्या जाणारे प्रश्न :

१. लगोरी खेळामध्ये किती गडयांची आवश्यकता असते ?

उत्तर: लगोरी साठी आपल्याला दोन संघांची गरज असते. यातील प्रयेक संघात ४ ते १० गडी असू शकतात. असे एकूण ८ ते २० गडी या खेळामध्ये सहभागी होऊ शकतात.

२. लगोरी खेळाची इंग्रजी नाव काय आहे?

उत्तर: सेव्हन स्टोन गेम (Seven Stone Game).

३. लगोरी खेळाला हिंदीमध्ये काय म्हणतात?

उत्तर: लगोरी किंवा पिठठु.

४. लगोरी मध्ये किती दगड असतात?

उत्तर: ७.

५. लगोरी खेळ संपूर्ण देशात खेळाला जातो का?

उत्तर: होय. लगोरी हा खेळ संपून देशभर खेळाला जातो. काही ठिकाणी या खेळाला वेगवेगळी नावे दिलेली आहेत.

६. लगोरी खेळाची सुरुवात कधी झाली ?

उत्तर: लगोरी हा प्राचीन खेळ असून याची सुरुवात नेमकी कधी झाली हे सांगता येणे शक्य नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here