मकर संक्रांति विषयी एक छोटासा निबंध

Makar Sankranti Essay in Marathi

हिंदू धर्मातील एक विशेष सण म्हणजे पौष महिन्यामध्ये साजरा केला जाणारा मकर संक्रांत. तसेच इंग्रजी कॅलेंडरच्या पहिल्या महिन्यात या सणाला साजरे केले जातं, पण आवश्यक नाही कि हा सण त्या महिन्यामधेच यायला हवा, तो दुसऱ्या महिन्यात सुद्धा येऊ शकतो आता ते कसे तर आपण पुढे पाहूया,

तर आजच्या लेखात आपण मकर संक्रांति विषयी एक छोटासा निबंध पाहणार आहोत, जो आपल्याला थोडीशी मदत करेल. तर चला पाहूया.

मकर संक्रांति विषयी एक छोटासा निबंध – Makar Sankranti Essay in Marathi

Makar Sankranti Essay in Marathi
Makar Sankranti Essay in Marathi

मकर संक्रांति चा सण – Makar Sankranti Festival

पौष महिन्याची सुरुवात ज्या दिवशी होते, त्या दिवसाला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो, हा सण हिंदू धर्मातील एक विशेष सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशी मध्ये प्रवेश करत असतो, सूर्याची मकर राशीत प्रवेश करण्याची वेळ हि नेहमी बदलत राहते, कधी सकाळी तर कधी संध्याकाळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.

आता आपण पाहिले तर शास्त्रात आपल्याला पाहायला मिळतं, कि महाभारताच्या वेळी मकर संक्रांत हि डिसेंबर महिन्याच्या आसपास साजरी केल्या जायची, अकबराच्या काळात हीच मकर संक्रांत १० जानेवारी ला साजरी केल्या गेली होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हि ११ जानेवारी रोजी साजरी केल्या जात होती, हे सर्व तेव्हा पाहायला मिळाले, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.

एका वर्षात सूर्याची गती हि २० सेकंदानी वाढते, आणि यामुळेच हे सर्व आपल्याला पाहायला मिळतं, आता याचप्रमाणे आपण गेलोत तर ५००० वर्षांनी येणारी मकर संक्रांत हि फेब्रुवारी महिन्यात येणारं.

मकर संक्रांत का म्हटलं जातं – Makar Sankranti Information

“मकर” हा शब्द आपल्याला वाचता बरोबर कळून जातो कि “मकर” हि एक राशी आहे, आणि “संक्रांत” हा शब्द संक्रमण या शब्दा पासून आलाय, तर सूर्य ज्या दिवशी धनु राशीतून मकर राशी मध्ये प्रवेश करतो म्हणजेच संक्रमण करतो तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांति असे म्हटल्या जातं.

मकर संक्रातीला तिळाचे महत्व – Importance of til or sesame seeds during Makar Sankranti

मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी तिळाला खूप महत्व दिल्या जातं. कारण मकर संक्रांत हा सण हिवाळ्यातच येतो, आणि तिळामध्ये उष्णता असते, आणि थंडीच्या काळात शरीराला उष्णतेची जास्त गरज असते म्हणून तिळाला अधिक महत्व दिल्या जातं. आणि या दिवशी तिळाचे लाडू तसेच तिळाची पट्टी बनवल्या जाते.

कशी साजरी केल्या जाते मकर संक्रांति – How to Celebrate Makar Sankranti

मकर संक्राती हि वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाते, आणि या सणाला साजरे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जाते, या दिवशी एकमेकांना तीळ गुळ वाटून गोड गोड बोलण्यास सांगितले जातं. तसेच लहान मुलांना खाऊ दिले जातात,

सोबतच स्त्रिया या दिवशी एकमेकींना वान वाटतात, शेतातील ऊस, हरभरा यांचे छोटे तुकडे, बोर आणि कुंकू तसेच आणखी इतर गोष्टी एकमेकींना देऊन तीळ संक्रांत साजरी केल्या जाते.

याच दिवशी युवा मंडळी आकाशात उंचच्या उंच पतंग उडविण्याचा कार्यक्रम ठेवतात, आकाशात पतंग उडवून या दिवसाला साजरे केल्या जातं, सोबतच एकमेकांचे पतंग आकाशात कापल्या सुद्धा जातात, आणि या सर्व गोष्टींची मजा घेत तीळ संक्रांत साजरी केल्या जाते.

तर अश्या प्रकारे तीळ संक्रांत साजरी केल्या जाते, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा निबंध आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा निबंध आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top